सोन्याचे दागिने देत नसल्याचा राग, रत्नागिरीत आईची दगडाने ठेचून हत्या

आईला दगडाने ठेचून आणि त्यानंतर तिचा मृतदेह जाळून हा सर्व प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला.

सोन्याचे दागिने देत नसल्याचा राग, रत्नागिरीत आईची दगडाने ठेचून हत्या

रत्नागिरी : आई आणि मुलाच्या प्रवित्र्य नात्यालाच काळिमा फासणारी घटना रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील साटवली इथं घडलीय. घरगुती भांडण आणि कर्जबाजारी झालेल्या मुलाला आई तिचे सोन्याचे दागिने देत नाही, याचा राग येऊन सख्या मुलाने आईचा काटा काढला. आईचीच अमानुष हत्या केली. आईला दगडाने ठेचून आणि त्यानंतर तिचा मृतदेह जाळून हा सर्व प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र चाणाक्ष लांजा पोलिसांच्या नजरेतून हा गुन्हेगार सुटला नाही. फितीमा काळसेकर असे दुर्दैवी आईचं नाव आहे, तर मजहर असे निर्दयी मुलाचे नाव आहे.

आई आणि मुलगा हे प्रवित्र नातं मजहर यांनी मातीमोल केलं. याला कारण ठरलं ते आईकडेचे सोने. काळसेकर यांचा छोटासा संसार होता. फातिमा पती आणि मुलांसोबत राहात असत. पण फातिमा यांच्या मुलाने आपल्या आईचा काटा काढला. फितामा यांचा सर्वात छोटा मुलगा मजहर. पण मजहर कर्जबाजारी झाला होता. त्यात मजहरच्या पत्नीशी फातिमा यांचे सतत भांडण व्हायचे. आरडीसी बॅकेच्या कर्जाचे हप्ते ठकल्याने मजहर आईकडे तिच्याकडील सोन्याचे  दागिने देण्याचा तकादा लावत असे. मात्र आई मजहरला दागिने देत नसे. उडवून लावत असे. अखेर कंटाळून संतापलेल्या मजहरने आईचा काटा काढण्याचा कट रचला.

आठवडा बाजारात लांजा इथं गेलेली आईला मजहरने वाटेत गाठले. मोटारसायकलने तिला तो घेवून आला. साटवली रोडवर आल्यावर रस्ता निर्जन असल्याचे पाहुन मजहरने मोटरसायकल थांबवली आणि मोटरसायकल शेजारी उभ्या असलेल्या आईच्या डोक्यात दगड घातला. हा घाव इतका वर्मी होता की फातिमा खाली कोसळल्या. तोच दगड उचलून त्याने फातिमा यांच्या पायावर घातला. चेहरा आणि डोळे दगड घालून त्यांने विदृप केले. जवळ असलेल्या वाड्यातील गवताचा पेंढा आईच्या अंगावर पसरून त्यावर पेट्रोल ओतून त्याने तो जाळून टाकला. यानंतर काहीही न घडल्याच्या आविर्भावात मजहर घरी परतला.

घरच्यांनी फितिमा रात्रीपर्यत घरी न आल्याने पोलिसात तक्रार दिली. तीन दिवसांनी जळलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाल्यानंतर लांजा पोलिसांची सूत्रे हलली. मजहरच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. सोन्यासाठी आणि घरगुती वादातून महजरने आईचा काटा काढला.

लांजा पोलीस आणि गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत मजहरने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याच्यावरचा संशय बळावत गेला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सखोल चौकशी केल्यावर मजहरने हत्येची कबुली दिली. आईची ओळख पटू नये म्हणून मजहरने आईची चप्पल, तिचा चष्मा यांसह तिला जाळून टाकलं. ज्या दगडाने मजहरने आईला ठेचून मारले, तो दगड आणि अंगावरील दागिने हस्तगत करण्याच्या दृष्टीने आता पोलिसांनी आपला तपास सुरु केला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI