आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय, गोळ्या झाडून काटा काढला, हादरवून टाकणारा खून

हत्येतील आरोपींना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केलं असून हत्येमागचं कारण अंगाचा थरकाप उडवणारे आहे. मिळालेल्या माहितीनुसार आईसोबत अवैध संबंध असल्याच्या संशयावरुन राजेश नावाच्या आरोपीने मेहुण्याला हाताशी धरत स्वत:च्याच चुलत्याला गोळ्या घालून ठार केलं होतं. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.

आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय, गोळ्या झाडून काटा काढला, हादरवून टाकणारा खून
कूचबिहारमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा रहस्यमयरित्या मृत्यू
| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 9:31 AM

लखनौ : उत्तर प्रदेशमधईल चंदौली येथे चार महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येचे रहस्य उलगडले आहे. या हत्येतील आरोपींना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केलं असून हत्येमागचं कारण अंगाचा थरकाप उडवणारे आहे. मिळालेल्या माहितीनुसार आईसोबत अवैध संबंध असल्याच्या संशयावरुन राजेश नावाच्या आरोपीने आपल्या बहिणीचा पती जोगिंदर चौहानला हाताशी धरत स्वत:च्याच चुलत्याला गोळ्या घालून ठार केलं होतं. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.

नेमका प्रकार काय आहे ?

मिळालेल्या माहितीनुसार 20 आणि 21 जुलैच्या रात्री चंदौली जिल्ह्यातील काशीपूर गावात एका हत्या झाली होती. या घटनेत गुड्डू चौहान नावाच्या व्यक्तीला गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. या घनटेनंतर ही मर्डर मिस्ट्री सोडवण्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस प्रयत्न करत होते. सर्व अंगांनी तपास करुनसुद्धा पोलिसांना कोणताही पुरावा हाताला लागत नव्हता. त्यानंतर तब्बल चार महिन्यांतर गुड्डूच्या हत्येमधील आरोपीं राजेश याला अटक करण्यात आले. राजेश हा गुड्डूचा भाचा आहे. त्यानेच गोळी घालून राजेश याला ठार केलं होतं, असा दावा पोलिसांनी केलाय.

हत्या नेमकी का केली ?

हत्येमागचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी अथक प्रयत्न केले. शेवटी हा खून अवैध संबंधाच्या संशयातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार मृत गुड्डू चौहानचे आरोपी राजशे याच्या आईशी अवैध संबंध होते. ही गोष्ट राजेस याला माहीत झाली होती. त्यानंतर गुड्ड्ला संपण्यासाठी राजेशने कट रचला होता. राजेशने 20 जुलै रोजी आपल्या बहिणीच्या नवऱ्याला हाताशी धरत चौहान याचा काटा काढला. सध्या पोलिसांनी आरोपी राजेश आणि त्याच्या जोगिंदर याल अटक केलंय.

डॉक्टरची हत्या, कारण अद्याप अस्पष्ट 

दरम्यान, यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धक्कादायक घटना घडली. येथील एका शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरची हत्या करण्यात आली असून त्याचे नाव डॉ. अशोक पाल असे आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातच ही हत्या करण्यात आलीय. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली असून हत्येचे नेमके कारण काय ? हे अद्याप अद्याप समजू शकलेले नाही.

इतर बातम्या :

महाराष्ट्र हादरला ! शिकाऊ डॉक्टरची हत्या, महाविद्यालयातच आढळला मृतदेह

13 वर्षीय रिक्षावाल्याबरोबर 47 लाख घेऊन पळाली करोडपतीची पत्नी, 26 दिवसांनी परतली

‘सैतान होती, देवानं मारायला सांगितलं’! जन्मदात्या आईचं शिर धडावेगळं करणाऱ्या मुलाचा धक्कादायक जबाब