AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक, अटक केल्यानंतर दिले असे कारण…ATS कडून तपास

Stone pelting on Vande Bharat train:वाराणसीमधील एटीएसकडून या प्रकरणाची चौकशी सुरु झाली. या प्रकरणात हुसैन उर्फ शाहिद याला अटक करण्यात आली. त्याची एटीएसने कसून चौकशी सुरु केली. त्यात त्याने सांगितले की...

वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक, अटक केल्यानंतर दिले असे कारण...ATS कडून तपास
Vande bharat
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Oct 05, 2024 | 4:08 PM
Share

Stone pelting on Vande Bharat train: भारतातील सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारत सर्वाधिक लोकप्रिय गाडी ठरत आहे. कमी वेळेत आरामदायी प्रवास होत असल्यामुळे अनेक जण वंदे भारतमधून प्रवास करण्यास प्राधान्य देतात. या गाडीवर दगडफेकीच्या घटना अधूनमधून होत असतात. आता उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक झाली. त्या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक (एटीएस)कडून सुरु आहे. या प्रकरणी हुसैन उर्फ शाहिद या आरोपीला एटीएसने अटक केली. त्याने ट्रेनच्या खिडक्या तोडण्याबरोबर ट्रेनचा वेग कमी करण्याच्या उद्देशाने दगडफेक केल्याचे सांगितले. त्यामुळे खिडक्यांजवळ बसलेल्या प्रवाशांचे मोबाईल चोरता येणे शक्य होईल.

एटीएस पथकाची नियुक्ती

2 ऑक्टोंबर 2024 रोजी वाराणसीवरुन दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक झाली होती. कानपूरजवळील पनकी स्टेशनजवळ दगडफेक झाली होती. त्यामुळे या ट्रेनच्या C7 खिडकीचे काच तुटले होते. अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे प्रवाशी घाबरले होते. अनेक जण घाबरुन सीटाच्या खाली वाकले. या प्रकरणाची माहिती आरपीएफ आणि जीआरपीला देण्यात आली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच तपासासाठी एटीएस पथकाची नियुक्ती करण्यात आली.

वाराणसीमधील एटीएसकडून या प्रकरणाची चौकशी सुरु झाली. या प्रकरणात हुसैन उर्फ शाहिद याला अटक करण्यात आली. त्याची एटीएसने कसून चौकशी सुरु केली. त्यात त्याने सांगितले की, ट्रेनचा वेग कमी करणे हा आपला उद्देश होता. त्यामुळे या ट्रेनमध्ये खिडकीशेजारी बसलेल्या लोकांचे मोबाईल लंपास करता येतील. या उत्तराने एसटीएस पथकालाही धक्का बसला.

यापूर्वी दगडफेकीच्या अनेक घटना

वंदे भारत ट्रेनवर दगडफेक केल्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी अनेक घटना घडल्या आहेत. कानपूर, इटावा येथेही या घटना घडल्या आहेत. वारंवार होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांमुळे रेल्वे सुरक्षा दलापुढे आव्हान निर्माण झाले आहे. या घटनांनंतर रेल्वे प्रशासनाकडून वंदे भारतच्या मार्गावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आरपीएफ आणि जीआरपीची संयुक्त टीम देखरेख करत आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...