नाशिकच्या बड्या अधिकाऱ्याला एसीबीनं पकडलं रंगेहाथ, एसीबीच्या सापळ्यात कसा अडकला अधिकारी ?

किरण बाळासाहेब ताजणे, Tv9 मराठी

|

Updated on: Feb 01, 2023 | 4:54 PM

गेल्या काही दिवसांमध्ये नाशिकमध्ये लाच घेतांना रंगेहाथ अटक करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. यामध्ये वर्ग एकचे अधिकारीही एसीबीच्या सापळ्यात सापडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नाशिकच्या बड्या अधिकाऱ्याला एसीबीनं पकडलं रंगेहाथ, एसीबीच्या सापळ्यात कसा अडकला अधिकारी ?
Image Credit source: Google

नाशिक : दर आठवड्याला नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एक लाचखोरीची कारवाई केली जात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग दुसऱ्या बाजूला लाचखोरी रोखण्यासाठी जनजागृती करीत असतांना दुसऱ्या बाजूला लाचखोरीच्या कारवाया वाढत चालल्या आहे. निफाडच्या कोतवालाला लाच घेतांना रंगेहाथ अटक करून आठवडा उलटत नाही तोच भूमीअभिलेख विभागाचे अधिक्षक आणि लिपीकाला लाच घेतांना रंगेहाथ अटक केली आहे. एका विभागाच्या थेट प्रमुखालाच लाच घेतांना अटक केल्यानं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यामध्ये त्याच कार्यालयातील एका लिपीकालाही अटक करण्यात आली आहे.

जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख पदावर असलेल्या महेशकुमार महादेव शिंदे यांना लाच घेतांना रंगेहाथ अटक केली आहे. यामध्ये शिंदे यांच्याकडे उपसंचालक पदाचा कार्यभारही होता.

शिंदे हे वर्ग एकचे अधिकारी आहेत. तर त्याच कार्यालयात लिपिक असलेल्या अमोल महाजन यालाही एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

एसीबीकडे एका व्यक्तीने तक्रार दिली होती. त्यामध्ये वडिलांच्या नावावर असलेल्या शेत जमिनीच्या भूमी अभिलेख कार्यालयात प्रमादाची चूक झालेली होती. ती चुक दुरुस्तीसाठी लाच मागितली होती.

महेशकुमार महादेव शिंदे यांनी चुक दुरुस्ती करून देण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली होती, यामध्ये 50 हजार रुपयांना स्वीकारतांना ही कारवाई करण्यात आली होती.

नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली आहे. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे या लाचखोरीच्या कारवाईची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिक्षकपदी शर्मिष्ठा वालावलकर यांची नियुक्ती झाल्यापासून लाचखोरीच्या कारवाया वाढल्या आहेत, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर मोठा भर काही महिन्यांपासून दिला जात आहे.

दरम्यान, नाशिकच्या जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयात झालेली ही कारवाई संपूर्ण शासकीय कार्यालयात खळबळ उडवून देणारी बाब असून उलटसुलट चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

वर्ग एकचे अधिकारी गेल्या काही दिवसांमध्ये लाचखोरीत रंगेहाथ पकडले जात असल्याने नाशिकमध्ये लाचखोरीला ब्रेक कसा लागणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI