धक्कादायक! वाशीतील रुग्णालयात उपचारादरम्यान तरुणीवर अतिप्रसंग? तरुणीचा मृत्यू, शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा

| Updated on: Apr 15, 2021 | 9:00 AM

पुण्यात कोणत्याही रुग्णालयात या तरुणीला बेड मिळाला नाही. ओळखीच्या डॉक्टरांनी या तरुणीला उपचारासाठी वाशीच्या मनपा रुग्णालयात पाठवले होते. | Rape on girl

धक्कादायक! वाशीतील रुग्णालयात उपचारादरम्यान तरुणीवर अतिप्रसंग? तरुणीचा मृत्यू, शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा
उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
Follow us on

नवी मुंबई: पुण्यातून वाशीच्या मनपा रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या एका 28 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या तरुणीवर अतिप्रसंग (Rape) झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी शवविच्छेदन अहवालाची वाट पाहावी लागणार आहे. मात्र, या चर्चेमुळेच सध्या मोठी खळबळ उडाली आहे. (suspecting rape on girl in Navi Mumbai Hospital)

प्राथमिक माहितीनुसार, पुण्याच्या शिरुर येथे राहणाऱ्या या तरुणीला साधारण आठ दिवसांपूर्वी डेंग्यू झाला होता. पुण्यात कोणत्याही रुग्णालयात या तरुणीला बेड मिळाला नाही. तिच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचार करणे शक्य नव्हते. त्यामुळे ओळखीच्या डॉक्टरांनी या तरुणीला उपचारासाठी वाशीच्या मनपा रुग्णालयात पाठवले होते.

या तरुणीचे आई-वडीलही कोरोनाग्रस्त आहेत. या तरुणीला रुग्णालयात दाखल करुन घेतल्यानंतर मंगळवारी तिला कोरोना चाचणीसाठी सीबीडी येथे पाठवण्यात आले. यावेळी तिच्यासोबत तिचे नातेवाईकही होते. मात्र, कोरोना चाचणी करून पुन्हा रुग्णालयात परतत असताना या तरुणीला आकडी आली आणि नंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, या मुलीची तपासणी करत असतानाच डॉक्टरांना काही गोष्टी संशयास्पद वाटल्या होत्या. त्यामुळे डॉक्टरांनी तात्काळ पोलिसांना याविषयी कळवले. त्यानंतर प्रकृती अत्यंत खालावली असल्याने या तरुणीचा मृत्यू झाला. त्यामुळे आता याप्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे. रुग्णालयात येण्यापूर्वी तिच्यावर अत्याचार झाला होता का, याचा अद्याप उलगडा होऊ शकलेला नाही. शवविच्छेदन अहवालातील निष्कर्षांवर पुढील सर्व गोष्टी अवलंबून आहेत.

मुंबईत हॉटेलमध्ये क्वारंटाईन असलेल्या महिलेचा विनयभंग

कोव्हिड सेंटरमध्ये रुपांतरित करण्यात आलेल्या अंधेरीतील एका हॉटेलमध्ये एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने शहरातील हॉटेल्सचे रुपांतर कोव्हिड सेंटरमध्ये (Coivd centre) करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, नुकत्याच घडलेल्या एका प्रकारामुळे शासनाचे पूर्णपणे नियंत्रण नसलेल्या या हॉटेल्समध्ये महिला कितपत सुरक्षित राहतील, हा प्रश्न निर्माण झाला आहे.अंधेरीच्या एमआयडीसी परिसरातील हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा विनयभंग करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्याला ( मेडिकल कोऑर्डिनेटर) पोलिसांनी अटक केली आहे.

संबंधित बातम्या:

मुंबईत हॉटेलमध्ये क्वारंटाईन असलेल्या महिलेचा विनयभंग; वैद्यकीय कर्मचाऱ्याला अटक

तरुणीचा मृतदेह समजून नातेवाईकांना दिला तरुणाचा मृतदेह, नवी मुंबई पालिका रुग्णालयातील प्रकार

स्मशनात जागा नाही, त्यात पुरलेले मृतदेह कुत्र्यांनी बाहेर काढले, बुलडाण्यातील संतापजनक प्रकार

(suspecting rape on girl in Navi Mumbai Hospital)