तरुणीचा मृतदेह समजून नातेवाईकांना दिला तरुणाचा मृतदेह, नवी मुंबई पालिका रुग्णालयातील प्रकार

नवी मुंबई महापालिका रुग्णालयाच्या शवागरातून 29 वर्षीय तरूणाचा मृतदेह एका मृत तरुणीच्या नातेवाईकांना देण्यात आला. (Navi Mumbai Municipal Hospital Dead Body Exchange)

तरुणीचा मृतदेह समजून नातेवाईकांना दिला तरुणाचा मृतदेह, नवी मुंबई पालिका रुग्णालयातील प्रकार
Follow us
| Updated on: May 19, 2020 | 2:58 PM

नवी मुंबई : तरुणीचा मृतदेह समजून एका तरुणाचा मृतदेह तिच्या नातेवाईकांना दिल्याची घटना समोर आली आहे. नवी मुंबई महापालिका आरोग्य प्रशासनाचा या भोंगळ कारभारामुळे दोन्ही कुटुंबाना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. (Navi Mumbai Municipal Hospital Dead Body Exchange)

महापालिका रुग्णालयाच्या शवागरातून 29 वर्षीय मोहम्मद उमर फारुख शेख याचा मृतदेह एका मृत तरुणीच्या नातेवाईकांना देण्यात आला. विशेष म्हणजे ज्या नातेवाईकांना उमर शेखचा मृतदेह देण्यात आला, त्या नातेवाईकांनी देखील ताब्यात घेतलेला मृतदेह मुलीचा असल्याची खातरजमा न करता हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले.

दुसरीकडे मोहम्मद उमरचा मृतदेह समजून त्याच्या कुटुंबियांना एका मुलीचा मृतदेह देण्यात आला. ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी तो घेण्यास नकार दिला. त्यांनी मुलाचा मृतदेह आपल्या ताब्यात द्यावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे गोंधळ उडाला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी अन्य कारणांमुळे मृत पावणार्‍या व्यक्तींचीही सध्या कोविड तपासणी करण्यात येत आहे. रिपोर्ट येण्यासाठी काही दिवस लागत असल्यामुळे वाशी येथील महापालिका रुग्णालयातील शवागरात मृतदेहांची संख्या वाढली आहे.

एका रॅकमध्ये दोन-दोन मृतदेह ठेवण्यात येत आहेत. कोरोनाच्या धास्तीने शवागरात काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी पॅकबंद असलेले मृतदेह नातेवाईकांना दिले. यावेळी मृतदेहांची अदलाबदल झाली असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. (Navi Mumbai Municipal Hospital Dead Body Exchange)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.