चॉकलेटच्या आमिषाने अमरावतीत बालिकेसोबत अतिप्रसंग, नराधमाला बेड्या

चॉकलेटच्या आमिषाने अमरावतीत बालिकेसोबत अतिप्रसंग, नराधमाला बेड्या
उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू

पीडितेला चॉकलेटचे आमिष दाखवून विजय जवंजाळ या नराधमाने तिच्यावर अतिप्रसंग केला (Amravati Crime Girl Sexual assault)

अनिश बेंद्रे

|

Mar 16, 2021 | 12:02 PM

अमरावती : अल्पवयीन मुलीसोबत अतिप्रसंग झाल्याचा प्रकार अमरावती जिल्ह्यात उघडकीस आला आहे. चॉकलेट देण्याच्या आमिषाने नराधमाने 12 वर्षीय बालिकेसोबत अतिप्रसंग केला. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Amravati Crime 12 years old Girl Sexual assault)

अल्पवयीन तरुणीवर अतिप्रसंग झाल्याची घटना पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन अंतर्गत हा संतापजनक प्रकार घडला. आपल्या अल्पवयीन मुलीसोबत नराधमाने अतिप्रसंग केल्याची तक्रार पीडितेच्या आईने दिली.

चॉकलेटच्या आमिषाने अतिप्रसंग

पीडितेला चॉकलेटचे आमिष दाखवून विजय जवंजाळ या नराधमाने तिच्यावर अतिप्रसंग केलाय. 12 वर्षीय बालिकेने कशीबशी नराधमाच्या तावडीतून आपली सुटका करुन घेतली. त्यानंतर तिने आपल्यासोबत घडलेला हा किळसवाणा प्रकार आईला सांगितला.

पॉक्सोअंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीला बेड्या

पीडित बालिकेच्या आईच्या तक्रारीवरुन बाल लैंगिक कायद्या अंतर्गत (पॉक्सो) नराधम आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी विजय जवंजाळ याला अटक केली आहे.

आरोपीला सध्या न्यायालयीन कोठडी ठोठवण्यात आली आहे. या संदर्भात शिरजगाव कसबा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे अधिक तपास करत आहेत. (Amravati Crime 12 years old Girl Sexual assault)

वसईतही चिमुरडीला जीवदान

वसईच्या फादरवाडी परिसरात चार वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन, तिच्यावर अतिप्रसंग करुन तिला जिवंत गोणीत बांधून टाकून दिले होते. सुदैवाने वालीव पोलिसांच्या सतर्कतेमुळे चिमुरडीला जीवनदान मिळाले. पोलिसांनी ताब्यात घेऊन वसईच्या सर डी. एम. पेटिट रुग्णालयात मुलीची वैद्यकीय तपासणी केली होती, त्यानंतर तिच्यावर अतिप्रसंग झाला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.

नव्वदीच्या वृद्धेसोबतही अतिप्रसंग

घरात एकटी असल्याचे पाहून चंद्रपूर जिल्ह्यात 90 वर्षीय वृद्धेवर युवकाने अतिप्रसंग केल्याची खळबळजनक घटना काही महिन्यांपूर्वी उघडकीस आली होती. या प्रकरणातील आरोपीला अटक झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील महालगाव(काळू) या ठिकाणी ही घटना घडली होती.

संबंधित बातम्या :

चार वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करुन जिवंत गोणीत बांधून फेकले, पोलिसांच्या सतर्कतेने चिमुकलीला जीवनदान

नात्याला काळिमा! सावत्र आईने चिमुकल्याला गरम तव्यावर उभे करून दिले चटके

(Amravati Crime 12 years old Girl Sexual assault)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें