मुलाने मर्जीविरोधात लग्न केले, संतापलेल्या पित्याने नवविवाहित सुनेचे कुंकू पुसले !

मुलाचे एका मुलीवर प्रेम होते. बापाला मात्र हे प्रेम मजूर नव्हते. मुलाने बापाच्या विरोधात जाऊन आपल्या पसंतीच्या मुलीशी लग्न केले. यानंतर पंधरा दिवसांनी मुलगा पत्नीसह घरी आला आणि इथेच घात झाला.

मुलाने मर्जीविरोधात लग्न केले, संतापलेल्या पित्याने नवविवाहित सुनेचे कुंकू पुसले !
बेपत्ता तरुणाचा संशयास्पद मृत्यू
Image Credit source: Google
| Updated on: Apr 15, 2023 | 8:59 PM

चेन्नई : आपल्या मर्जीविरोधात लग्न केले म्हणून संतापलेल्या पित्याने पोटच्या मुलाला संपवल्याची धक्कादायक घटना चेन्नईत घडली आहे. यावेळी मुलाला वाचवण्यासाठी आलेल्या आजीलाही पित्याने संपवले, तर सुनेवर जीवघेणा हल्ला केला. सुनेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सुनेच्या जबानीवरुन हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष असे मयत मुलाचे, तर कन्नकमल असे मयत आजीचे नाव आहे. समाजात खोटा दिखावा करण्याच्या नादात एक कुटुंब उद्धवस्त झाले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

15 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

मयत सुभाष हा तिरुपूर येथील विणकाम कंपनीत काम करत होता. त्याचे दुसऱ्या समजातील अनसूयासोबत प्रेमसंबंध सुरु होते. मात्र हे प्रेमसंबंध सुभाषचा पिता दण्डपाणीला मंजूर नव्हते. मात्र वडिलांचा विरोध झुगारुन सुभाषने 15 दिवसांपूर्वी अनसूयासोबत लग्न केले. लग्नानंतर दोघे वेगळे राहत होते.

तामिळ नववर्षानिमित्त घरी आला असता पित्याने संपवले

सुभाषची आजी कन्नम्मल हिने नवविवाहित जोडप्याला अरुणापती गावातील तिच्या घरी तामिळ नववर्ष दिनाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले. त्यानुसार सुभाष आणि अनसूया गुरुवारी रात्री तेथे गेले. ही बाब दण्डपाणीला समजताच तो तेथे पोहोचला आणि त्याने सुभाषची हत्या केली. यावेळी नातवाला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या कन्नम्मल यांनाही आरोपीने मारले. तसेच अनसूयावर हल्ला केला.

शेजाऱ्यांनी रुग्णालयात नेले

कन्नम्मल यांच्या घरातून ओरडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली. शेजाऱ्यांनी तात्काळ जखमींना उथंगराई सरकारी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी कन्नम्मल आणि सुभाष यांना मृत घोषित केले, तर अनसूयाची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी अनसूयाच्या जबानीवरुन गुन्हा दाखल केला आहे.