बायकोला माहेरी नेल्याचा राग, नवऱ्याने सासूबाईंनाच पॉर्न फिल्म पाठवल्या

बायकोला माहेरी नेल्याचा राग, नवऱ्याने सासूबाईंनाच पॉर्न फिल्म पाठवल्या
चाइल्ड पोर्नोग्राफी : देशातील 14 राज्यांत सीबीआयचे छापे

लग्न झाल्यापासूनच क्षुल्लक कारणावरुन तो पत्नीला त्रास देत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली (Telangana Porn video mother-in-law’s phone)

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jun 22, 2021 | 10:44 AM

हैदराबाद : बायकोला आपल्या मनाविरुद्ध माहेरी नेल्याचा राग नवऱ्याने भयंकर पद्धतीने काढला. तरुणाने चक्क स्वतःच्या सासूच्याच फोनवर अश्लील व्हिडीओ क्लीप पाठवल्या. सासूच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तेलंगणात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Telangana Man booked for sending Porn video Clips to mother-in-law’s phone)

लग्न झाल्यापासूनच क्षुल्लक कारणावरुन त्रास

संशयित मोहम्मद अक्रम पाशा तेलंगणात हैदराबादमधील ज्युबिली हिल्समधील कार्मिक नगर परिसरात एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करतो. सात महिन्यांपूर्वी परिसरात राहणाऱ्या एका तरुणीशी त्याचं लग्न झालं. मात्र लग्न झाल्यापासूनच क्षुल्लक कारणावरुन तो पत्नीला त्रास देत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तिला माहेरी जाण्यासही त्याने मज्जाव केला.

गर्भवती लेकीला माहेरी पाठवण्याची सासूची विनंती

संबंधित तरुणी पाच महिन्यांची गर्भवती आहे. शनिवारी तो पत्नीला रेग्युलर चेकअपसाठी रुग्णालयात घेऊन गेला. त्यावेळी त्याच्या सासूने आपल्याला काही दिवसांसाठी मुलीला माहेरी नेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती जावयाला केली. मात्र त्याने पुन्हा नकार दिला. तरीही सासू आपल्या लेकीला जबरदस्ती घरी घेऊन गेली.

सासूच्या फोनवर पॉर्न फिल्म पाठवल्या

सासूच्या कृत्याचा जावयाला भलताच राग आला. तो बायकोच्या माहेरी गेला आणि त्याने धमकावत शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने सासूच्या मोबाईलवर शिवराळ आणि लैंगिकदृष्ट्या प्रक्षोभक व्हिडीओ क्लीप्स पाठवल्या. सासूने ज्युबिली लाईन पोलिसात तक्रार दिल्यानंतर सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तेलंगणा टूडे या वेबसाईटवर यासंबंधी वृत्त प्रसारित झाले आहे.

पंजाबमध्ये पत्नीच्या फेक अकाऊण्टवरुन पतीचं चॅटिंग

दुसरीकडे, पत्नी पुन्हा नांदायला येत नसल्याने पंजाबमधील पतीने तिची बदनामी करण्यासाठी त्याने अक्षरशः टोक गाठलं. त्याने पत्नीच्या नावे फेक फेसबुक अकाऊण्ट ओपन केलं. त्यानंतर तिच्या माहेराजवळ राहणाऱ्या व्यक्तींना त्याने या फेक आयडीवरुन फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर आक्षेपार्ह मेसेज करत तो अश्लील फोटो पाठवू लागला. या चॅट्सचे स्क्रीनशॉट तो पत्नीला पाठवत होता. नवऱ्याच्या या घृणास्पद प्रकाराला वैतागून महिलेने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी आरोपीविरोधात आयटी अॅक्ट 2000 च्या कलम 68 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पंजाबमधील बठिंडा शहरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

संबंधित बातम्या :

कोरोनाग्रस्त सासूबाईंची डेंजर विकृती, सुनेला जबरदस्ती मिठी मारली, रिपोर्ट आला…

पत्नीच्या नावे फेक अकाऊण्ट, आक्षेपार्ह फोटो पाठवत नवऱ्याचे तरुणांशी अश्लील चॅटिंग

(Telangana Man booked for sending Porn video Clips to mother-in-law’s phone)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें