AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : अचानक घरात घुसला आणि मुलाला उचलून निघून गेला… अवघ्या दीड वर्षांच्या मुलाचं अपहरण कोणी केलं ?

दोन इसम थेट घरात घुसले आणि अवघ्या दीड वर्षांच्या त्या बाळाला उचलून घेऊन गेले. त्याची आई त्यांना अडवायचा प्रयत्न करत होती, पण त्यांनी काहीच ऐकलं नाही.

Mumbai Crime : अचानक घरात घुसला आणि मुलाला उचलून निघून गेला... अवघ्या दीड वर्षांच्या मुलाचं अपहरण कोणी केलं ?
| Updated on: Oct 28, 2023 | 1:09 PM
Share

ठाणे | 28 ऑक्टोबर 2023 : ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तेथे अवघ्या १८ महिन्यांच्या, मुलाचं अपहरण करण्यात (kidnapping of small boy) आल्याने एकच खळबळ माजली आहे. दोन इसम थेट घरात घुसले आणि अवघ्या दीड वर्षांच्या त्या बाळाला उचलून घेऊन गेले. त्याची आई त्यांना अडवायचा प्रयत्न करत होती, पण त्यांनी काहीच ऐकलं नाही.

मात्र अपहरणकर्त्यांच नाव ऐकून तर पोलिसही चक्रावले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला

कोणी केलं अपहरण ?

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या चिमुरड्या मुलाचं त्याच्याच मावशीच्या नवऱ्याने अपहरण केलं. सरवर अली असं त्याचं नाव आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या बहिणीचे नवऱ्याशी, अली याच्याशी सतत वाद व्हायचे. भांडणामुळे ती पतीपासून वेगळी झाली होती. काही दिवसांपूर्वीच अली हा त्याच्या मेव्हणीकडे आला आणि त्याची पत्नी कुठे आहे, सध्या कुठे राहते यासंदर्भात तिच्याकडे चौकशी करू लागला. पण तिने त्याला काहीही सांगण्यास नकार दिला. त्यानंतर तो घरातून निघून गेला.

बदला घेण्यासाठी केले किडनॅप

तक्रारदार महिलेच्या सांगण्यानुसार, आरोपी अली आणि आणखी एक व्यक्ती बुधवारी कळवा येथील तिच्या घरात घुसले आणि तिच्या अवघ्या दीड वर्षांच्या मुलाला उचलून घेऊन गेले. त्याच्या पत्नीचा पत्ता सांगितला नाही याचा बदला घेण्यासाठीच अलीने हे कृत्य केल्याच आरोप पीडित महिलेने लावला आहे. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास सुरू आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत