मुलगा डान्सच्या क्लासला आला नाही टीचरचा फोन आला, कामावरुन घरी आलेल्या आईला धक्काच बसला

या मुलाची आई नीलू हीने मुलगा क्लासला आला नसल्याचा टीचरचा फोन आल्याने सायंकाळी उशीरा घरी आल्यानंतर शोधाशोध केली, परंतू तो सापडला नाही. अखेर सर्वत्र शोधल्यानंतर...

मुलगा डान्सच्या क्लासला आला नाही टीचरचा फोन आला, कामावरुन घरी आलेल्या आईला धक्काच बसला
जुन्या वादातून तरुणाची हत्या
Image Credit source: socialmedia
| Updated on: Aug 12, 2023 | 10:12 PM

नवी दिल्ली | 12 ऑगस्ट 2023 : मुलाच्या टीचरचा तिला फोन आला की मुलगा डान्स क्लासला का आला नाही.? त्यामुळे ती घाईघाईने सायंकाळी घरी परतली तर घरातल्या बेडरुममधील वस्तू अस्ताव्यस्त पसरलेल्या होत्या. मुलगा घरात नव्हता आणि दार बाहेरुन लॉक होते. म्हणून तिला वाटले खेळायला बाहेर गेला असेल अखेर तिने मित्रांच्या घरी चौकशी केली. नवऱ्याला आणि भावाला फोन केला, सर्वच जण शोधायला लागले अखेर बेडशिट नीट करायला ती गेली आणि तिला जे दिसले ते पाहून तिच्यावर अक्षरश: आभाळच कोसळले.

दिल्लीतील इंद्रपुरीत शुक्रवारी सायंकाळी एका अकरा वर्षांचा मुलगा त्याच्या घरातील पलंगात मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या दिव्यांश नावाच्या मुलाची आधी गळा दाबून हत्या करण्यात आली असून नंतर त्याला पलंगात लपविल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणाचा तपास आता इंद्रपुरी पोलिस करीत आहेत. या मुलाची आई नीलू हीने मुलगा क्लासला गेला नसल्याचा टीचरचा फोन आल्याने सायंकाळी उशीरा घरी आल्यावर शोधाशोध केली, परंतू तो सापडला नाही. अखेर सर्वत्र शोधल्यानंतर घरातील पलंगातचा तो सोपडला. त्याला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषीत केले.

मानेवर आढळल्या जखमेचा व्रण

दिव्यांश याची आई नीलू आणि वडील जितेंद्र हे वेगवेगळे रहात असून त्यांच्या घरी येणाऱ्या पुजा नावाच्या महिलेमुळे दोघांमध्ये भांडणे सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. आपल्या नवऱ्याला पूजा हीने फोन करीत तुझे सर्वात जास्त प्रेम असलेली गोष्ट हिरावून नेली तर काय करशील ? असा फोन केला असल्याचे नीलू यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, संशयित महिला पूजा हीचा शोध सुरु असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. दिव्यांश याच्या मानेवर जखमा असून त्याचा आधी गळा दाबून खून करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलीसांचे म्हणणे पाहा –

पोलीसांचा तपास सुरु 

दिल्लीतील इंद्रपुरीत शुक्रवारी सायंकाळी एका अकरा वर्षांचा मुलगा त्याच्या घरातील पलंगात मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या दिव्यांश नावाच्या मुलाची आधी गळा दाबून हत्या करण्यात आली असून नंतर त्याला पलंगात लपविल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणाचा तपास आता इंद्रपुरी पोलिस करीत आहेत.