AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांचा मुख्य निवडणूक आयुक्तपदाचा राजीनामा? पत्र व्हायरल, आयोगाने म्हटलं…

ज्ञानेश कुमार यांचा मुख्य निवडणूक आयुक्तपदाचा बनावट राजीनामा व्हायरल होत आहे. निवडणूक आयोगाने देखील पत्र बनावट असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांचा मुख्य निवडणूक आयुक्तपदाचा राजीनामा? पत्र व्हायरल, आयोगाने म्हटलं...
gyanesh kumarImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 28, 2026 | 7:51 AM
Share

केंद्रीय निवडणूक आयोग सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभारामुळे आयोगात फूट पडल्याच्या दावा करण्यात आलाय. त्यानंतर विरोधकांनी थेट ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर काही तासांतच त्यांच्या राजीनाम्याचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु सोशल मीडियावर व्हायरल होणारं पत्र बनावट असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.

व्हायरल होणाऱ्या पत्रात म्हटलं की, ‘सगळ्या परिस्थितीचा विचार केल्यानंतर राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल भारत सरकार आणि देशाच्या नागरिकांचे आभार मानतो. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची सेवा करणे आणि निवडणूक आयोगाची निष्पक्षता टिकवून ठेवण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे’. परंतु मुळात हे पत्रच बनावट असल्याचे निवडणूक आयागोने सांगितलं आहे. पीटीआयच्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्यांनी हा राजीनामा बनावट असल्याचे सांगितलं आहे. विशेष म्हणजे बनावट पत्रावर मुख्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची सही देखील होती. हे पत्र राष्ट्रपतींना पाठवण्यात आलं होतं’. प्रवक्याने पुढे म्हटलं की, ‘व्हायरल होणारं पत्र एआय निर्मित आहे. या पत्रावर लोकांनी विश्वास ठेवू नये, असं आवाहन केलं आहे.

काय आहे प्रकरण?

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, निवडणूक आयुक्त आणि मुख्य आयुक्तांमध्ये एसआयआरवरून मतभेद असल्याचा दावा करण्यात आला. दोन्ही आयुक्तांनी अनेकदा मुख्य निवडणूक आयुक्ताकडे आक्षेप नोंदवला. पण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. निवडणूक आयुक्त संधू आणि विवेक जोशी यांनी मागील 10 महिन्यात एसआयआरशी संबंधित निर्णय आणि आदेशावर 14 वेळा आक्षेप घेतला होता. त्यांनी दोघांना विश्वासात न घेता निर्णय घेतल्याचा दावा वृत्तात करण्यात आला. तर मतदार नोंदणी फॉर्म नं. 6 बाबत देखील काही आक्षेप घेतले होते. परंतु या रिपोर्टनंतर निवडणूक आयोगाने मतभेद असल्याचा दावा फेटाळून लावला. तसेच अनेक निर्णय सहमतीने घेण्यात आल्याचे आयोगाच्या प्रवत्यांनी सांगितले. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगात कोणतेही मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?