Maharashtra Live News : पाडकामाला विरोध करण्यासाठी सलून चालकाने विषारी औषधे प्यायले
Maharashtra Live News : गणपती विसर्जनानंतर अनेक मंडळांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. अश्लील नृत्य करणाऱ्यांवर तृतीयपंथ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. तर दुसरीकडे गणेश मंडळांना आवाजाचा दणदणात भोवला आहे. 37 मंडळात विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासह राज्य, क्रीडा, मनोरंजन आणि राष्ट्रीय क्षेत्रातील इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..

अमरावती जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत अश्लील नृत्य करणाऱ्यांवर तृतीयपंथ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. नेरपिंगळाई, सोनोरी येथे तृतीयपंथीयां विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यंदा गुन्हा दाखल झालेल्या मंडळांना पुढील वर्षी परवानगी नाकारण्यात आली आहे. चांदुर बाजार तालुक्यातील सोनोरीत 10 जनासह 16 तृतीयपंथीयांसह एकूण 26 जणांवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. अश्लील हावभाव व नृत्यामुळे सार्वजनिक शांतता भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर लागला आहे. गणेश मंडळांना आवाजाचा दणदणात भोवला आहे. 37 मंडळात विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनेक मंडळाकडून डीजे साऊंड सिस्टीम आणि प्लाझ्मा लाईटचा सर्रास वापर झाला असून, डीजे आणि वाद्यांचा मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणाऱ्या मंडळांना पोलिसांनी दणका दाखवला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचा मोर्चाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आज ठाकरे गटाचा मोर्चा जाणार आहे. शेतकऱ्यांना दुष्काळाची तात्काळ भरघोस नुकसान भरपाई कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यावर मोर्चा धडकणार आहे. मोर्चात खासदार अरविंद सावंत आमदार नितीन देशमुख सह ठाकरे गटाचे कार्यकर्ते व शेतकरी सहभागी होणार आहेत. यासह राज्य, क्रीडा, मनोरंजन आणि राष्ट्रीय क्षेत्रातील इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..
LIVE NEWS & UPDATES
-
मुंबई–हैदराबाद महामार्गावर शाळेची बस पलटी; ८ विद्यार्थी जखमी
मुंबई–हैदराबाद महामार्गावर मूर्टा गावाकडे जात असताना शाळेची बस पलटी झाल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात १० ते १६ वर्षे वयोगटातील आठ विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचारासाठी दाखल केलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे,
-
मुंबईतील प्रसिद्ध Kyani & Co. वर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई
मुंबईतील प्रसिद्ध Kyani & Co. वर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई
कारवाईदरम्यान सापडलं मेलेलं झुरळ आणि उंदराची विष्ठा
काळबादेवी येथील Kyani & Co. ची 27 सप्टेंबर रोजी FDAकडून तपासणी
तपासणीदरम्यान अन्न तयार करण्याच्या आणि साठवणूक क्षेत्रात गंभीर त्रुटी आढळल्याचा FDAचा दावा
अन्न तयार करण्याच्या ठिकाणी मांजर आणि उंदरांची विष्ठा आढळल्याची FDAची माहिती
जिवंत माश्या आणि मृत झुरळे आढळल्याचाही FDAचा दावा
रेफ्रिजरेटरमध्ये मोठ्या प्रमाणात रक्त साचलेले आढळल्याची नोंद
प्रक्रिया विभागात उघडे सांडपाण्याचे मॅनहोल आढळल्याची FDAची माहिती
अन्नपदार्थ थेट जमिनीवर ठेवण्यात आल्याचे तपासणीत आढळले
कच्चे पीठ छापील वर्तमानपत्राने झाकल्याचेही निदर्शनास आल्याचा दावा
-
-
वेश्या व्यवसायातून ५ पीडित महिलांची गुन्हे शाखेकडून सुटका
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुरू असलेल्या अनैतिक व्यापार व अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने बेलापूर येथील एका स्पावर छापा टाकून वेश्या व्यवसायातून पाच पीडित महिलांची सुटका केली आहे.
-
पोलादपूरमध्ये मच्छीने भरलेला ट्रक पलटी; सुदैवाने जीवितहानी नाही
पोलादपूर तालुक्यातील धामणदेवी येथे मच्छीने भरलेला ट्रक अचानक पलटी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ट्रक रस्त्यावर उलटला असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे.
-
पाडकामाला विरोध करण्यासाठी सलून चालकाने विषारी औषधे प्यायले
निफाड तालुक्यातील विंचूरमध्ये अतिक्रमण हटाव कारवाईला विरोध करण्यासाठी एका सलून चालकाने विषारी औषध प्राशन केले आहे. तीन पाटी परिसरातील अतिक्रमणे हटवण्यास PWD ने सुरुवात करताच सलून चालकाने औषध प्राशन केल्याने खळबळ उडाली आहे. पंडित साळुंखे यांना उपचारासाठी निफाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
-
-
अंबादास दानवे यांना ओमराजे यांनी दिलेल्या आव्हानाचे कोपरगावात पडसाद
धाराशिवमधून निवडणूक लढवण्याच्या अंबादास दानवे यांना ओमराजे यांनी दिलेल्या आव्हानाचे कोपरगावात पडसाद उमटले आहेत. अंबादास दानवे यांच्या प्रतिमेला शिवसैनिकांनी दुग्धभिषेक केला आणि ओमराजे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
-
अमरावतीतील पोही येथील शेतकऱ्यांचे उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे
अमरावती जिल्ह्यातील पोही येथील शेतकऱ्यांचे उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे. पोही येथील शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके विरोधात अध्यक्ष बच्चू कडू यांच्या निवासस्थाना समोर आंदोलन सुरू केले होते. सोसायटीच्या कर्जप्रकरणांवर सह्या न केल्याने शेतकरी कर्जापासून वंचित असल्याचा आरोप केला होता. सिबिलची अट लावून कर्ज वितरणास अडथळा आणला जात असल्याची तक्रार केली जात आहे.
-
विद्यानंद बापट यांच्यावरती गुन्हा करा, अन्यथा आंदोलन – गणेश कल्याणकर
विद्यानंद बापट याच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही तर दोन दिवसात आम्ही खडक पोलीस स्टेशनचा आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश कल्याणकर यांनी दिला आहे. बापट याला सवंग प्रसिद्धी हवी आहे. त्यामुळे आज जाणीवपूर्वक अशी वक्तव्य करत आहे.हिंदूच्या भावना दुखावल्या आहेत यामुळे विद्यानंद बापट याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. गणेश मंडळाचा कार्यकर्ता गोमूत्र पिऊन माजला आहे असं हा वक्तव्य करतो.हे खपवून घेतलं जाणार नाही असेही कल्याणकर यांनी म्हटले आह.
-
सोलापूर जिल्ह्यातील चारा बाहेर विक्रीस मनाई
सोलापूर जिल्ह्यातील चारा बाहेर विक्रीस मनाई. चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्तिके एन यांचा निर्णय. जिल्ह्यात केवळ 120 दिवस पुरेल इतकाच चारा शिल्लक. तर, आधीच चारा नाही, आम्ही कुठे चारा विकणार, शेतकऱ्यांची प्रतिक्रिया
-
दुष्काळ परिस्थितीमुळे पुणे विद्यापीठातील प्रस्तावित मेस दरवाढ रद्द
दुष्काळ परिस्थितीमुळे पुणे विद्यापीठातील प्रस्तावित मेस दरवाढ रद्द. परीक्षा शुल्कही माफ करण्याचा निर्णय. मेस दरवाढ रद्दचा निर्णय दिलासादायक, विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया
-
मालेगावात भेळ-भत्ता खाल्ल्याने ७० ते ८० जणांना विषबाधा
मालेगावात भेळ-भत्ता खाल्ल्याने ७० ते ८० जणांना विषबाधा..रुग्णांना उलट्या जुलाब सुरु. नांदगाव बुद्रुक गावातील आठवडे बाजारातील घटना. विषबाधितांवर मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयात दाखल होत घेतली रुग्णांची विचारपूस. आठवडे बाजारातील भेळ-भत्ता खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती
-
चंद्रपूरच्या राजूरामध्ये काँग्रेसकडून भव्य जनआक्रोश मोर्चा
चंद्रपूरच्या राजूरामध्ये काँग्रेसकडून भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला…नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते…शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी,एसआयआरमधील कथित गोंधळ, पेपरफुटीविरोधात काँग्रेसकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला…मोर्चात खासदार प्रतिभा धानोरकर सहभागी झाल्यात…
-
दिल्लीत ज्ञानेश कुमारांविरोधात काँग्रेस आक्रमक
दिल्लीत ज्ञानेश कुमारांविरोधात काँग्रेस आक्रमक. दिल्ली प्रदेश काँग्रेसकडून ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन. निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जाण्यास पोलिसांनी आंदोलकांना अडवलं. काँग्रेसकडून ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी
-
पवारांच्या वक्तव्यामागील हेतू सांगता येणार नाही- तटकरे
पवारांच्या वक्तव्यामागील हेतू सांगता येणार नाही. आजही NDA सोबत आणि उद्याही NDA सोबत राहण्याची आमची भूमिका- सुनील तटकरे
-
ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली असून आंदोलन सुरू आहे. त्यात राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड सहभागी झाले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ज्ञानेश कुमार यांची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड काढण्यात आली. तर निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग सिद्धू आणि विवेक जोशी या दोघांना प्रतिकात्मक घोड्यावर बसवून गौरव करण्यात आला. एक तडीपार चंद्रावर, ज्ञानेश कुमार गाढवावर, एसआयआर हटाव देश बचाव अशी जोरदार घोषणाबाजी अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.
-
सोलापूर धुळे महामार्गावर वारकऱ्यांचा रास्ता रोको
सोलापूर धुळे महामार्गावर वारकऱ्यांचा रास्ता रोको. हरिभक्त परायण राहुल महाराज येडशीकर यांना गावगुंडांकडून मारहाण झाल्या प्रकरणी वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आक्रमक झाले. काही काळ महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूकही विस्कळीत झाली. मारहाण करणाऱ्या गाव गुंडावर कारवाई करण्याची वारकरी संप्रदायातील संस्थान कडून मागणी करण्यात येत आहे.
-
ठाणे – शिंदे सेनेच्या अभंगेला महिलांकडून मारहाण
ठाणे – शिंदे सेनेच्या सिद्धी अभंगेला महिलांकडून मारहाण करण्यात आली. कोपरी पोलीस ठाण्यात घुसून त्याला मारहाण करण्यात आली.महिलांकडून प्रत्येकी 500 रुपये मागतिल्याचा आरोप अभंगे याच्यावर आहे.
-
अंबरनाथमध्ये वर्गणीच्या हिशोबाच्या वादातून तरुणाची हत्या,आरोपीला अटक
अंबरनाथमध्ये वर्गणीच्या हिशोबाच्या वादातून तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक. क्राईम ब्रँचने आरोपीला धावत्या एक्स्प्रेसमधून पकडलं. गावाला पळून जाताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
-
मुंबईतील तीन महत्त्वाच्या पुलांच्या कामांना विलंब, ऊद्घाटनाची मुंबईकरांना प्रतीक्षा
मुंबईतील सायन, विद्याविहार आणि जीएमएलआर फ्लायओव्हर प्रकल्प रखडले आहेत. तिन्ही पुलांच्या कामांना अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. सायन पूल ऑगस्ट २०२४ पासून वाहतुकीसाठी बंद, सायन पुलाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आता ऑक्टोबर २०२६ पर्यंत पुढे तर विद्याविहार आरओबीचे काम तब्बल आठ वर्षांपासून सुरू आहे. या पुलाचे उद्घाटन यापूर्वी डिसेंबर २०२४, त्यानंतर मे आणि जून २०२६ असे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. मात्र आता विद्याविहार आरओबीसाठी ऑक्टोबर २०२६चे लक्ष्य आहे.
या विलंबामुळे वाहनचालक आणि स्थानिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
-
विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या ट्रेन मधून प्रवाशाचा दारू पीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या ट्रेन मधून प्रवाशाचा बॉटलमध्ये दारू पीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका जागरूक प्रवाशाने दारू पीत असलेल्या प्रवासी व्यक्तीचा व्हिडिओ काढून प्रसार माध्यमावर व्हायरल केला. विरारच्या रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन वरून 11:50 ची चर्चगेटला जाणाऱ्या रेल्वेत दारू पीत असल्याचा प्रकार समोर आला होता. त्या प्रवासी व्यक्तीने काचेच्या बॉटलमध्ये दारू प्यायली आणि रेल्वे रुळांवरच ती दारूची बॉटल टाकल्याचे व्हिडिओ दिसून आलं. यामुळे खळबळ माजली आहे.
-
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातील 11 विभागातील सुट्ट्या रद्द
हिंगोली- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातील 11 विभागातील सुट्ट्या रद्द होणार. महसूलमंत्री चंद्र शेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. अकरा विभागांना दुष्काळ हाताळा लागतो. तलाठी -ग्रामसेवक कृषी साह्यक यांनी गावात राहायचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश
-
ठाकरेंच्या मोर्चाचे आमंत्रण आले तर विचार करू- वर्षा गायकवाड
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ४ ऑक्टोंबर २०२६ रोजी राज आणि उद्धव ठाकरे यांचा महामोर्चा आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादी शरद पवार गटही हजर राहणार आहे. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी ठाकरेंच्या मोर्चाचे आमंत्रण आले तर विचार करू असे विधान केले.
-
पंकजा मुंडेंच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात वयोवृद्ध शेतकऱ्याने फोडला टाहो
राज्याच्या पर्यावरण मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री आज दुष्काळ पाहणी दौऱ्यासाठी बदनापूर तालुक्यातल्या कडेगाव आणि गेवराई शिवारात सोयाबीन पिकांची पाहणी करण्यासाठी पोहोचल्या होत्या. त्यावेळी पंकजा मुंडे सोयाबीनच्या शेतामध्ये दाखल होताच कडेगाव येथील दोन वयोवृद्ध शेतकऱ्यांना पंकजा मुंडे समोरच रडू कोसळलं
-
गाव विकायला काढल्याचा लावला डिजीटल फलक
दुष्काळाची दाहकता वाढत आहे. अशातच पाणी नसल्यामुळे माढा तालुक्यातील तुळशी गाव विकायला काढले आहे. तुळशी गावातील तरुणांनी व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन ग्रामपंचायतीसह संपूर्ण गावात गाव विकणे आहे. अशा आशयाचे बोर्ड पाण्यासाठी लावले आहेत.
-
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर ठाकरे गटाचा मोर्चा
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर ठाकरे गटाचा मोर्चा. मोर्चाला ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, आमदार नितीन देशमुख, आमदार गजानन लवटे सहा ठाकरे गटाचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित.
-
राज्यातील विद्यार्थ्यांनी एआय शिकावं म्हणून संस्थेची स्थापना- शरद पवार
राज्यातील विद्यार्थ्यांनी एआय शिकावं म्हणून संस्थेची स्थापना केली. AI शिकण्यासाठी पहिली संस्था मी स्थापन केली, असंही शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.
-
तात्काळ मदत दिली तरच शेतकरी वाचेल- शरद पवार
सरकारने शेतकऱ्यांचे हात बळकट करणं गरजेचं आहे. शेतकरी संकटात असून सरकार नवे निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. तात्काळ मदत दिली तरच शेतकरी वाचेल. मंत्र्यांना आम्ही नवीन प्रस्ताव पाठवला आहे. आम्ही नुकसानग्रस्तांसाठी रस्त्यावर उतरायलाही तयार आहोत, असं शरद पवार म्हणाले.
-
राष्ट्रवादी पक्षाचे नेते पुढील तीन महिने राज्यभर दौरे करणार- शरद पवार
सरकारने घेतलेले निर्णय पुरेसे नाहीत. राष्ट्रवादी पक्षाचे नेते पुढील तीन महिने राज्यभर दौरे करणार आहेत. सध्या शेतकऱ्यावर मोठं संकट असून जनावरांसाठी चारा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा. राज्यातील दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर आहे, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
-
तुकाराम मुंढेंना संजय राऊतांकडून पत्र; छगन भुजबळांची प्रतिक्रिया
“तुकाराम मुंढे ही एकच व्यक्ती आहे. त्यांच्या हाताखाली कामं करणारी शेकडो लोकं आहेत. अधिकारी काही वेळेला डिपार्टमेंटचं चांगलं नाव होत असताना चुकीच्या मार्गाने जातात. त्यामुळे ते डिपार्टमेंटचंही नाव खराब करतात. तुकाराम मुंडे यांचंही नाव खराब करतात. अशा काही तक्रारी आल्या असतील तर त्या संबंधितांनी थेट तुकाराम मुंढे यांना कळवाव्यात. माझी खात्री आहे ते फार कडक कारवाई करतील,” अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी संजय राऊतांच्या पत्रावर दिली.
-
राग व्यक्त करणं स्वाभाविक आहे; व्हायरल ऑडिओवर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया
“राग व्यक्त करणं स्वभाविक आहे. कारण 16 पैकी 2 तालुके वगळले आहेत,” अशी प्रतिक्रिया व्हायरल ऑडिओ क्लिपवर माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. मराठवाड्यातील केवळ नांदेड जिल्ह्यातील मुदखेड आणि मुखेड हे दोन तालुके दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आले आहेत. अशोक चव्हाण यांच्या एका कार्यकर्त्याने याबाबत फोन करून चव्हाण यांना विचारणा केली होती.
-
जळगाव जिल्हा हादरला; चाळीसगावात 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार
जळगावातील चाळीसगावात 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. आईसोबत मदतीसाठी कामावर गेलेल्या ठिकाणी पीडितेवर अत्याचार झाला. कामाच्या ठिकाणाहून आई पाणी भरण्यासाठी घरी गेल्याची संधी साधून आरोपींनी अत्याचार केला. याप्रकरणी बीएनएस कलम 70(2) आणि पोक्सोच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच मध्य प्रदेशातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली.
-
उद्या ठाकरे बंधूंची शिवतीर्थ निवासस्थानी पत्रकार परिषद
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे उद्या (मंगळवार, 29 सप्टेंबर) शिवतीर्थ या निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहेत. सकाळी 11.30 वाजता ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद आहे, 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मुंबईत मोर्चा आहे.
-
पुण्यात हुंड्यामुळे आणखी एक बळी
पुण्यात हुंड्यामुळे 23 वर्षांच्या गर्भवतीने जीवन संपवलं. वैष्णवी प्रवीण जरांडे असं महिलेचं नाव आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
-
उज्जैनमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शाही मशीद हटवण्यास विरोध
उज्जैनमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शाही मशीद हटवण्यास विरोध करण्यात येत आहे. याप्रकरणी दगडफेक होताच पोलिसांकडून अश्रूधुरांच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला. शाही मशीद हटवण्यास विरोध करताना जमावाने दगडफेक केली.
-
पुण्यात संगीता तिवारींचं रूपाली चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन
राष्ट्रवादी सुनेत्रा पवार गटाच्या नेत्या संगीता तिवारी यांचं रूपाली चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. रूपाली चाकणकर यांची तुलना सावित्रीबाई फुले यांच्यासोबत होऊ शकत नाही. सावित्रीबाईंची प्रतिमा मलीन केलेली चालणार नाही, असं म्हणत तिवारी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी पुण्यातील गुडलक चौकात संगीता तिवारी यांचं आंदोलन सुरू आहे .
-
मनोज जरांगे वाळूचोरीच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा अजय बारस्करांचा आरोप
मनोज जरांगे वाळूचोरीच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा आरोप अजय बारस्कर यांनी केला आहे. मनोज जरांगे यांच्या जवळचे संजय कटारे यांनी वाळूचोरीचे बेकायदेशीर कामे केलीत. मनोज जरांगे यांचा सख्खा मेव्हणा यांचे नाव वाळूचोरीत आहे. तहसिलदार चंद्रकांत शेळकेंनी वाळूचोरीतील दंड माफ केला, असा आरोप बारस्कर यांनी केला.
-
सोलापुरात काँग्रेसकडून ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन
सोलापुरात काँग्रेस तर्फे ज्ञानेश कुमारांविरोधात निदर्शने झाली. भाजपच्या राजकीय फायद्यासाठी मतचोरी करणाऱ्या ज्ञानेश कुमार यांना पदावरून दूर करून तात्काळ अटक करा. तसेच त्यांच्या कार्यकाळात मतदारयादीमध्ये झालेल्या फेरबदलाची स्वतंत्रपणे समीक्षा करण्यात यावी, या मागणीसाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली.
-
…तर मंत्र्याला गाडीसकट जाळून टाकू, दुष्काळाच्या मदतीवरुन ठाकरे गट आक्रमक
शेतकऱ्यांना तातडीने मदत करा म्हणत बीडमध्ये शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत ठाकरे गटाने दुष्काळा संदर्भातील शासन निर्णयाची होळी करण्यात आली आहे. सरकारने तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करत मदत केली नाही, तर महायुती सरकारमधील कोणताही मंत्री बीड जिल्ह्यात आला, तर त्याला गाडी सकट जाळून टाकू, असा संतप्त इशारा बीडमधून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यासह शिवसैनिकांनी दिला आहे.
-
अमरावतीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. नव जागरण मनिशी व क्रांतिकारी स्मरण समितीने आंदोलन केलं. ज्ञानेश्वर कुमार यांनी राजीनामा देण्याची मागणी त्यांनी केली. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हातात एपीजे अब्दुल कलाम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग यांचे फोटो घेत ज्ञानेश कुमार यांना तुरुंगात टाकण्याच्या घोषणाबाजी करण्यात आली.
-
पुण्याच्या इंजिनियर विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी सासरच्या मंडळीवर गु्न्हा
पुण्यातील २३ वर्षीय IT इंजिनियर विवाहितेचा मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट आली आहे. या प्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुण्याच्या उंड्री-वडाचीवाडी परिसरात घटना घडली. चारचाकीसाठी ५ लाख रुपयांची अतिरिक्त मागणी केल्याचा माहेरच्यांचा आरोप करण्यात आला आहे. हुंडा प्रतिबंधक कायदा व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी काळेपडळ पोलिसांकडून तपास सुरु आहे.
-
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय महाबैठक
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय महाबैठक… बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकाराने झाली बैठक.. बैठकीत विखे, थोरात यांचेसह काळे – कोल्हे राजकीय विरोधक एकत्र येणार आहेत.
-
गडचिरोली भामरागड तालुक्यात चौथ्या दिवशी ही पूर संकट कायम
गडचिरोली भामरागड तालुक्यात चौथ्या दिवशी ही पूर संकट कायम_ चारी बाजूंनी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा असता_ पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही गावातील नागरिकांची गंभीर परिस्थिती. भामरागड तालुक्यात नेहमीच छोट्या पुलांमुळे पूर संकट व राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग बंद पडण्याची परिस्थिती निर्माण होते. यावर्षी पावसाळ्यात तिसऱ्यांदा भामरागड तालुक्याला पुराच्या फटका बसला. मागील चार दिवसापासून भामरागड तालुक्यात आणि 25 गावात पूर असल्यामुळे भाजीपाला किराणा जीवन आवश्यक वस्तूंच्या पुरवठा गावात पोहोचत नसल्यामुळे गंभीर संकट गावकऱ्यांवर आलेले आहे. पुरामुळे हात पंप व बोरवेल मध्ये गाढ पाणी येत असून पिण्याचे शुद्ध पाणी मिळेना भामरागड वासियांना अशी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. नेहमीच छत्तीसगड राज्यातही मुसळधार पाऊस झाला तर पूर परिस्थिती निर्माण होते. भामरागड तालुक्याला कुठेतरी स्थलांतर करण्यात याव्याशी मागणी स्थानिकांनी टीव्ही नाईन शी बोलताना केली. सध्या पूर ओसरत असला तरी नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे भामरागड वासियांचे जीवन सुरळीत होण्यास अजून एक आठवडा लागेल
-
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन सुरू..काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, माजीमंत्री सुनिल देशमुख उपस्थित..मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अटकेची मागणी करण्यासाठी तसेच त्यांना पदावरून त्वरित दुर करून त्यांच्या कार्यकालात मतदार याद्यांमध्ये झालेल्या फेरबदलाची स्वतंत्रपणे समिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचं आंदोलन सुरू..अमरावती जिल्हाधीकारी कार्यालया समोर हे आंदोलन आयोजित केले आहे…
-
डोंबिवली डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणात मोठी अपडेट
डोंबिवली डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणात शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंसह तीन आरोपींचा जामीन सुप्रीम कोर्टाने केला रद्द. डोंबिवली डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंसह तीन आरोपींना मोठा धक्का. हायकोर्टाच्या आदेशानंतर राज्य शासनाने दाखल केलेल्या जामीन याचिका प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाच्या कोर्ट क्रमांक २ मध्ये झालेल्या सुनावणीत चारही आरोपींचा जामीन केले रद्द. जामीन रद्द करताना चारही आरोपींना सरेंडर करण्याचे आदेश दिल्याची डॉक्टर वैभव याचे वकील अभिनय अडसूळ याची माहिती. युक्तिवादादरम्यान रमेश म्हात्रेंविरोधातील यापूर्वीच्या १८ गुन्ह्यांतील जामिनाचा मुद्दा आणि डॉक्टर मारहाण प्रकरणीचे प्रश्न उपस्थित केले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर रमेश म्हात्रेंसह चार आरोपींना पुन्हा पोलिसांसमोर शरण जावे लागणार
-
दादांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावूक
बारामती दौऱ्यावर असताना सुनेत्रा पवार बोलत असताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले, भाषण करताना त्यांचा कंठ दाटून आला, अजित पवार यांच्या आठवणीत त्या भावूक झाल्या.
-
काँग्रेसचे कार्यकर्ते थेट पोलिसांच्या व्हॅनवर
नागपुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरु असून या आंदोलन चिघळल्यामुळे आता पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली, कार्यकर्ते थेट पोलिसांच्या व्हॅनवर चढले असल्याने पोलिसांनी त्यांना व्हॅनमध्ये बंद केले.
-
पोलिसांकडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड
ज्ञानेश कुमारांविरोधात नागपुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरु आहे, या आंदोलनाला आक्रमक स्वरुप आल्याने पोलिसांनी आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे.
-
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत कोल्हापुरातही आंदोलन
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत कोल्हापुरातही आंदोलन सुरु झाले आहेत, नागपूरनंतर आता कोल्हापूरातही आंदोलन सुरु आहे. नागपूरात आंदोलन चिघळले आहे.
-
ज्ञानेश कुमारांविरोधात नागपुरात काँग्रेसकडून आंदोलनाला आक्रमक स्वरुप
ज्ञानेश कुमारांविरोधात नागपुरात काँग्रेसकडून आंदोलन सुरु आहे, या आंदोलनाला अतिशय आक्रमक रुप आले आहे, आंदोलक बॅरिगेट्सवर चढले आहेत, तर प्रतिकातम्क पुतळ्याचे दहणही आंदोलकांकडून करण्यात आले आहे.
-
ज्ञानेश कुमारांविरोधात नागपुरात कॉँग्रेसचे आंदोलन सुरु
ज्ञानेश कुमारांविरोधात नागपुरात कॉँग्रेसचे आंदोलन सुरु आहे, या आंदोलानाला आक्रमक स्वरुप प्राप्त झाल्याचे दिसत आहे. SIR च्या प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा कॉँग्रेसचा आरोप आहे.
-
साहिल वाकोडोचे वडिल आझाद मैदानावर आंदोलन करणार
IIT मधील मुलगा साहिलने जीवन संपवले होते, आता त्याच साहिल वाकोडोचे वडिल आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत, रवींद्र वाकोडे पुन्हा आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत.
-
बहुजन विकास आघाडीचे वादग्रस्त नगरसेवक आरशद चौधरी याच्या विरोधात गुन्हा दाखल
बहुजन विकास आघाडीचे वादग्रस्त नगरसेवक आरशद चौधरी याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तीन महिलांना पाठवून एका व्यावसायिकाला मारहाण करून त्याच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचा चौधरी याच्या विरोधात आरोप आहे. ज्या महिलेने मारहाण केली तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर घटना उघड झाली आहे. याबाबत पेल्हार ठाण्यात आरशाद चौधरी सह अन्य तीन महिला विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पूजा सरोज असे कार्यालयात घुसून मारहाण करत असल्याचे महिलेचे नाव आहे. आरशाद चौधरी यांनी पूजा आणि तिच्या तीन सहकारी महिलाना चेतावणी देवून मारहाण केल्याचा आरोप आहे. फैजान शेख असे मारहाण झालेल्या व्यवसायिकाचे नाव असून, आर्थिक वादाचा आरोप करून ही मारहाण केल्याचे सागण्यात आले आहे.
-
सोलापूर जिल्ह्यातील चारा बाहेर विक्री करण्यास मनाई आदेश लागू
सोलापूर जिल्ह्यातील चारा बाहेर विक्री करण्यास मनाई आदेश लागू. जिल्हाधिकारी एस कार्तिकीयन यांचे आदेश. जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यातच सोलापूर जिल्ह्यात केवळ 120 दिवस पुरेल इतकाच चारा शिल्लक असल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. जिल्ह्यातील चारा बाहेर विक्री केल्यास चारा टंचाई होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी याबाबत मनाई आदेश लागू केला आहे.
-
धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने SIR मोहीम चुकीच्या पद्धतीने राबविल्याचा आरोप
आज काँग्रेसच्या वतीने धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे आंदोलनात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करून पदावरून दूर करण्याची मागणी केली जाणार आहे. तसेच राज्य सरकारने दुष्काळासंदर्भात काढलेल्या जीआरची होळी केली जाणार आहे.दरम्यान, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट एकरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
-
वसईतील डंपिंग ग्राउंडला रविवारी मध्यरात्री भीषण आग
वसई पूर्वेकडील भोईदापाडा येथील डंपिंग ग्राउंडला रविवारी मध्यर्तीरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. डंपिंग ग्राउंडमध्ये लागलेल्या आगीमुळे परिसरातील रहिवाशी वस्तीत धुराचे कल्लोळ पसरले होते. आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने ती आटोक्यात आणण्यासाठी वसई-विरार पालिकेच्या अग्निशमन जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आज सकाळी साडे पाच च्या सुमारास आगीवर नियत्रण मिळविले आहे. मात्र डंपिंग मधील दुर्गंधीयुक्त धुरामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
-
मला एकटं पाडायचे षडयंत्र सुरु- मनोज जरांगे पाटील
दुष्काळाचं सावट असल्यानं दसरा मेळावा छोटा असेल, मला एकटं पाडायचे षडयंत्र सुरु आहे, सध्या बोलणार नाही, मला धागेदोरे शोधावे लागतील असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
-
गोरेगावमधील दोन तरुणांच्या मृत्यूनंतर BMC ॲक्शन मोडवर
गोरेगाव पूर्व राम मंदिर परिसरात दोन तरुणांच्या मृत्यूनंतर BMC ॲक्शन मोडवर आली आहे. काल सार्वजनिक शौचालयात केमिकलच्या दुर्गंधीमुळे भाविक देसाई आणि प्रभाकर धिवार या दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. तपासात समोर आले की या ठिकाणी असलेली साई इलेक्ट्रोप्लेट कंपनी जिथे केमिकलचा वापर होत होता तो गाळा आणि आजूबाजूची झोपडी अवैध आहेत. त्यामुळे आज BMC ची टीम बुलडोझर घेऊन घटनास्थळी दाखल झाली असून अवैध अतिक्रमणावर तोडक कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई मोठ्या पोलीस बंदोबस्तात सुरू आहे. दरम्यान या प्रकरणी वनराई पोलिसांनी गाळा मालक नवीनभाई चावडा याला अटक केली आहे. याशिवाय, ज्या ठिकाणी काल दोन तरुणांचा मृत्यू झाला, त्याच ठिकाणी बीएमसी तोडक कारवाई करत आहे.
-
सासवड ते मांडकी नवीन एसटी सेवा सुरू
पुरंदर तालुक्यातील डोंगरदऱ्यात असलेल्या लपतळवाडी येथील विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता सासवड ते मांडकी अशी एसटी बस सेवा सुरू करण्यात आल्याने आता विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची समस्या मिटली आहे आमदार विजयबापू शिवतारे यांच्या पाठपुराव्यातून आज सासवड, वीर मार्गे मांडकी ST ची सेवा सुरू करण्यात आली.या एसटी सेवेमुळे परिसरातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांची प्रवासाची चांगल्या प्रकारे सोय झाली, अशी भावना परिसरातील सर्वांनी व्यक्त केलीय…
-
नाशिकच्या दत्त मंदिर सिग्नल वर पोलीस हवालदाराला चार चाकीने चिरडण्याचा प्रयत्न
कारचालक विरोधात उपनगर पोलिसात गुन्हा दाखल. कारचालकाने सिग्नल तोडून महिला दुचाकी स्वाराला धडक देत पोलीस हवालदाराला कारचा बोनेटवर घेण्याचा केला प्रयत्न. सिग्नल वर वाहतूक नियम मोडून भरधाव वेगात कार चालवणाऱ्या २२ वर्षीय वैभव दांडे याच्यावर सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न आणि शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल. सुसाट वेगात कार चालवणाऱ्या संशयिताचा व्हिडिओ व्हायरल
-
सिंधुदुर्गात पावसाची “एक्झिट” आणि गुलाबी थंडीची चाहूल
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सर्वत्र दाट धुके आणि थंडी पडल्याचे दिसून आले. मागील २५ ते ३० दिवस पाऊस गायब असून कालपासून सकाळच्या सत्रात गारठा वाढला असून आज तर सर्वत्र दाट धुके पाहायला मिळाले. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पावसाची “एक्झिट” आणि गुलाबी थंडीची चाहूल दिसू लागलीय. प्रामुख्याने कोकणात ऑक्टोबर अखेर किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला थंडीचे आगमन होते. मात्र, सप्टेंबरमध्येच थंडी दाखल झाल्याने हवामान बदलाचा परिणाम जाणवू लागला आहे
-
चंद्रपुरात ओव्हरलोड वाळू हायवावर महसूल प्रशासनाची धडक कारवाई
उल्हासनगरहून पुण्याला निघालेल्या आईच्या डोळ्यांसमोर 3 वर्षीय मुलाला फिट; इंद्रायणी एक्सप्रेस थांबवून वाचवला जीव. सोलापुरातून तुळजापूर-धाराशिवला पाणी देण्याला मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध. रक्ताचे पाट वाहिले तरी चालतील पण आम्ही घाटणे बॅरेजमधील पाणी धाराशिवला देणार नाही
-
रोहित पवारांनी अजित पवारांना उद्देशून भावनिक ट्विट
तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव सुना सुना” असल्याचं म्हटलं.अजित पवारांसाठीचा आपला लढा थांबलेला नसल्याचंही रोहित पवारांनी स्पष्ट केलं. निवडणूक आयोगाबाबत देशपातळीवर आणि राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीमुळे आजची पत्रकार परिषद पुढे ढकलल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या १० ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन काही ‘मफलरीं’चे खुलासे करणार असल्याचं रोहित पवारांनी ट्विटमध्ये म्हटलं.
-
वागळे इस्टेटमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; हिंदी अभिनेत्रीला अटक
ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची मोठी कारवाई. वागळे इस्टेट परिसरातील बार अँड रेस्टॉरंटमध्ये पोलिसांचा सापळा. हिंदी वेबसिरीज आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलेल्या अभिनेत्रीला अटक. पोलिसांच्या कारवाईत दोन महिलांची सुटका. अभिनेत्रीने तब्बल १० वेबसिरीज आणि ३ भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केल्याची माहिती. महिला व मुलींना वेश्या व्यवसायासाठी आणणार असल्याची पोलिसांना मिळाली होती माहिती
-
कुंभमेळ्याची बदनामी करणाऱ्यांविरोधात देशव्यापी जनजागृतीची संत-महंतांची मागणी
नातन धर्माच्या विकासासाठी राज्य सरकारने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. नाशिकमध्ये आयोजित दोन दिवसीय ‘ज्ञानकुंभा’चा उत्साहात समारोप… जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहारसह महाराष्ट्रातील संत-महंतांची ज्ञानकुंभाला उपस्थिती दर्शवली. धर्मरक्षण, संस्कृती संवर्धन आणि कुंभमेळ्याचे वैभव जपण्यासाठी व्यासपीठावरून मंथन केलं. कुंभमेळ्याचे महत्त्व देशभर पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहे. गोदावरी, नर्मदा, यमुना आणि सरस्वतीचा संगम पुण्यतीर्थ; नाशिक तीर्थक्षेत्राला दंडक जनक रामतीर्थ म्हणून महत्त्व असल्याचा संतांचा दावा… कुंभमेळ्याबाबत सकारात्मक विचार देशभर रुजवण्यासाठी ज्ञानकुंभाचा प्रभावी उपयोग करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.लसंत-महंतांनी एकत्र येत कुंभमेळ्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले आहे.
-
उल्हासनगरहून पुण्याला निघालेल्या आईच्या डोळ्यांसमोर 3 वर्षीय मुलाला फिट
मुंबई–पुणे 22105 इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये 25 सप्टेंबर रोजी सकाळी थरारक घटना घडली. उल्हासनगरच्या प्रतिभा नागनाथ फुंदे या 3 वर्षीय मुलगा यश आणि भावासह पुणे जिल्ह्यातील पाथर्डीकडे निघाल्या होत्या. कर्जत स्थानक सुटल्यानंतर काही मिनिटांतच 102 अंश तापामुळे यशला फिट आली आणि तो बेशुद्ध पडला. आई आणि नातेवाईक घाबरले असताना डब्यातील प्रवासी मदतीसाठी पुढे सरसावले अशात परिस्थितीचे गांभीर्य ओळखत रक्षा सामाजिक संस्थेचे भूषण हजारे यांनी गुंडगेजवळ आपत्कालीन चैन ओढून एक्सप्रेस थांबवली. रेल्वे थांबताच राहुल गुप्ता यांच्या मदतीने चिमुकल्याला तातडीने कर्जतमधील डॉ. जैन यांच्या बालरुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थानिक नगरसेवक महेंद्र चंदने यांनीही डॉक्टरांशी संपर्क साधून उपचाराची पूर्वतयारी केली. वेळेत उपचार मिळाल्याने यशची प्रकृती स्थिर झाली; दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळाला आणि एका चिमुकल्याचा जीव वाचला.
-
चंद्रपुरात ओव्हरलोड वाळू हायवावर महसूल प्रशासनाने धडक कारवाई
चंद्रपूर मुख्यालय ते मूल या मार्गावर रात्रभर चाललेल्या कारवाईने नियमभंग करणाऱ्या वाळू वाहतूकदारांना धडकी भरली आहे. कारवाईत विविध जिल्ह्यातील 12 हायवा जप्त करण्यात आले आहे. सुमारे 1 कोटी रु चा मुद्देमाल जप्त, करण्यात आला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तांत्रिक चमुच्या मदतीने दंडाचे मूल्यमापन केले जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात यामुळे जप्त केलेल्या हायवाची रांग लागली आहे.
-
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सहकार्याला महसूल विभागाचा मोठा दणका
अंबड तालुक्यातल्या साष्ट पिंपळगाव आणि डोमलगाव येथील गोदावरी नदीपात्रातील 2012 अवैध वाळू उत्खनन प्रकरणात महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे,मनोज जरांगे यांचे विश्वासू असलेले सहकारी संजय नानासाहेब कटारे यांच्या दहावीच्या कोटी 90 लाख 72 हजार दोनशे रुपयांचा दंडात्मक कारवाईतून वगळणारा तत्कालीन तहसीलदाराचा सुधारित आदेश अंबडचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी रद्द करत हा मोठा दणका दिला आहे. त्यामुळे मूळ दंडात्मक आदेश पूर्ववत होऊन गट क्रमांक 265 वर हा बोजा कायम असणार आहे. स्वास्थ पिंपळगाव आणि डोमलगाव येथील गोदावरी नदीपात्रात 2000 ब्रास अवैध वाळू उत्खनन झाल्या प्रकरणी 24 मार्च 2023 रोजी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याच्या संयुक्त पथकाने पंचनामा केला होता. त्या आधारित तत्कालीन तहसीलदारांनी 18 जणांवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत 4 कोटी 90 लाख 72 हजार 200 रुपयांचा दंड ठोठावला होता. दरम्यान अंबडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी हा आदेश रद्द केल्याने जरांगेच्या सहकाऱ्याला मोठा दणका बसलाय…
-
गोंदिया : आमगावात धुक्याची चादर
गोंदिया येथील आमगावात धुक्याची चादर पसरली आहे. निसर्गाचा मनमोहक अविष्कार याठिकाणी पाहायला मिळत आहे. पहाटे आमगावकरांना थंड हवेच्या ठिकाणाचा फील अनुभवायला मिळाला आहे. नयनरम्य दृश्य अनेकांना मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले आहेत.
-
दुपदरीकरणाला वेग पाच वर्षांत कोकण रेल्वेवर शंभरहून अधिक गाड्या
मुंबई, कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी आणि मालवाहतूक क्षमता वाढविण्यासाठी दुपदरीकरणाच्या कामाला वेग देण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षात या मार्गावर दररोज १००हून अधिक गाड्या चालविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दुपदरीकरणासाठी पेडणे आणि जुनेगोवे येथे नव्या बोगद्यांचे काम हाती घेण्यात येणार असून, त्यासाठी रेल्वे मंत्रालयाने आवश्यक निधी मंजूर केला आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी पणजी येथे दिली.
-
विसर्जनानंतर २,७५४ टन मूर्ती साहित्याचे संकलन! पर्यावरण रक्षणासाठी पालिकेचं पाऊल
मुंबई, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जलस्रोतांचे संरक्षण आणि न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत महापालिकेने विसर्जनोत्तर कचरा व मूर्ती साहित्याच्या व्यवस्थापनात मोठे यश मिळवले आहे. १६ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मुंबईत एकूण २,७५४.८५ मेट्रिक टन विसर्जनोत्तर मूर्ती साहित्याचे संकलन करून ७०७वाहनांच्या फेऱ्यांद्वारे ते सुरक्षितपणे तात्पुरत्या साठवणूक केंद्रात हलवण्यात आले आहे.
-
एसआरआयटी’चा आयपीओ आजपासून बाजारात
मुंबई आयटी आणि आयटीशी संबंधित विविध सेवा पुरवणाऱ्या एसआरआयटी इंडिया कंपनीचा आयपीओ २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होत आहे. या आयपीओसाठी १२३ ते १३० रुपये असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. पाच रुपये दर्शनी मूल्याच्या या शेअरच्या आयपीओमध्ये किमान ११५ शेअरसाठी गुंतवणूक करावी लागेल. हा आयपीओ २१८ कोटी ४० लाख रुपयांचा आहे. यामध्ये ५० टक्के वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, ३५ टक्के सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी, तर १५ टक्के बिगर संस्थात्मक बड्या गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे. आयपीओतून उभारलेल्या रकमेतून कंपनीच्या व्यवस्थांचे आधुनिकीकरण आणि पुनर्विकास केला जाणार आहे.
-
मलेरियाचे संकट गडद मुंबईतील रुग्णसंख्या नऊ हजारांवर; ४१ टक्क्यांनी वाढ
मुंबईत यंदा मलेरियाच्या रूग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. २१ सप्टेंबरपर्यंत मुंबईत मलेरियाचे ९ हजार २९८ रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत ६ हजार ५९० रुग्णांची नोंद झाली होती. त्यानुसार वर्षभरात रुग्णसंख्येत सुमारे ४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात आतापर्यंत १७ हजार ३४२ रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी ५ हजार ६१८ रुग्णांना प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम या प्रकारच्या मलेरियाची लागण झाली आहे.
Published On - Sep 28,2026 8:05 AM
