AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नातीसमोरच सासऱ्याने सुनेचा काटा काढला, कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल !

पुण्यातील खेडमध्ये नात्यांना काळिमा फासणारी घटना घडली आहे. सासऱ्याने सुनेसोबत जे केले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

नातीसमोरच सासऱ्याने सुनेचा काटा काढला, कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल !
सासऱ्याने सुनेचा काटा काढलाImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jun 01, 2023 | 8:35 AM
Share

पुणे : खेड तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सासऱ्याच्या अनैतिक संबंधाला विरोध करत होती म्हणून सासऱ्याने सुनेचा काटा काढल्याची घटना खेड तालुक्यातील वाफगाव येथे घडली आहे. धक्कदायक म्हणजे नातीसमोरच सासऱ्याने हे कृत्य केले. मेघा रंगनाथ कोळी असे मृत झालेल्या सुनेचे नाव आहे. तर दिनकर कोळी असे नराधम सासऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी दिनकर कोळी याच्यावर राजगुरुनगर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येच्या घटनेने संपूर्ण खेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सासऱ्याने केलेल्या कृत्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी दिनकर कोळी याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध सुरु होते. मात्र हे संबंध दिनकर यांची सून मेघा हिला मान्य नव्हते. याबाबत तिने सासऱ्याला अनेकदा विरोधही केला होता. मात्र दिनकर ऐकत नव्हते. सासरा त्या महिलेकडे जात असताना सुनेने त्यांना हटकले. मात्र सासऱ्याला राग अनावर झाला आणि त्याने सुनेची हत्याच केली. ज्यावेळी हत्या केली त्यावेळी त्याची सात वर्षांची चिमुकली नात समोर होती. तिने पोलिस जबाबात ही माहिती दिली आहे.

राजगुरुनगर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी दिनकर कोळी याच्यावर राजगुरुनगर पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे. सासऱ्याच्या अनैतिक संबंधामुळे सात वर्षाची चिमुरडी आईच्या मायेला पोरकी झाली आहे.

Follow Us
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....