पती घरी जेवायला आला तर जेवण तयार नव्हते, मग संतापलेल्या पतीने पत्नीला रुममध्ये कोंडले अन्…

दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. कामानिमित्त दोघे परगावी राहत होते. संसार सुरळीत सुरु होता. मात्र अचानक जे घडलं त्याने सर्वांनाच धक्का बसला.

पती घरी जेवायला आला तर जेवण तयार नव्हते, मग संतापलेल्या पतीने पत्नीला रुममध्ये कोंडले अन्...
क्षुल्लक कारणातून दोन कुटुंबात हाणामारी
| Updated on: Jun 29, 2023 | 11:05 AM

सोनीपत : हरयाणात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीने वेळेत जेवण बनवले नाही म्हणून पतीने चक्क आयुष्यच संपवल्याची घटना सोनीपत येथे घडली. अहताशाम असे मयत तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलीस पुढील तपास करत आहेत. केवळ जेवणाच्या क्षुल्लक कारणातून तरुणाने जीवन संपवले की आणखी काही कारण होते याचाही पोलीस सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेला अहताशाम हा कामानिमित्त हरयाणातील सोनीपतला आला होता. सोनीपतमधील सेवली गावात तो पत्नीसह भाड्याच्या घरात राहतो. अहताशाम एका फॅक्टरीत काम करत होता. दोन महिन्यांपूर्वीच अहताशामचे लग्न झाले होते. दुपारी जेवणाच्या सुट्टीत तो घरी जेवायला यायचा. नेहमीप्रमाणे तो दुपारी घरी जेवायला आला, मात्र पत्नी घरकामात व्यस्त असल्याने तिने जेवण बनवले नव्हते. यामुळे चांगलाच संतापला.

पत्नीला एका खोलीत डांबले आणि जीवन संपवले

संतापाच्या भरात त्याने पत्नीला एका खोलीत डांबले आणि दुसऱ्या खोलीत स्वतः जीवन संपवले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. अहताशामच्या आत्महत्येमुळे त्याच्या पत्नीवर आणि कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. क्षुल्लक कारणातून तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याने एकच खळबळ उडाली आहे.