रोजच्या कटकटीला कंटाळला, अखेर पत्नीचा काटा काढला; शेवटी ‘असा’ झाला उलगडा

अडाजन पोलीस ठाण्याअंतर्गत सोमेश्वर सोसायटीत पटेल दाम्पत्य राहत होते. बुधावारी रात्री वैशाली पटेल ही 37 वर्षीय महिला राहत्या घरी मृतावस्थेत आढळली. पतीने पोलिसांना फोन करुन पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती दिली.

रोजच्या कटकटीला कंटाळला, अखेर पत्नीचा काटा काढला; शेवटी असा झाला उलगडा
पती-पत्नीच्या वादातून मुलीला जाळले
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Sep 16, 2022 | 10:47 PM

गुजरात : मानसिक रुग्ण असलेल्या पत्नीपासून सुटका करण्यासाठी पतीने पत्नीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील सूरतमध्ये उघडकीस आली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पोलिसांना माहिती देत आत्महत्या (Suicide) केल्याचा बनाव केला. मात्र शवविच्छेदन अहवालामुळे त्याचा हा प्रयत्न निष्फळ ठरला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक (Arrest) केले आहे. दिनेश पटेल असे आरोपी पतीचे नाव आहे, तर वैशाली पटेल असे मयत पत्नीचे नाव आहे.

अडाजन पोलीस ठाण्याअंतर्गत सोमेश्वर सोसायटीत पटेल दाम्पत्य राहत होते. बुधावारी रात्री वैशाली पटेल ही 37 वर्षीय महिला राहत्या घरी मृतावस्थेत आढळली. पतीने पोलिसांना फोन करुन पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

पतीने पोलिसांसमोर कथन केली खोटी कहाणी

आपण अडानी कंपनीत मेंटेनन्स विभागात असिस्टंट मॅनेजर आहोत. मी घरी झोपलो असताना पत्नी मुलीच्या शाळेत प्रिन्सिपलला भेटण्यासाठी गेली होती. शाळेतून घरी आल्यानंतर घरकाम करुन हॉलमध्ये झोपली होती. मात्र रात्री 8 वाजपर्यंत उठली नाही म्हणून तिला उठवण्यास गेलो तर ती मृतावस्थेत पडली होती.

शवविच्छेदन अहवालात हत्या झाल्याचे निष्पन्न

शवविच्छेदनावेळी महिलेच्या गळ्यावरील खुणा पाहून डॉक्टर आणि पोलिसांना संशय आला. गुरुवारी सकाळी डॉक्टरांनी महिलेचे शवविच्छेदन केल्यानंतर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर डॉक्टरांनी पती दिनेश पटेलला ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी केली. चौकशीत पतीने आपला गुन्हा कबुल केला. पोलिसांनी त्याला अटक केले.

पत्नीपासून सुटका करण्यासाठी उचलले टोकाचे पाऊल

पत्नी गेल्या तीन वर्षापासून मानसिक आजाराने त्रस्त होती. त्यामुळे ती छोट्या छोट्या कारणावरुन पतीशी भांडण करायची. यामुळे पती तिला कंटाळला होता. पत्नी घटस्फोट देण्यासही तयार नव्हती. तीन वर्षापासून तो पत्नीपासून सुटका करु पाहत होता. यातूनच त्याने हे कृत्य केल्याची कबुली पोलीस चौकशीत दिली.

बुधवारी शाळेतून आल्यानंतर वैशाली मुलीच्या अभ्यासावरुन पतीशी भांडण करु लागली. रागाच्या भरात तिने पतीला स्कूल बॅगही फेकून मारली. यामुळे रागाच्या भरात पतीने तिला संपवले.