Mira Road Murder : सरस्वतीचा संपूर्ण मृतदेह मिळालाच नाही; आता बहिणीच करणार तुकड्यांचे अंत्यसंस्कार

| Updated on: Jun 12, 2023 | 2:07 PM

मुंबईसह राज्यात खळबळ माजवून देणाऱ्या सरस्वती वैद्य हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे आरोपी करत आहे. पोलिसांकडून आरोपीचा जबाब नोंदवण्याचे काम सुरु आहे.

Mira Road Murder : सरस्वतीचा संपूर्ण मृतदेह मिळालाच नाही; आता बहिणीच करणार तुकड्यांचे अंत्यसंस्कार
सरस्वती वैद्यच्या मृतदेहावर बहिणी करणार अंत्यसंस्कार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : मीरा रोड येथील सरस्वती वैद्य हत्याकांडाचा तपास वेगाने सुरू आहे. मात्र, आरोपी मनोज साने वारंवार साक्ष फिरवत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. मनोजने सरस्वतीच्या मृतदेहाचे 100हून अधिक तुकडे केले. वेगवेगळ्या ठिकाणी या तुकड्यांची विल्हेवाट लावली. सोसायटीच्या मागच्या नाल्यातही त्याने सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे फेकले होते. पोलिसांनी या संपूर्ण नाल्यात सर्च ऑपरेशन केले. पण पोलिसांच्या हाती फार काही लागलं नाही. घरातून जेवढे तुकडे मिळाले, त्या व्यतिरिक्त पोलिसांच्या हाती काहीच लागलं नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, आता जेवढे तुकडे आहेत, तेवढ्यांवरच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सरस्वतीच्या बहिणी अंत्यसंस्कार करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मृतदेहाचे तुकडे घेण्यासाठी बहिण जे.जे. रुग्णालयाकडे रवाना

आज मयत सरस्वती वैद्यच्या DNA तपासणीसाठी पाठवले जाणार आहे. मयत सरस्वती वैद्यची तीन बहिणी तिचा मृतदेह घेण्यासाठी मीरा रोडच्या नया नगर पोलीस ठाण्यातून जे.जे.रुग्णालयाकडे रवाना झाले आहेत. आरोपी मनोज सानेने मयत सरस्वती वैद्यचे शरीराचे काही तुकडे इमारती जवळ असलेल्या नाल्यात फेकले होते. पोलिसांनी त्या जागेवर रविवारी संध्याकाळी सर्च आपरेशन केलं. पोलिसांना घटनास्थळी घरातून काही औषधही जप्त केला आहे.

हत्या प्रकरणात आरोपीकडून रोज नवेनवे खुलासे

आरोपी मनोज साने मयत सरस्वती वैद्य याच्याशी वसईच्या तुंगारेश्वर मंदिरात लग्न केलं होतं. सरस्वती वैद्य हत्येप्रकरणी आरोपी मनोज साने वारंवार आपला जबाब बदलत आहे. मीरा रोड येथील सरस्वती वैद्य हत्या प्रकरणातील आरोपी मनोज साने रोज नवनवे खुलासे करत आहे. मीरा रोडच्या नयागर परिसरातील गीता आकाशदीप सोसायटीत मयत सरस्वती वैद्यची हत्या आणि मृतदेहाचे तुकडे तुकडे करून विल्हेवाट लावण्याची घटना 7 जून रोजी उघडकीस आली होती.

हे सुद्धा वाचा