Video : अकोल्यातले चोर “तिसऱ्या डोळ्याला”ही घाबरेनात, चोरांच्या रडारावर आता मंदिरातल्या दानपेट्या

तिसरा डोळा म्हणजे सीसीटीव्हीलाही (Cctv) अकोल्यातले चोर घाबरेना झालेत. कारण आता अकोलातली मंदिरं चोरांच्या टार्गेटवर आली आहेत. चोरांनी थेट मंदिरातल्या दानपेट्यावर डल्ला मारायला सुरूवात केली आहे.

Video : अकोल्यातले चोर तिसऱ्या डोळ्यालाही घाबरेनात, चोरांच्या रडारावर आता मंदिरातल्या दानपेट्या
चोरांच्या टार्गेटवर मंदिरं
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Mar 17, 2022 | 7:27 PM

अकोला : माणूस कुणाला घाबरू ना घाबरू मात्र देवाला तरी घबरतो, असे आपण नेहमी म्हणतो. मात्र अकोल्यातले चोर ना (Akola Crime) पोलिसांना घाबरताहेत ना देवांना (Gajanan Mahraj tempal) . दोन्ही सोडलं तरी तिसरा डोळा म्हणजे सीसीटीव्हीलाही (Cctv) अकोल्यातले चोर घाबरेना झालेत. कारण आता अकोलातली मंदिरं चोरांच्या टार्गेटवर आली आहेत. चोरांनी थेट मंदिरातल्या दानपेट्यावर डल्ला मारायला सुरूवात केली आहे. अकोल्यातील मोठी उमरी भागातील राजाराम नगर परिसरात सध्या चोरांचा सुळसुळाट उटला आहे. याच परिसरातल्या गजानन महाराज मंदिरात चोरट्यानी लोखंडी गजाच्या साह्याने कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करत दानपेटी फोडली. त्यामुळे आता मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या अनेक दिवसात अशा अनेक चोऱ्या या परिसरात झाल्या आहेत. त्यामुळे पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे.

चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

भक्तांच्या देणगीवर चोरट्यांचा डल्ला

दरम्यान चोरट्यांनी दानपेटीतील मोठी रक्कम चोरून नेले. मात्र चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. काही दिवसांपूर्वी गजानन महाराज यांचा प्रगट दिन उत्सव साजरा झाला या काळात भक्तांनी मोठ्या प्रमाणात दान दिलेली रक्कम चोरट्यानी चोरून नेली आहे. दरम्यान चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्हीद्वारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. चोरीच्या घटनेमुळे परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

चोर सीसीटीव्हीलाही घाबरेनात

ज्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्याही भागात आता चोरीच्या घटना वाढल्या आहे. या मंदिरात सीसीटीव्ही आहे याची कल्पना चोरट्यांना असूनही त्यांनी चोरी केल्याचे धाडस केले आहे. त्यामुळे या धाडसी चोरांना आता कुणाचाही धाक नाही उरला असंच दिसतंय. आता थेट मंदिरात चोऱ्या सुरू झाल्याने स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहे. या परिसरात गस्त तर वाढवाच मात्र लवकरात लवकर या चोरांच्या मुसक्या आवळा अशीही मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे चोरांना लवकरात लवकर पकडण्याचे आणि या भागातील चोरीच्या घाटना थांबवण्याचे आवाहन अकोला पोलिसांपुढे असणार आहे.

 

West Bengal Crime: पश्चिम बंगालमध्ये तस्करांच्या मनसुब्यावर पाणी, 40 सोन्याची बिस्कीटं जप्त

Yeola | पैठणीच्या माहेरघरात 3 महाराणी पैठणींची चोरी! महिला चोर CCTV कॅमेऱ्यात कैद

Nagpur | अर्धवट जळलेल्या तरुणीच्या मृतदेहाचं गूढ उकललं! आत्महत्या केल्याचं उघड, का दिला जीव?