मी मनसे आमदार राजू पाटील यांचा भाचा सांगत फसवणूक करायचा, सराईत चोरटा जेरबंद

मनसे आमदार राजू पाटील यांचा भाचा असल्याची बतावणी करत फसवणूक करणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण, डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई, मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात 50 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मी मनसे आमदार राजू पाटील यांचा भाचा सांगत फसवणूक करायचा, सराईत चोरटा जेरबंद
कल्याणमध्ये सराईत चोरटा गजाआड
| Updated on: Jul 18, 2024 | 9:59 PM

कल्याण डोंबिवलीत सध्या चोरट्यांचा प्रचंड हैदोस बघायला मिळतोय. कल्याण पू्र्वेच्या कोळशेवाडीत मध्यरात्री रहदारीचा परिसर असणाऱ्या मुख्य रस्त्यावर दुकानाची शटर तोडून जबरी चोरी केल्याची घटना घडली. यानंतर आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आपण मनसे आमदार राजू पाटील यांचा भाचा आहोत असं खोटं सांगून एक सराईत चोरटा अनेकांची फसवणूक करत होता. तो वृद्धांना आपल्या जाळ्यात गुंतवायचा. त्यांच्याशी गोड बोलून नकळत त्यांच्याकडील पैसे आणि दागिने लंपास करायचा. अखेर या चोरच्याचा पापांचा घडा भरला. कारण पोलिसांनी या सराईत चोरट्याला अटक केली आहे.

मनसे आमदार राजू पाटील यांचा भाचा असल्याची बतावणी करत फसवणूक करणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण, डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई, मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात 50 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी या चोरट्याला कठोरता कठोर शिक्षा करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं?

वृद्ध इसमांना गाठत मी मनसे आमदार राजू पाटील यांचा भाचा आहे. मला ओळखलंत का? असे बोलून त्यांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने वृद्ध इसमाजवळील पैसे, सोन्याचे दागिने घेवुन पसार होणाऱ्या एका भामट्याला विष्णू नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विजय तांबे असे या भामट्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात कल्याण, डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई, मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात 50 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. सध्या पोलिसांनी डोंबिवलीतील एक वयोवृद्ध व्यक्तीच्या तक्रारी नंतर मुंबई खारघर परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत.