सराफाच्या कानावर बंदूक रोखली, जीवे मारण्याची धमकी देत लाखोंचे दागिने लुटले, जळगावात भर दुपारी थरार

| Updated on: Jul 07, 2021 | 4:36 PM

जळगावच्या यावल शहरात भर दिवसा एका सराफ व्यावसायिकाच्या कानावर बंदूक ठेऊन चार दरोडेखोरांनी सराफ दुकानातून लाखो रुपयांचे दागिने पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Thieves loot jewellery by threatening jewellers owner with gun in Jalgaon).

सराफाच्या कानावर बंदूक रोखली, जीवे मारण्याची धमकी देत लाखोंचे दागिने लुटले, जळगावात भर दुपारी थरार
सराफाच्या कानावर बंदूक रोखली, जीवे मारण्याची धमकी देत लाखोंचे दागिने लुटले, जळगावात भर दुपारी थरार
Follow us on

जळगाव : जळगावचं सोनं हे प्रख्यात आहे. त्यामुळे जळगावात सोन्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. पण जळगावातील सोने विक्रेते सुरक्षित नसल्याची माहिती समोर आली आहे. जळगावच्या यावल शहरात भर दिवसा एका सराफ व्यावसायिकाच्या कानावर बंदूक ठेऊन चार दरोडेखोरांनी सराफ दुकानातून लाखो रुपयांचे दागिने पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटना यावल शहरातील सराफ बाजारात असलेल्या बाजीराव काशीनाथ कवडीवाले सराफ दुकानात घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही घटना आज (7 जुलै) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली (Thieves loot jewellery by threatening jewellers owner with gun in Jalgaon).

आधी तीन आरोपी आले, नंतर चौथ्याचा दुकानात प्रवेश

यावल शहरातील मुख्य बाजारपेठेत सराफ बाजारात जगदीश कवडीवाले यांच्या मालकीचे बाजीराव काशीनाथ कवडीवाले नावाचे सराफ दुकान आहे. दुकानात आज दुपारी मोजके ग्राहक खरेदीसाठी आलेले होते. दुपारी एक वाजेच्या सुमारास तीन तरुण दुकानात आले. त्यांनी सोन्याचे दागिने घेण्याचा बहाणा केला. काही मिनिटात त्यांचा चौथा साथीदार त्याठिकाणी आला (Thieves loot jewellery by threatening jewellers owner with gun in Jalgaon).

चौथ्या दरोडेखोराने दुकानदारावर बंदूक रोखली

आरोपींच्या चौथ्या साथीदाराने दुकानात वर्दळ नसल्याची खात्री केली. त्यानंतर त्याने दुकान मालक जगदीश कवडीवाले यांच्या दिशेने बंदूक रोखली. सोन्याचे दागिने काढून देण्याची मागणी करत दरोडेखोरांनी थेट कवडीवाले यांच्या कानावर बंदूक ठेवली. त्यानंतर दुकानातून सोन्याचे दागिने तसेच गल्ल्यातील काही रोकड घेऊन दरोडेखोर पळून गेले.

मुंबईच्या दहिसरमध्येही अशीच चोरी

काही दिवसांपूर्वी मुबंईच्या दहिसर भागातही अशाच प्रकारची चोरीची घटना समोर आली होती. संबंधित घटना ही 30 जूनला सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली होती. आरोपींनी सराफावर बंदूक रोखून दागिने चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. पण ज्वेलर्स मालकाने त्यांना विरोध केल्याने दरोडेखोरांनी सराफावर गोळ्या झाड्या होत्या. यामध्ये ज्वेलर्स मालकाचा मृत्यू झाला होता.

हत्येनंतर दुकानात लूट करुन तिन्ही आरोपी पसार झाले. तिन्ही आरोपी एकाच बाईकवरुन आले होते. दहिसर पोलिसांनी घटनास्थळी तपास  केला. मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटीलही घटनास्थळी जाऊन पाहणी करुन आले होते.  मुंबई पोलिसांनी मुंबईच्या सर्व एन्ट्री पॉईंट्सवर नाकाबंदी करण्याचे आदेश देत आरोपींचे सीसीटीव्ही फूटेज जारी केले होते.

संबंधित बातम्या :

आधी ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा, नंतर चेन स्नॅचिंग, आता एकाचवेळी 11 ठिकाणी चोरी, कल्याणमध्ये चोरांचा सुळसुळाट

कल्याणमधील थरार! बंदुकीचा धाक दाखवत ज्वेलर्स दुकानावर दरोडा, 30 तोळे सोन्यासह दीड लाखांची रोकड लंपास