नवीन घरासाठी त्याने चक्क 3 टीव्ही चोरले, पण पोलिसांच्या हाती लागला आणि टीव्ही पाहण्याचा आनंद अपुरा राहिला…

| Updated on: Nov 21, 2023 | 3:10 PM

नागपूरमध्ये एक अजब-गजब घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. तेथे एका चोरट्याने नवीन घर तर बांधलं, पण त्या नवीन घरात टीव्ही नाही म्हणून त्याने परत चोरी केली. घर सजवण्यासाठी त्याने चोरीचा मार्ग अवलंबला. त्याने दोन ठिकाणी घरफोडी करून चक्क 3 टीव्ही, शेगडी आणि इतर घरगुती साहित्य मिळवलं

नवीन घरासाठी त्याने चक्क 3 टीव्ही चोरले, पण पोलिसांच्या हाती लागला आणि टीव्ही पाहण्याचा आनंद अपुरा राहिला...
Follow us on

सुनील ढगे , टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 21 नोव्हेंबर 2023 : नागपूरमध्ये रोजच्या रोज गुन्ह्याच्या कोणत्या ना कोणत्या घटना घडतच असतात. कधी लूटमार, कधी घरफोडी तर कधी चोरी. यामुळे सामान्य नागरिकांची जगणं मात्र मुश्किल झालं आहे. चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसही कसून प्रयत्न करत आहेत. मात्र काही चलाख गुन्हेगार पोलिसांच्याही वरचढ दिसत आहेत.

मात्र आता नागपूरमध्ये एक अजब-गजब घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. तेथे एका चोरट्याने नवीन घर तर बांधलं, पण त्या नवीन घरात टीव्ही नाही म्हणून त्याने परत चोरी केली. घर सजवण्यासाठी त्याने चोरीचा मार्ग अवलंबला. त्याने दोन ठिकाणी घरफोडी करून चक्क 3 टीव्ही, शेगडी आणि इतर घरगुती साहित्य मिळवलं. पण घरातील त्या नव्या टीव्हीचा आनंद काही तो लुटू शकला नाही. तो टीव्ही पहायच्या आधीच पोलिसांच्या हाती लागला आणि त्याचा टीव्ही पाहण्याचा आनंद अपुरा राहिला. वाठोडा पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून अटक केली.

नवीन घर तर बांधलं, पण तरीही होता बेचैन

नागपूरमधील वाठोडा पोलिसांच्या हाती घरफोडी करणारे दोन सराईत आरोपी लागले. ते दोघेही चोरी करण्यात अतिशय तरबेज. नुकतीच त्यांनी दोन घरं फोडून बरंच सामान लांबवलं. पण त्यापैकी एक आरोपी असलेला शेख फिरोज याच्या चोरीच कारण मात्र काही वेगळंच होतं. त्याने जे सांगितलं ते ऐकून तर पोलिसही चक्रावलेच.

फिरोज हा एक सराईत चोर आहे. त्याने आत्तापर्यंत बऱ्याच चोऱ्या केल्या आहेत. त्याच कमाईतून त्याने नव, आलिशान घरं बाधलं. ती कमाई खर्च करून त्याने घरं र बनवलं, पण त्या घरात टीव्ही आणि इतर सामान काही नव्हतं. त्यामुळे तो खूप बेचैन होता. जनरली आपण नवीन टीव्ही विकत घेतो, पण फिरोजच्या डोक्यात वेगळाच प्लान शिजत होता. त्याने चक्क नव्या घरासाठी , एक टीव्ही चोरायचे ठरवले. त्यासाठीच तो त्याच्या साथीदारासह चोरी करायला निघाला. त्या दोघांनी मिळून वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन ठिकाणी घरफोडी केली आणि तेथून तीन टीव्हीसह इतर घरगुती साहित्यही चोरलं. ते सगळं सामान आणून त्याने छान घर सेट केलं, टीव्हीही लावला. पण तो टीव्ही पाहण्याआधीच तो पोलिसांच्या हाती लागला.

वाठोडा पोलिसांनी फिरोजा आणि त्याचा दुसरा साथीदार या दोघांच्याही मुसक्या आवळल्या. त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल असून पोलिस आता त्यांची चांगलीच चौकशी करत आहेत.