मुलीच्या फी चे पैसे चोरट्याने लांबवले, फरार चोरट्याचा पोलिसांकडून शोध सुरु

| Updated on: Oct 10, 2022 | 4:56 PM

संतोष ढाकणे हे आपल्या कुटुंबासमवेत शहरातील शक्ती कुंज वसाहतीतील इमारतीत राहतात. ढाकणे हे औष्णिक विद्युत केंद्रात कामाला आहेत. ढाकणे यांची पत्नी गृहिणी आहे तर मुलगी अंबाजोगाई येथे शिक्षण घेत आहे.

मुलीच्या फी चे पैसे चोरट्याने लांबवले, फरार चोरट्याचा पोलिसांकडून शोध सुरु
नशेंडीकडून दाम्पत्याला मारहाण
Image Credit source: tv9
Follow us on

संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी : फी भरण्यासाठी ठेवलेल्या पैशांसह सोन्याचे दागिने (Jewellery and Cash Theft) चोरट्याने चोरुन नेल्याची घटना बीडच्या परळी शहरातील (Parali City Beed) शक्ती कुंज वसाहतीत घडली आहे. याप्रकरणी संतोष बाळासाहेब ढाकणे यांच्या तक्रारीनुसार संभाजीनगर पोलीस ठाण्यात (Sambhaji Nagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरात कुणी नसल्याची संधी साधत चोरट्याने ढाकणे यांच्या घरी घरफोडी केली.

संतोष ढाकणे हे आपल्या कुटुंबासमवेत शहरातील शक्ती कुंज वसाहतीतील इमारतीत राहतात. ढाकणे हे औष्णिक विद्युत केंद्रात कामाला आहेत. ढाकणे यांची पत्नी गृहिणी आहे तर मुलगी अंबाजोगाई येथे शिक्षण घेत आहे.

मुलीची फी भरण्यासाठी आणले होते पैसे

मुलीची शैक्षणिक फी भरण्यासाठी ढाकणे यांनी घरी रोख रक्कम आणून ठेवली होती. ढाकणे यांच्या पत्नी मुलीला भेटण्यासाठी अंबाजोगाईला गेल्या होत्या, तर ढाकणे हे कामाला गेले होते. यामुळे घरी कुणीही नव्हते.

हे सुद्धा वाचा

दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला

अज्ञात चोरट्याने ही संधी साधून दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर कपाटातील लॉकर तोडून दोन सोन्याच्या अंगठ्या आणि 25 हजार रुपये रोख रक्कम घेऊन पोबारा केला. या घटनेमुळे ढाकणे दाम्पत्याला मुलीच्या फी चा प्रश्न सतावत आहे.

पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरु

ढाकणे कामावरुन घरी आल्यानंतर सदर घटना उघडकीस आली. यानंतर त्यांनी तात्काळ संभाजीनगर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. शहरातील शक्तीकुंज वसाहतीत झालेल्या चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.