मुंबईत सोनं चोरायचं, अन् फ्लाईटनं गाव गाठायचं, स्टाईलबाज चोर

रोज थोडं...थोडं सोनं चोरायचा चोर..नंतर मोठा हात मारला आणि विमानाने गावी गेला. लग्नासाठी सारा खटाटोप चालला होता...शेवटी लग्नाच्या बेडी ऐवजी पोलीसांच्या बेड्या हातात पडल्या.

मुंबईत सोनं चोरायचं, अन् फ्लाईटनं गाव गाठायचं, स्टाईलबाज चोर
AIR PLANE AIRImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 3:36 PM

मुंबई : मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या मालकाच्या घरातील थोडं..थोडं सोनं ( Jewellery stolen ) चोरून गावाला त्याने आलीशान घर बांधले. विशेष म्हणजे चोरी केल्यावर हा चोर थेट विमानाने ( Airplane )  बिहार गाठायचा असे उघडकीस आले आहे. या अजब चोराने विमानाने नेहमी बिहार गाठून गावी टुमदार घर बांधले होते. त्याला लग्न करायचे होते. म्हणून त्याची ही सारी धडपड सुरु होती अशी माहीती उघडकीस आली आहे. शेवटी लग्नाची बेडी पडण्याआधी पोलीसांनी त्याला बेड्या घातल्या.

मलबार हील पोलिसांनी गुड्डू महेतो याला 20 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली म्हणून अटक केली आहे. गुड्डू हा एका फॅशन डीझायनरकडे आचारी म्हणून काम करायचा. आचारी म्हणून काम करताना त्याने मालकाचा चांगलाच विश्वास जिंकला होता, त्याने अनेक वेळा मालकाचे थोडे थोडे दागिने चोरले.

मलबार हिल पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी नभाटाला दिलेल्या माहितीनूसार गुड्डू त्याच्या मालकाकडे दहा वर्षांपासून कामाला होता. त्याचं लवरकच लग्न होणार होते. त्यामुळे त्याला गावच्या घराची दुरुस्ती करायची होती. त्यामुळे त्याने फॅशन डीझायनरच्या घरातून हळूहळू सोनं चोरी करायला सुरूवात केली. फेब्रुवारी महिन्यात त्याने नोकरी सोडली. मार्च महिन्याच्या पहील्या आठवड्यात त्याच्या मालकाच्या लक्षात आले की त्याचे काही दागिने गायब आहेत. त्यानंतर मालकाने मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आरोपीकडे 17 लाख हस्तगत

पोलिसांनी तांत्रिक माहीतीच्या आधारे आरोपीचा माग काढला. तपासात आरोपीने वारंवार मुंबई ते बिहार विमानाने प्रवास केल्याचे उघडकीस आले. पोलीसांनी आरोपीकडून 17 लाख रुपये वसुल केले आहेत. गुड्डू याचे लग्न ठरले असल्याने त्याने घर बांधायला घेतले होते. परंतू त्याचा लग्नाचा प्लान पोलीसांना त्याला अटक केल्याने उध्दवस्त झाला.

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.