Murder Mystery: आधी प्रेम, मग धोका, अखेर हत्या! पोलीस लाईन कॉलनीतील तिहेरी हत्याकांडाची हादरवणारी कहाणी

| Updated on: Jul 27, 2022 | 10:45 AM

Murder Mystery : सविता गेल्या काही दिवसांपासून रामचंद्रपासून दुरावली होती. याचा रामचंद्रला संशय आला.

Murder Mystery: आधी प्रेम, मग धोका, अखेर हत्या! पोलीस लाईन कॉलनीतील तिहेरी हत्याकांडाची हादरवणारी कहाणी
खळबळजनक हत्याकांड
Image Credit source: Facebook
Follow us on

तिहेरी हत्याकांडाची (triple Murder) हादरवणारी घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे हत्याकांड पोलीस लाईन (Police News) कॉलनीत घडलं. या घटनेनं पोलिसांनाही हादरवून सोडलं. विशेष म्हणजे या हत्याकांडाची उकल करताना जो मारेकरी निघाल, तो तर पोलिसाचाच ड्रायव्हर असल्यानं आणखीनंच खळबळ उडाली. एका घरातील तीन लोक अचानक बेपत्ता झाले. त्यामुळे चिंता सतावी लागली होती. पण एका बंद घरातून अत्यंत गलिच्छ वास येत असल्यानं आजूबाजूच्यांना संशय आला. दरवाजा उघडून पाहिला, तर सगळेच हादरले. तीन मृतदेह अर्ध-कुजलेल्या अवस्थेत होते. दुर्गंधाने एखाद्याचा चक्क येईल, इतकी भीषण अवस्था होती. पोलिस लाईन कॉलनीत तिघांच्या हत्येनं खळबळ उडाल्यामुळे पोलिसांनाही धक्का बसला होता. त्यांना लगेच कळवण्यातही आलं. तपास सुरु झाला. हत्याकांडाचा उलगडाही झाला. पण या तिहेरी हत्याकांड प्रकरणी (Murder Mystery) कोण मारेकरी आहे, हे कळल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

घटना झारखंडच्या जमशेदपूर इथली आहे. एकाच घरातील तिघांचा मृतदेह आढळून आला. त्यातील एक मृतदेह हा महिला कॉन्स्टेबलचा होता. तर अन्य दोन मृतदेहांपैकी एक या महिला कॉन्स्टेबलची मुलगी आणि आई होत्या. पोलिस कॉन्स्टेबलसह तिच्या कुटुंबीयांची पोलीस लाईनमध्ये हत्या का झाली, कुणी केली, या तिहेरी हत्याकांडामागे कुणाचा हात, या सगळ्याचा पोलिसांनी लागलीच तपास सुरु केला.

घटना 21 जुलैची..

21 जुलै रोजी रात्री आठ वाजता जमशेदपूच्या पोलिस लाईनमधून कंट्रोल रुमला फोन आला. पोलिस दारावर पोहोचले. दरवाजाचा तोडून आत घुसले तर काळीज हेलावून टाकणारा नजारा पोलिसांनी पाहिला. घरात तीन मृतदेह पडले होते. त्यातल एक होता पोलीस कॉन्स्टेबल सविता हेंब्रमचा, दुसरा त्याांची आई लकिया मुर्मू यांचा तर तिसरा होता त्यांची 13 वर्षांची मुलगी गीता हीता. रक्ताच्या थारोळ्यात हे मृतदेह पडलेले होते. जवळपास तीन दिवस हे मृतदेह घरात पडून होते. सविता यांच्या पतीचा एका नक्षलवादी हल्ल्यात आधीच मृत्यू झालेला होता. दरम्यान, आता या हत्याकांडाचा छडा लावताना पोलिसांना याचे धागेदोरे प्रेमप्रकरणाशी जोडले गेले असल्याचं समोर आलं.

हे सुद्धा वाचा

विवाहीत असून प्रेम…

सविता यांचं जमशेदपूरच्या एसएसपी प्रभाक कुमार यांच्या ड्रायव्हर रामचंद्र सिंह जामुदावर प्रेम होतं. रामचंद्र विवाहीत होता. पण तरिही सविता आणि रामचंद्र यांचं सूत जुळलं होतं. रामचंद्र अनेकदा सविताच्याच घरी रात्री झोपत असे. पण सविताच्या मृत्यूचं कळल्यानंतर आपल्याला काही ठाऊकच नाही, अशा तोऱ्यात तो वागत होता. नॉर्मल आयुष्य जगण रामचंद्रने सुरु ठेवलं होतं. कुणालाही शंका येऊ नये म्हणून खरंतर तो असं वागत होता. पण पोलिसांना संशय आलाच. त्यांनी रामचंद्रचे कॉल रेकॉर्ड काढले. या कॉल रेकॉर्ड्सनी संशय अधिकच बळावला.

धोका…धोका…

19 जुलैपर्यंत तो सविताशी फोनवर बोलत होता. पण त्यानंतर अचानक बोलणं थांबलं. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी करणं सुरु केलं. यानंतर सुरुवातीला रामचंद्रने पोलिसांना गोंधळवणारी उत्तर दिलं. पण नंतर त्यानं कबुल केलं की त्यांचे हे तिहेरी हत्याकांड केलंय.

19 जुलैला रामचंद्र सविताच्या घरात घुसला. तिथे सविताशी भांडला आणि गाडीतल्या हत्यारानं सवितावर वार केले आणि तिचा जीव घेतला. सविताला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या तिच्या 13 वर्षांच्या मुलीलाही रामचंद्रने संपवलं. धक्कादायक बाब म्हणजे कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून त्याने सविताच्या आईचाही खून केला.

का केली हत्या?

सविता गेल्या काही दिवसांपासून रामचंद्रपासून दुरावली होती. याचा रामचंद्रला संशय आला. सविताची ओळख सुंदर टुडू नावाच्या एका दुसऱ्या मुलाशी झाली होती. या मुलाशी तिची जवळीक वाढली होती. सुंदरसोबत ती बराच वेळ बोलत राहायची. ही बाब रामचंद्रला खटकू लागली. एक दिवस सुंदर सविताच्या घरी येणार होता. ही गोष्ट रामचंद्रला कळली. त्याच दिवशी सुंदरचा काटा काढायचा, असं रामचंद्रने ठरवलं. त्यानं प्लान बनवला.

रात्री सुंदर येणार म्हणून रामचंद्र हत्यार घेऊन सविताच्या घरी पोहोचला. पण काही कारणास्तव सुंदरता प्लान कॅन्सल झाला आणि त्याला येणं टाळलं. पण या सगळ्यात रामचंद्र संतापला. सविताशी वाद घालू लागला. प्रेम, धोका आणि त्यानंतर थरारक हत्याकांडाने यानंतर अख्खी पोलीस लाईन हादरुन गेली. घरातील तीन व्यक्तींचा रातोरात रामचंद्रने खून केला. सगळं घर रक्ताने माखलेलं होतं. पण त्याच अवस्थेत तो रात्रभर थांबला. सकाळ होताच घरातील चावीने घर लॉक करुन तो बाहेर पडला आणि नदीत अंघोळ करुन मग घरी गेला. यानंतर जणू काही घडलंच नाहीये, अशा आवेशात तो वावरत होता. पण अखेर त्यानं केलेलं हटळकृत्य पोलिसांना कळलंच.