AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! देशातली 4 विमानतळं बंद, युद्ध सुरू असतानाच मोठी माहिती समोर

इंडिगो, एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस या प्रवासी विमान वाहतूक कंपन्यांनी 28 मार्चनंतरच्या विमान प्रवासासाठीचे तिकीट बुकिंग अगोदरच थांबवले आहे.

मोठी बातमी! देशातली 4 विमानतळं बंद, युद्ध सुरू असतानाच मोठी माहिती समोर
airport closedImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 20, 2026 | 1:18 AM
Share

Airport Closed : तुम्ही पुढच्या काही महिन्यात विमानाने प्रवास करण्याचे नियोजन करत असाल तर त्याआधी समोर आलेली महत्त्वाची माहिती जाणून घ्या. कारण येणाऱ्या काळात भारतातील एकूण चार विमानतळं काही काळासाठी बंद राहणार आहेत. या वर्षी रनवे रिपेअर करण्यासाठी हे चार विमानतळ काही काळासाठी तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये जोधूपूर विमानतळ, श्रीनगर विमानतळ, पुणे विमानतळ, अहदमपूर एअर बेस यांचा समावेश आहे. ही विमानतळे नेमकी कधी बंद असतील, ते सविस्तरपणे जाणून घेऊ या…

कोणकोणती विमानतळं बंद

मिळालेल्या माहितीनुसार जोधपूर विमानतळ येत्या 29 मार्च ते 27 एप्रिल या काळात साधारण एका महिन्यासाठी बंद असेल. या विमानतळावरून कोणतेही विमानोड्डाण होणार नाही. हीच बाब लक्षात घेऊन इंडिगो, एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस या प्रवासी विमान वाहतूक कंपन्यांनी 28 मार्चनंतरच्या विमान प्रवासासाठीचे तिकीट बुकिंग अगोदरच थांबवले आहे. दुसरीकडे श्रीनगर विमानतळावरील काही फ्लाईट्स या ऑगस्टपासून ते ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत वीकएंडपर्यंत चालू असतील. त्यानंतर 16 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत हे विमानळ पूर्णपणे बंद असेल.

आठ महिन्यांसाठी विमानतळ बंद

दुसरीकडे पुण्याच्या विमानतळावरील रनवेची डागडुगी करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. परंतु ही डागडुजी नेमकी कधी होईल, याची नेमकी तारीख समोर आलेली नाही. तर आदमूपर एअरबेस या वर्षाच्या शेवटी साधारण आठ महिन्यांसाठी बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विमानतळ बंद का राहणार?

ही विमानतळे सीमाभागात असल्याने लष्करासाठी खूप महत्त्वाची आहेत. या विमानतळांवरील रनवेवर फायटर जेट तसेच अन्य संरक्षणविषयक उड्डाणे होतात. सैन्याच्या विमानांच्या उड्डाणासाठी तेथील रनवे अनुकूल असणे गरजेचे असते. त्यामुळेच या विमानतळांच्या रनवेची डागडुजी वेळेवर केली जाते. या काळात विमानांचे मार्ग बदलले जातात. विमान प्रवासा उशिराने होतो. त्यामुळेच आगामी काही दिवसांत तुम्ही विमानाने प्रवास करत असाल तर या अपडेट लक्षात ठेवूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन केले जात आहे.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!