AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather update : आयएमडीकडून अतिवृष्टीचा इशारा, पुढील बारा तास धोक्याचे, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी

वातावरणात अचानक मोठा बदल झाल्यचं पहायला मिळत आहे. पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. आयएमडीकडून तब्बल 16 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, महाराष्ट्रासंदर्भात देखील मोठा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Weather update : आयएमडीकडून अतिवृष्टीचा इशारा, पुढील बारा तास धोक्याचे, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी
Weather UpdateImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 09, 2026 | 7:12 PM
Share

पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल झाल्याचं पहायला मिळत आहे. पुढील 12 तासांमध्ये देशातील अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पर्वतीय प्रदेशात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, या भागांमध्ये भूस्खलनाच्या घटना देखील घडू शकतात, असंही हवामान विभागाने म्हटलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, या काळात मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असंही हवामान विभागाने म्हटलं आहे. हवामान विभागाकडून तब्बल 16 राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

या राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा

पुढील 12 तासांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाकडून अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच या काळात जोरदार वारे वाहण्याची देखील शक्यता आहे. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, जम्मू-कश्मीर, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, गुजरात, महाराष्ट्र आणि केरळ अशा 16 राज्यामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो, असा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी शेतात काम करताना काळजी घ्यावी, असा इशारा देखील भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

महाराष्ट्राला मोठा इशारा

राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं असून, राज्यातील अनेक भागात पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ, आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता असून, नागपूर, गोंदिया, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नाशिक, जळगाव सह इतर काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. राज्यात मागील काही दिवसांमध्ये पावसाचा जोर ओसरला होता, परंतु आता पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन होण्याची शक्यता आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा