
आजच्या काळाच देखील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाण कमी झालेलं नाही. आजही महिलांना असंख्य गोष्टी सहन कराव्या लागत आहेत. घराबाहेरच नाही तर घरात देखील महिलांना नको त्या प्रसंगांना सामोरं जावं लागत आहे. आज देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे, पण काही लोकांचे आजही रुढी विचार आहेत. ज्यामुळे महिलांना घरात देखील मोकळा श्वास घेऊ शकत नाहीत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्न झाल्यानंतर महिलांना असंख्य गोष्टी सहन कराव्या लागत आहेत. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका विवाहित महिलेने तिच्या पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याबद्दल आणि तिच्या शरीराच्या अवयवांवर अश्लील टिप्पणी केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.
विवाहित महिलेने आरोप लावला आहे की, ‘सासू रोज म्हणायती तुझ्या घरी जा आणि हुंडा घेऊन ये…. मी मुलगी दिसत नाही, माझं शरीर पुरुषासारखं आहे…’ असं विवाहित महिलेला सासू नेहमी म्हणायची. ज्यामुळे नवऱ्याने मला तीन तलाक देखील दिला… आता ते मला परत घरी ठेवण्याच्या बदल्यात स्कॉर्पिओ गाडीची मागणी करत आहेत.
पुढे महिला म्हणाली, ‘सासूला मी सांगितलं माझे आई – वडील इतके पैसे कुठून आणतील. तेव्हा रागात त्यांनी मला खोलीत बंद केलं आणि खूप मारलं. जेव्हा माझ्या कुटुंबाला हे कळलं तेव्हा त्यांनी मला माझ्या सासरच्या लोकांच्या तावडीतून सोडवलं आणि माझ्या आईवडिलांच्या घरी आणलं. पीडितेने सांगितलं- मी पोलिसांकडे तक्रार केली, पण त्यांनी मला मदत केली नाही. आता न्यायालयाच्या आदेशानुसार ताजगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा विवाह 11 नोव्हेंबर 2024 मध्ये आशिक मंसूरी याच्यासोबत झालं. लग्नात 15 लाख रुपये खर्च झाला. हुंड्यामध्ये 50 ग्रॅम सोनं निश्चित करण्यात आलं. सासू नजरीन, सासरे शमीम आणि इतरांना हुंड्याने समाधान झालं नाही. ते वारंवार हुंडा मागत राहिले. ते मला अधिक हुंडा आण असं म्हणत माझ्या आईवडिलांच्या घरी पाठवत होते.
महिला पुढे म्हणाली, ‘त्यांना काही कारण मिळत नव्हतं, तेव्हा त्यांनी माझ्या शरीरावर अश्लील टिप्पणी करण्यास सुरुवात कोली. मी पुरुषांसारखी दिसते. म्हणून सासू आणि इतर सासरच्या मंडळींनी स्कॉर्पियो कार आणि दोन लाख रुपयांची मागणी केली. नकार दिल्यानंतर त्यांनी मला खोलीत बंद केलं आणि मारहाण करु लागले. माझ्या आई – वडिलांना कळल्यानंतर त्यांनी माझी सासरच्या मंडळींच्या तवडीतून सुटका केली…’
पीडितेने सांगितल्यानुसार, पतीने प्रथम तिच्या वकिलामार्फत तिला तीन तलाक देण्याच्या दोन नोटिसा पाठवल्या. त्यानंतर, त्याने 10 फेब्रुवारी 2015 रोजी सर्वांच्या उपस्थितीत तीन तलाक दिला आणि त्याच्या नातेवाईकांना साक्षीदार बनवले. दोन लाख आणि स्कॉर्पियो घेवून ये त्यानंतर घरात पाऊल ठेवं… असं सांगण्यात आलं. आता याप्रकरणी पोलीस पुढील चौकशी करत आहेत.