चालकासोबत वृ्द्ध मालक बँकेत पैसे काढायला गेला, पैसे पाहून चालकाची नियत फिरली; मग मित्राच्या मदतीने लूट करुन पसार झाला !

| Updated on: Apr 03, 2023 | 12:21 PM

मालकाचे पैसे पाहून चालकाची नियती फिरली. मग वृद्ध मालकाला बंदुकीचा धाक दाखवून साथीदारासह पैसे लुटून फरार झाला. अनेक ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवले, मात्र आरोपी सापडत नव्हते.

चालकासोबत वृ्द्ध मालक बँकेत पैसे काढायला गेला, पैसे पाहून चालकाची नियत फिरली; मग मित्राच्या मदतीने लूट करुन पसार झाला !
बंदुकीचा धाक दाखवून मालकाला लुटणारा चालक अटक
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : वृद्धाला बनावट बंदुकीचा धाक दाखवून चोरट्यांनी लाखोंची रोकड लंपास करून पोबारा केला. गेल्या पाच महिन्यांपासून फरार असलेल्या दोघांना नाशिक पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरी केलेल्या रकमेपैकी 53 लाखाची रोकड, चोरीच्या पैशाने विकत घेतलेली 4 लाख रुपयांची कार, 30 हजार रूपये किंमतीचा मोबाईल, एक हजार रूपये किमतीची ट्रॅव्हल बॅग असा एकूण 57 लाख 31 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चालकानेच मित्राच्या मदतीने मालकाला लुटले. युवराज मोहन शिंदे आणि देविदास मोहन शिंदे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

छातीला नकली बंदूक लावून लुटले

नाशिकच्या होळाराम कॉलनी परिसरातील आंबेडकर चौक येथे कन्हैय्यालाल तेजदास मनवानी यांना लुटल्याची घटना घडली होती. मनवानी गाडीचा चालक देविदास मोहन शिंदे याने आपल्या साथीदाराच्या संगनमताने मालकाला लुटले. मनवानी यांच्या छातीला नकली बंदूक लावून त्यांच्याकडीस कापडी पिशवीतील 65 लाख रुपयांची रोकड हिसकावून आणि मनवानी यांना गाडीच्या बाहेर ढकलून देत पसार झाले.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपींना केले अटक

यानंतर कन्हैय्यालाल तेजदास मनवानी यांनी सरकारवाडा पोलिसांत धाव घेत याबाबत तक्रार दिली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हा दाखल करत संशयितांचा शोध सुरू केला. कोल्हापूर, पुणे, कात्रज अशा ठिकाणी संशयितांचा गेल्या काही महिन्यांपासून पोलीस शोध घेत होते. यादरम्यान खबऱ्यांमार्फत पोलिसांना दोघा संशयितांचे धागे दोरे हाती लागले. हे दोघे नाशिकच्या सातपूर परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती नाशिक गुन्हे शाखेला मिळाली होती.

हे सुद्धा वाचा

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून सुमारे पाच महिन्यांपासून फरार असलेल्या दोघा आरोपींना कारसह ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा संगनमताने केल्याचे कबूल केले. गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला आहे.