कट्ट्यांचा नाद अंगाशी आला, चालता बोलता पोलिसांच्या जाळ्यात अडकला, नेमकं काय घडलं ?

| Updated on: May 20, 2023 | 6:59 PM

गावठी पिस्तुल विक्री करण्यासाठी दोघे आरोपी आले होते. पोलिसांना याची माहिती मिळाली आणि आरोपींची थेट तुरुंगात रवानगी झाली.

कट्ट्यांचा नाद अंगाशी आला, चालता बोलता पोलिसांच्या जाळ्यात अडकला, नेमकं काय घडलं ?
गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतूस विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक
Image Credit source: TV9
Follow us on

डोंबिवली : सांगलीवरून डोंबिवलीत गावठी कट्टे विकण्यास आलेल्या दोन आरोपींना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून 2 गावठी कट्ट्यांसह 4 जिवंत काडतूसं हस्तगत केले आहे. परशुराम रमेश करवले आणि अक्षय सोपान जाधव अशी या दोघांची नावे असून हे दोन्ही सराईत आरोपी आहेत. परशुराम करवले हा गावठी कट्टे विक्री करण्याचा धंदा करतो, तर अक्षय जाधव हा एक रेती माफिया आहे. अक्षयवर जीवघेणा हल्ला झाल्याने स्वतःच रक्षण करण्यासाठी परशुरामकडून गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतूसं घेतल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई

डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध शस्त्रांची खरेदी विक्री होणार असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. त्यानुसार मानपाडा पोलिसांनी ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग, पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 3 कल्याण सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश वनवे यांनी कारवाई केली.

आरोपीची अंगझडती घेतली असता पिस्तुल आणि काडतूस जप्त

वनवे यांच्या पथकाने डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्याचे हद्दीत पांडुरंगवाडी, चंद्रहास हॉटेलजवळ फिरत असलेल्या परशुराम करवले याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे आढळली. पोलिसांनी त्याला अधिक विचारणा केले असता तो कराडमध्ये राहणारा असून, तो कमी पैशातून इतरांकडून गावठी कट्टे घेऊन जास्त पैशात गुन्हेगार लोकांना विकत असल्याचं सांगितले.

हे सुद्धा वाचा

विशेष म्हणजे पोलिसांनी त्यांनी अक्षय जाधव नावाचा रेती माफिया यालाही एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतूस विकले होते. पोलिसांनी अक्षयलाही सांगलीमधून ताब्यात घेत एकूण दोन्ही आरोपीकडून दोन गावठी कट्टे आणि चार जिवंत काडतूस हस्तगत केले. मुख्य आरोपी याने अजून कुणाकुणाला गावठी कट्टे विकले आणि हे गावठी कट्टा कुठून आणायचे, याचा तपास सुरू केला आहे.