पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले, संतापलेला पती प्रियकराच्या घरी दाखल झाला, मग…

पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर पतीला संताप अनावर झाला होता. पती पत्नीच्या प्रियकराच्या घरी पोहचला, मात्र तो घरी नव्हता. मग जे घडले त्याची कुणी कल्पनाही केली नसेल.

पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले, संतापलेला पती प्रियकराच्या घरी दाखल झाला, मग...
कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 9:25 PM

जबलपूर : जबलपूरमध्ये तीन दिवसांपूर्वी महिलेच्या झालेल्या हत्या प्रकरणात धक्कादायक उलगडा झाला आहे. महिलेची हत्या तिच्या जुन्या भाडेकरुनेच केल्याचे उघडकीस आले आहे. भाडेकरुच्या पत्नीचे महिलेच्या मुलाशी अनैतिक संबंध होते. त्याच संबंधाच्या रागातून भाडेकरुने घरमालक महिलेच्या मुलाची म्हणजेच पत्नीच्या प्रियकराची हत्या करण्यासाठी त्याचे घर गाठले होते. मात्र यावेळी आरोपीचा घरमालक महिलेशी वाद झाला आणि त्या वादातून पत्नीच्या प्रियकराऐवजी त्याच्या आईची त्याने हत्या केली. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

आरोपींचा शोध घेण्याचे पोलिसांपुढे होते मोठे आव्हान

गाडा पोलीस स्टेशन अंतर्गत पिवळ्या इमारतीजवळ 15 मे रोजी रात्री महिलेच्या हत्येची घटना घडली होती. या हत्याकांडमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांना केवळ एका 45 वर्षीय महिलेची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळ गाठून, पुढील तपास सुरू केला होता. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरुन महिलेची ओळख पटली. सरस्वती चौबे असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते.

महिलेच्या मारेकऱ्यांचा वेळीच थांगपत्ता लावण्याच्या हेतूने पोलिसांनी तपासाला गती दिली होती. अखेर चौकशीदरम्यान सुरक्षा रक्षक रामकृष्ण लोधीवर पोलिसांना संशय निर्माण झाला. लोधी हा 6 महिन्यांपूर्वी महिलेच्या घरी भाड्याने राहत होता. तो महिलेच्या घरी आल्याचे लोकांनी पाहिले होते. त्या संशयावरुन पोलीस त्याच्या घरात पोहोचले, तेव्हा तो फरार असल्याचे आढळले. यानंतर पोलिसांचा संशय बळावला आणि पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता, सुरुवातीला त्याने आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच हत्येचे रहस्य उलगडले. त्याने हत्या केल्याची कबुली दिली.

हे सुद्धा वाचा

आरोपीच्या पत्नीचे पीडित महिलेच्या मुलासोबत अनैतिक संबंध होते

आरोपी रामकृष्ण लोधीची पत्नी आणि मृत सरस्वती चौबे यांचा मुलगा अजय या दोघांचे अनैतिक संबंध होते. याच कारणावरून त्याने 6 महिन्यांपूर्वी सरस्वती यांचे घर सोडले होते आणि दुसऱ्या ठिकाणी भाड्याने खोली घेतली होती. त्यानंतरही सरस्वती यांचा मुलगा अजय हा लोधीच्या घरी वारंवार येत असे. 13 मे रोजी संध्याकाळी लोधीने अजयला पत्नीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. हे पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याच रागातून 15 मे रोजी संध्याकाळी लोधी बाईकवरून परवाना असलेली बंदुक घेऊन अजयच्या घरी गेला. मात्र तो घरी नव्हता. याचदरम्यान लोधीचा अजयची आई सरस्वती हिच्याशी वाद झाला आणि त्या वादाचे पर्यावसान हत्येत झाले.

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.