दोन बहिणींच्या भावनांसोबत खेळला, एकीशी लग्न, दुसरीसोबत लिव-इन रिलेशनशिप, अखेर एकदिवस…

Extramarital Affair : महिलेने त्याला विचारलं, सांग तू कोणासोबत लग्न केलयस?. प्रेमाचा बनला तमाशा. प्रेमात कोणाच्याही भावनाशी खेळू नये. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. यात एक व्यक्ती दोन बहिणींच्या भावनांसोबत खेळत होता.

दोन बहिणींच्या भावनांसोबत खेळला, एकीशी लग्न, दुसरीसोबत लिव-इन रिलेशनशिप, अखेर एकदिवस...
extramarital affair
| Updated on: Oct 17, 2024 | 12:10 PM

प्रेमात सर्वात वेदनादायी कुठली गोष्ट असेल, तर ती म्हणजे फसवणूक, धोका. एका व्यक्तीने दोन बहिणींनी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यांच्या भावनांशी खेळला. त्यांची फसवणूक केली. या व्यक्तीने एका बहिणीशी लग्न केलं. तिच्यापासून दोन मुलं झाली. त्याचवेळी त्याचं दुसऱ्या बहिणीसोबत अफेयर सुरु होतं. तिला प्रेमाची खोटी आश्वासन देऊन तिच्यासोबत लिव-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होता. ज्यावेळी त्या व्यक्तीवरुन दोन बहिणी आपसात भिडल्या, त्यावेळी मोठा वाद झाला. सगळ्यांसमोर तमाशा झाला. परिस्थिती अशी आली की, पोलिसांना बोलवावं लागलं. अखेर पत्नीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीला तुरुंगात पाठवलं. बिहारच्या पटनामधील हे प्रकरण आहे.

दीघा पोलीस ठाणे क्षेत्रातील ही घटना आहे. कुर्जी भागात राहणारा एक व्यक्ती आपल्या मेहुणीसोबत लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. रविवारी त्याच्या घराबाहेर महिला संघटनेच्या कार्यकर्त्या आल्या. यात एक महिला त्याची पत्नी होती. पत्नीने त्याच्या घराबाहेर आरडाओरडा सुरु केला. महिलेची बहिण बाहेर येताच दोघींमध्ये वाद सुरु झाला. “तू माझा नवरा पळवलास, माझं घर, संसार मोडलास. तुझ्यामुळे नवऱ्याने मला घराबाहेर काढलं” असं महिला म्हणाली. त्यावर बहिण बोलली, “मी काही केलेलं नाही. तुझ्या नवऱ्याने माझ्यासोबत लग्न केलं. त्याचं माझ्यावर प्रेम आहे”

‘सांग तू कोणासोबत लग्न केलयस?’

दोघींमध्ये रस्त्यावरच जोरदार भांडण सुरु झालं. त्यावेळी दोघींना फसवणारा माणूस घराबाहेर आला. महिलेने त्याला विचारलं, सांग तू कोणासोबत लग्न केलयस?. तिघांमध्ये वाद सुरु झाला. महिला संघटनेचे लोक त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. वाद मिटला नाही, अखेर पोलिसांना बोलवावं लागलं.

‘ती एकटी राहू लागली, त्यावेळी….’

पहिल्या पत्नीने पोलिसांना सांगितलं की, “साहेब आमची दोन मुलं आहेत. काही वर्षांपूर्वी माझ लग्न झालेलं. त्यानंतर माझ्या बहिणीच लग्न झालं. माझ्या बहिणीचा घटस्फोट झाला. ती एकटी राहू लागली. त्यावेळी तिचे आणि माझ्या नवऱ्याचे प्रेमसंबंध जुळले. मला या बद्दल काही माहित नव्हतं. मला या बद्दल समजल्यानंतर माझ्या पायाखालची जमीन सरकली” पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी पती विरोधात गुन्हा नोंदवला. आरोपीला बुधवारी कोर्टात हजर करुन तुरुंगात पाठवलं.