
UP Crime News : सध्याचं जग हे सोशल मीडियाचं आहे. आघडीला प्रत्येक व्यक्ती सोशल मीडिया वापरतोच. समाजमाध्यमांच्या वाढत्या वापरामुळे आरोग्यावर परिणाम होतो, असे म्हटले जाते. विशेष म्हणजे तसे शेकडो उदाहरणं आतापर्यंत समोर आले आहेत. दरम्यान, एकीकडे सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे मानवी स्वास्थ बिघडत आहे, असे सांगितले जात असले तरी एक अजब प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्रामच्या एका पोस्टमुळे एका तरुणाचा चक्क जीव वाचला आहे. पोलिसांनी अवघ्या दहा मिनिटांत सूत्र हालवून तरुणाला वाचवलं आहे.
सध्या समोर आलेला हा प्रकार उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील आहे. येथे पोलिसांनी एका इन्स्टाग्राम स्टेटसमुळे अवघ्या दहा मिनिटांत एका तरुणाचा जीव वाचवला आहे. इन्स्टाग्रामची मूळ कंपनी मेटाने पोलिसांना अलर्ट करताच पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मेटाकडून संदेश मिळताच पोलिसांनी तत्काळ अॅक्शन घेतली आणि तरूणाच्या घरी जाऊन त्याचा जीव वाचवला आहे. सध्या या तरुणावर रुग्णालयात उपचार केला जात असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्रयागराजमधील एका तरुणीने उंदराचे औषध खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्या करताना त्याने इन्स्टाग्रामवर मी विष घेतले आहे, असे स्टेटस ठेवले होते. फेसबुकच्या सिस्टिमने या स्टेटसची नोंद घेतली. लगेच पोलिसांना याबाबत सांगितले.
पोलिसांनीही मेटा कंपनीचा मेल येताच तत्काळ अॅक्शन घेतली. ज्या ठिकाणाहून तरुणाने हे स्टेटस ठेवले होते, त्याचा शोध घेण्यात आला आणि त्याच्या घरी जाऊन त्याला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
पोलीस जेव्हा तरुणाच्या घरी पोहोचले होते तेव्हा तो तरूण बेशुद्धावस्थेत पडला होता. कोणताही उशीर न करता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तरुणाचे प्राण वाचवले. दरम्यान, आतापर्यंत मेटा आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी एकमेकांच्या सहकार्याने आतापर्यंत अनेकांचे प्राण वाचवलेले आहेत. 2023 ते 2025 या काळात मेटाच्या मदतीने एकूण 1,195 लोकांचा जीव वाचवलेला आहे.