
एक मौलवी त्याच्या मदरशात शिकायला येणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडला. तो तिला ट्यूशनही द्यायचा. अचानक एकदिवस दोघे गायब झाले. आधी वाटलं की, मौलवी मुलीला घेऊन पळून गेलाय. पण, सत्य समोर आल्यानंतर सगळेच हैराण झाले. पोलिसांनी मौलवीला अटक केली आहे. जहांगीरगंज पोलीस ठाणे क्षेत्रातील एक माजी प्रधानाच्या मुलीचं दिवसा-ढवळ्या अपहरण झालं. पोलिसांनी ही केस सोडवली. पण स्टोरी काही वेगळीच निघाली. विद्यार्थीनी आपल्या मर्जीने मौलवीसोबत पळून गेली होती. कुटुंबियांना असं वाटतं होतं की, मुलीला किडनॅप केलय. उत्तर प्रदेशच्या आंबेडकर नगरमधील हे प्रकरण आहे.
संतकबीरनगर जनपदच्या पोखरा भिटवा गावातील निवासी निसार खां जहांगीरगंज येथील मदरशात अनेक दशकापासून शिकवत होता. त्या मदरशात तालीम ग्रहण करण्यासाठी माजी प्रधानाची मुलगी सुद्धा यायची. तो तिची ट्यूशन घ्यायचा. ट्यूशन घेण्यासाठी तो तिच्या घरी जायचा. 9 वर्षांपासून निसार खां विद्यार्थिनीच्या घरी जाऊन तिची ट्यूशन घेत होता.
प्रेमाची अशी काही नशा चढली की…
ट्यूशनची शिकवणी देता देता निसार खां ची माजी प्रधानाच्या मुलीसोबत जवळीक वाढली. विद्यार्थिनीचा सुद्धा मौलवीवर जीव जडला. दोघांवर प्रेमाची अशी काही नशा चढली की, त्यांना गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याचाही विसर पडला. गुरुवारी दोघे अचानक गायब झाले. बातमी अशी पसरली की, मौलवी निसार खां माजी प्रधानाच्या मुलीला घेऊन पळून गेलाय. माजी प्रधानांन मुलीच अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी लगेचच आरोपीला शोधून काढलं.
पोलिसांनी काय सांगितलं?
अपर पोलीस अधीक्षक श्याम देव यांनी सांगितलं की, “विद्यार्थिनीच किडनॅपिंग झालं नव्हतं. ती स्वत:च्या मर्जीने मौलवी सोबत गेली होती” दोघांची चौकशी सुरु आहे. दुसरीकडे मौलवीच्या कृत्यामुळे संपूर्ण भागात संतापाच वातावरण आहे.