पैशाच्या आमिषाने देह व्यापारात ओढलं, सात तरुणींची सुटका, दोघांना अटक

| Updated on: Sep 30, 2021 | 3:03 PM

उत्तर प्रदेशची राजधानी  लखनौच्या आलमबाग पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मधुबन मगरमध्ये एका भाड्याच्या घरात सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर घरावर छापा टाकून 7 मुलींची सुटका करण्यात आली, तर दोन तरुणांना येथून अटक करण्यात आली

पैशाच्या आमिषाने देह व्यापारात ओढलं, सात तरुणींची सुटका, दोघांना अटक
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन तरुण अटक करत 7 मुलींची सुटका केली आहे. या सर्व मुली यूपीच्या विविध शहरांतील आहेत, ज्या चांगल्या नोकरीच्या शोधात लखनौला आल्या होत्या, पण इथे येऊन देह व्यापाराच्या रॅकेटमध्ये अडकल्या.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशची राजधानी  लखनौच्या आलमबाग पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मधुबन मगरमध्ये एका भाड्याच्या घरात सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर घरावर छापा टाकून 7 मुलींची सुटका करण्यात आली, तर दोन तरुणांना येथून अटक करण्यात आली. पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.

आक्षेपार्ह वस्तूही जप्त

डीसीपी सेंट्रल झोन ख्याती गर्ग यांनी सांगितले की, आरोपींकडून अनेक आक्षेपार्ह वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या दोन तरुणांपैकी हर्षित पांडे हा प्रयागराजचा रहिवासी आहे, तर दुसरा मुकेश पाल हा उन्नावचा रहिवासी आहे.

नोकरीच्या आमिषाने बोलावून देह व्यापार

पोलिसांनी सांगितले की, देह व्यापारात अडकलेल्या बहुतांश मुली प्रयागराज, गोरखपूर, कानपूर, आझमगड, मेरठसह इतर जिल्ह्यांतून नोकरीसाठी लखनौला आल्या होत्या. आरोपी तरुण या मुलींना सुरुवातीला टेलिकॉलर्समध्ये काम करायला लावत असत, नंतर त्यांना अधिक पैशांचे आमिष दाखवून सेक्स रॅकेटमध्ये ढकलण्यात येत असे. मुलींनी या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले, पण त्या बाहेर पडू शकत नव्हत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लखनौमध्ये बाहेरुन येणाऱ्या मुलींना टार्गेट करायचे आणि त्यांना अधिक पैशांचे आमिष दाखवून सेक्स रॅकेटमध्ये फसवायचे. आरोपी तरुणांनी त्यांचे नंबर ग्राहकांना दिले होते आणि दर दोन ते तीन महिन्यांनी घरे बदलून वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते. आरोपी तरुण शहरभर फिरत ग्राहकांशी बोलत असत आणि मुलींना फोन लोकेशनवर पाठवत असत.

नालासोपाऱ्यात चाळीत सेक्स रॅकेट

दुसरीकडे, नालासोपाऱ्यात चाळीतील खोलीत चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात नुकतंच पोलिसांना यश आलं आहे. खोलीत तरुणींना डांबून ठेवून, त्यांना जबरदस्ती वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं जात असल्याचा आरोप आहे. नालासोपाऱ्यातील वालीव पोलिसांनी या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला.

चार पीडित मुलींची सुटका

नालासोपारा पूर्व पेल्हार गावातील खान कम्पाउंडमध्ये संबंधित महिला हे सेक्स रॅकेट चालवत होती. ती भाभी नावाने परिचित होती. वालीव पोलिसांनी छापा मारुन या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. यातील चार पीडित मुलींची सुटका करण्यात आली, तर दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

दोन लाखांचे निरोध सापडले

अटकेतील आरोपींमध्ये एका तृतीयपंथीयाचा, तर एका महिलेचा समावेश आहे. वसुंधरा संजय तिवारी (वय 48) आणि अंजली राजकुमार यादव (वय 45) असे अटक आरोपींची नाव असून वसुंधरा तिवारी ही तृतीयपंथी आहे. या आरोपींकडून 2 लाख 53 हजार 440 रुपये किमतीचे निरोध (कंडोम्स) असलेले 22 मोठे बॉक्स, रोख रक्कम आणि मोबाईल ही जप्त केले आहेत.

संबंधित बातम्या :

ठाण्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा भंडाफोड, पोलिसांनी दोन अभिनेत्रींची सुटका कशी केली? कारवाईची A टू Z माहिती

अंधेरीत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघींची सुटका, तिघांना अटक

नालासोपाऱ्यातील चाळीत वेश्या व्यवसाय, महिलेसह तृतीयपंथीयाला बेड्या, दोन लाखांचे कंडोम सापडले