ठाण्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा भंडाफोड, पोलिसांनी दोन अभिनेत्रींची सुटका कशी केली? कारवाईची A टू Z माहिती

ठाणे गुन्हे शाखेने बुधवारी (2 जून) नौपाडा पाचपाखाडी येथील प्लॅटमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला (Thane City Crime Branch busted high profile film actress sex racket).

ठाण्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा भंडाफोड, पोलिसांनी दोन अभिनेत्रींची सुटका कशी केली? कारवाईची A टू Z माहिती
ठाण्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा भंडाफोड
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 10:39 AM

ठाणे : ठाणे गुन्हे शाखेने बुधवारी (2 जून) नौपाडा पाचपाखाडी येथील प्लॅटमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. याप्रकरणी एक घर मालकीण, एक महिला एजंट आणि एक पुरुष एजंट आणि दोन अभिनेत्री अशा पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर गुन्हे शाखेने आज (3 जून) दोघी अभिनेत्रींना सुधारगृहात पाठवले. तर अनैतिक धंदा चालविल्या प्रकरणी घरमालकीण, महिला आणि पुरुष एजंट अशा तिघांवर गुन्हा दाखल केला. तर तीन आरोपींना न्यायालयाने 7 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट- 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणे यांनी दिली (Thane City Crime Branch busted high profile film actress sex racket).

पोलिसांनी कारवाई कशी केली?

ठाण्याच्या पाचपाखळी नौपाडा परिसरातील एक महिला सिनेअभिनेत्री आणि मॉडेल पुरवते. तसेच ग्राहकांकडून पैसे घेऊन वेश्या व्यवसायासाठी जागा उपलब्ध करुन देते, अशी माहिती 2 जून रोजी गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर गुन्हे शाखेने सापळा रचला. गुन्हे शाखेच्या पथकाने मुंब्र्यातील अमृतनगर येथे बनावट ग्राहक पाठवला. बनावट ग्राहकाने महिलेकडे 2 अभिनेत्री आणि मॉडेलची मागणी केली. महिलेने यासाठी प्रत्येकी 2 लाख रुपयांची मागणी केली. महिला एजंट आणि ग्राहक यांच्यात पैशांवरुन चर्चा झाली. त्यानंतर अखेर तडजोड करुन 1 लाख 80 हजारात सौदा ठरला (Thane City Crime Branch busted high profile film actress sex racket).

गुन्हे शाखेचा छापा

सदर महिला एजंटने विशाल उर्फ सुनीलकुमार उत्तमचंद जैन याच्या मार्फत दोन अल्पवयीन अभिनेत्रींना वेश्यागमनासाठी त्यांना पैशाचे अमिष दाखवून प्रवृत्त केले. त्यांनंतर पीडितांना पाचपाखाडी नौपाडा येथील घरी बोगस ग्राहकांसोबत पाठविण्यात आले. पीडित अभिनेत्री तिथे पोहोचल्यानंतर गुन्हे शाखा युनिट-1 ने छापा टाकला. या छापेमारीत पोलीस पथकाने दोन अभिनेत्री, एक महिला एजंट, एक पुरुष एजंट आणि ज्या घरात वेश्याव्यवसाय चालत होता त्या घराची मालकीण अशा पाच जणांना ताब्यात घेतले.

दोन पीडित महिलांची सुटका

पोलीस पथकाने सदर कारवाईत 2 लाख 14 हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन, वस्तू, पर्स, आणि रोख रक्कम हस्तगत केले. तसेच पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका केली. गरिबी, मजबुरीमुळे वेश्या व्यवसायाकडे काही लोक वळतात. मात्र कदाचित त्या महिलांना हे माहित नसते कि, भविष्यात त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी त्यांचे चित्रण केले जाऊ शकते. अशा प्रकाराची दाट शक्यता असते. त्यामुळे आर्थिक चणचण दूर करण्यासाठी अशाप्रकारे कुणीही फसू नये. त्याचा परिणाम हा महिलांच्या पुढील आयुष्यावर पडू शकतो, असे ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणे यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

ठाण्यातील सोसायटीत सेक्स रॅकेट, दोन बॉलिवूड अभिनेत्रींसह 6 जणांना अटक

बॉलिवूड फोटोग्राफरच्या ‘ऑनलाईन सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 11 तरुणींची सुटका

भोजपुरी सिनेमातील तरुणींना वेश्या व्यवसायात ढकललं, मीरा रोडमध्ये दोघांना अटक

Non Stop LIVE Update
राणेंचं एक ट्विट अन् कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट,नेमकं काय म्हणाले?
राणेंचं एक ट्विट अन् कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट,नेमकं काय म्हणाले?.
मुंबईतील लोकसभेच्या जागांचा मविआचा फॉर्म्युला ठरला, कुठे कोण लढणार?
मुंबईतील लोकसभेच्या जागांचा मविआचा फॉर्म्युला ठरला, कुठे कोण लढणार?.
'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष लढणार सर्वाधिक जागा
'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष लढणार सर्वाधिक जागा.
भाजपकडून कुणाला तिकीट? या 6 जणांची समिती ठरवणार, कोणाचा समितीत सहभाग?
भाजपकडून कुणाला तिकीट? या 6 जणांची समिती ठरवणार, कोणाचा समितीत सहभाग?.
'नमो महारोजगार मेळावा' कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नावच गायब
'नमो महारोजगार मेळावा' कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नावच गायब.
सदावर्तेंना दिलासा,सनद निलंबित करण्यासंदर्भात बार काऊंसिलचा निर्णय काय
सदावर्तेंना दिलासा,सनद निलंबित करण्यासंदर्भात बार काऊंसिलचा निर्णय काय.
लोकसभा लढणार की नाही? पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या..
लोकसभा लढणार की नाही? पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
भल्या मोठ्या अस्वलांची मंदिरात एन्ट्री, गेट उघडत प्रसादावर मारला ताव
भल्या मोठ्या अस्वलांची मंदिरात एन्ट्री, गेट उघडत प्रसादावर मारला ताव.
भाजपच्या प्रविण दरेकर यांना कुणाची शिवीगाळ? ऑडिओ होतोय व्हायरल
भाजपच्या प्रविण दरेकर यांना कुणाची शिवीगाळ? ऑडिओ होतोय व्हायरल.
अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप नेत्यानं सांगितलं सत्य?
अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप नेत्यानं सांगितलं सत्य?.