ठाण्यातील सोसायटीत सेक्स रॅकेट, दोन बॉलिवूड अभिनेत्रींसह 6 जणांना अटक

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 1 ने मोठी कारवाई करत दोघी अभिनेत्रींना अटक केली (Thane Bollywood Actress Sex Racket )

ठाण्यातील सोसायटीत सेक्स रॅकेट, दोन बॉलिवूड अभिनेत्रींसह 6 जणांना अटक
मुंबईत 'सेक्स टुरिझम रॅकेट'चा धक्कादायक प्रकार उघडकीस
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jul 12, 2021 | 10:40 AM

गणेश थोरात, टीव्ही 9 मराठी, ठाणे : खासगी सोसायटीत सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दोन बॉलिवूड अभिनेत्रींना अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे  शाखेने चार महिलांसह सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या सेक्स रॅकेटचे धागेदोरे बड्या अभिनेत्रींपर्यंत असल्याचे बोलले जात आहे. (Thane Society Bollywood Film Actress Sex Racket busted)

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 1 ने मोठी कारवाई करत दोघी अभिनेत्रींना अटक केली. त्या ठाण्यातील एका खासगी सोसायटीत हे सेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोप आहे. बॉलिवूडशी संबंधित असलेल्या या दोन्ही अभिनेत्री वेश्या व्यवसाय करतात, याची खात्री करत पोलिसांनी सापळा रचला होता. दोन्ही अभिनेत्री लाखो रुपये घेत असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.

धक्कादायक म्हणजे या सेक्स रॅकेटची लिंक मुंबईतील अनेक मोठ्या अभिनेत्रींशी जोडली असल्याची चर्चा आहे. तसेच या प्रकरणात आतापर्यंत दोन अभिनेत्रींशिवाय आणखी दोन महिला आणि दोघा पुरुषांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणे यांनी दिली आहे.

फोटोग्राफर नासिर खानचे सेक्स रॅकेट

दरम्यान, नासिर खान याने करण ठाकूर हे खोटं नाव घेऊन सेक्स रॅकेट सुरु केल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. खरं तर नासिर बॉलिवूडमध्ये फोटोग्राफर होता. पण लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाल्याने त्याने ऑनलाईन पद्धतीने आपली एक टोळीच तयार केली होती.

काय होती मोडस ऑपरेंडी?

लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांना बाहेर जाता येत नाही. अत्यावश्यक असेल तर शासनाची किंवा पोलिस खात्याची परवानगी घेऊन बाहेर जावे लागते. म्हणून आरोपीने अनोख्या पद्धतीने ऑनलाईन सेक्स करण्याचा धंदा सुरु केला. ज्यामध्ये कस्टमर आणि मुलगी हे दोघेही ऑनलाईन पद्धतीने एकमेकांसी संपर्क साधत “परफॉर्म” करत असल्याची माहिती समोर आली आहे .

संबंधित बातम्या :

बॉलिवूड फोटोग्राफरच्या ‘ऑनलाईन सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 11 तरुणींची सुटका

भोजपुरी सिनेमातील तरुणींना वेश्या व्यवसायात ढकललं, मीरा रोडमध्ये दोघांना अटक

(Thane Society Bollywood Film Actress Sex Racket busted)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें