घरापासून 100 मीटरवर अल्पवयीन मुलीचा अर्धनग्न मृतदेह, ऊसाच्या शेतात दोन आरोपी सापडले

अल्पवयीन मुलगी मृतावस्थेत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घरातील सदस्यांची रडून रडून बिकट अवस्था झाली आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ती शौचासाठी घराबाहेर पडल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले होते. मात्र बराच वेळ घरी परतला नाही.

घरापासून 100 मीटरवर अल्पवयीन मुलीचा अर्धनग्न मृतदेह, ऊसाच्या शेतात दोन आरोपी सापडले
सांकेतिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Feb 06, 2022 | 7:28 AM

लखनौ : घरापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गोंडा येथे हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवत प्रकरणाचा तपास सुरू केला. मृतदेह आढळला, त्यावेळी 17 वर्षीय युवतीच्या शरीरावर एकही कपडा नव्हता. त्यामुळे लैंगिक अत्याचारानंतर तिची हत्या करण्यात आली असावी (Rape and Murder), त्यानंतर मृतदेह अर्धनग्न अवस्थेत फेकत आरोपींनी पळ काढला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अवघ्या काही तासांत पोलिसांनी आरोपींना शोधून काढले आणि त्यांना ऊसाच्या शेतातच घेराव घातला. स्वत:ला वाचवण्यासाठी हल्लेखोरांनी पोलिस दलावर गोळीबार केला. मात्र पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक आरोपी जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर दुसऱ्या आरोपीच्या शोधात पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

काय आहे प्रकरण?

ही घटना उत्तर प्रदेशातील गोंडा येथील नवाबगंज पोलीस स्टेशन परिसरातील आहे. अल्पवयीन मुलगी मृतावस्थेत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घरातील सदस्यांची रडून रडून बिकट अवस्था झाली आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ती शौचासाठी घराबाहेर पडल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले होते. मात्र बराच वेळ घरी परतला नाही.

मुलीच्या वडिलांचे म्हणणे आहे की, त्यांची 17 वर्षांची मुलगी घरातून शौचासाठी बाहेर गेली होती. त्यानंतर बराच वेळ ती घरी न आल्याने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ती कुठेच सापडली नाही. काही वेळाने तिचा अर्धनग्न मृतदेह घरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या निलगिरीच्या बागेत पडलेला आढळून आला.

ऊसाच्या शेतात आरोपी लपले

नवाबगंज पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परसापूर येथे अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घटनास्थळी तपास करत असताना पोलिसांना काही महत्त्वाचे पुरावे मिळाले. त्यामुळे पोलीस काही तासांतच आरोपींपर्यंत पोहोचले. दोन्ही आरोपी कात्रभोगचंद येथील ऊसाच्या शेतात लपल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी ऊसाच्या शेताला घेराव घातला. आरोपींच्या वतीने पोलीस पथकावर गोळीबार करण्यात आला. पोलिसांच्या चकमकीत लववीरपूर गावातील रहिवासी महेश यादव याला गोळ्या घालून अटक करण्यात आली. तर दुसरा आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

संबंधित बातम्या :

अल्पवयीन मुलीने शरीरसंबंधांना सहमती दिली, तरी कायद्याच्या दृष्टीने अर्थ नाही, बलात्काराच्या आरोपीचा जामीन कोर्टाने फेटाळला

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तुरुंगात, जामिनावर सुटताच पुन्हा तिच्यावरच बलात्कार, पीडितेची प्रसुती

दोन्ही कुटुंबांच्या संमतीने विवाह ठरला, नवरदेवाला चैन पडेना, लग्नाआधीच तरुणीवर बलात्कार