
उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबादमध्ये पोलिसांना एक फोन आला. कॉलरने सांगितलं की, ‘Hello सर! इथे एका महिलेचे 15 तुकडे करुन मृतदेह निळ्या ड्रममध्ये टाकलाय..’. हे ऐकताच यूपी 112 पोलीस हडबडले. त्यांनी पुढे डिटेल मागितल्यानंतर कॉलरने काही न बोलता फोन कट केला. पोलिसांनी नंतर फोन नंबरचं लोकेशन ट्रेस केलं. पोलीस नंतर, ज्या घरातून फोन आला होता, तिथे पोहोचले. त्यावेळी एक वेगळीच गोष्ट समोर आली. तरीही पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ज्या घरातून कॉल आलेला, त्यांनी सांगितलं की, त्यांच्या 10 वर्षाच्या मुलीने हा खोडकरपणा केलाय. शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास यूपी 112 पोलिसांना एका नंबरवरुन कॉल आला. कॉलरने सांगितलं की, बलीपूरमध्ये एका महिलेची हत्या करुन मृतदेहाच 15 तुकडे करण्यात आलेत. हे सर्व तुकडे निळ्या ड्रममध्ये भरुन ड्रम सिमेंटने बंद करण्यात आला आहे. या कॉलमुळे 112 यूपी पोलीस हादरले. यूपी 112 पीआरवी 3496 पोलीस बलीपूर गावात पोहोचले. कॉलरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण कॉलरने मोबाइल बंद केलेला.
उत्तमला पकडून पोलीस ठाण्यात नेलं
यूपी 112 पोलिसांनी याची फतेहगढ़ कोतवाली व कमालगंज पोलीस ठाण्यात माहिती दिली. बलीपूर गाव कमालगंज पोलीस ठाणे क्षेत्रात येत असल्याने इंस्पेक्टर राजीव कुमार पोलीस टीमसह तिथे पोहोचले. घटनेची चौकशी केली. पण गावात असं काही घडलं नसल्याच समजलं. इंस्पेक्टरने कॉल करणाऱ्या सीडीआर काढून लोकेशन ट्रेस केलं. फतेहगढ़ कोतवाली याकूतगंज चौकी येथील निवासी उत्तम कुमार अशी कॉलरची ओळख निघाली. लोकेशन ट्रॅक करुन पोलीस उत्तमला पकडून पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
कॉल करणारी मुलगी आहे की युवक?
पोलीस चौकशीत उत्तमने सांगितलं की, तो पंचायतीराज विभागात सफाई कर्मचारी म्हणून काम करतो. सध्या खुदागंज गावात ड्युटीवर आहे. तो पत्नी नीतू सोबत याकूतगंज बाजारात गेला होता. घरात पाचव्या इयत्तेत शिकणारी मुलगी एकटी होती. तिनेच मोबाइलवरुन फोन करुन खोट सांगितलं. पोलिसांनी या बद्दल मुलीला विचारल्यानंतर ती म्हणाली की, युट्यूबवर महिलेचे तुकडे करुन मृतदेह ड्रममध्ये टाकत असल्याच पाहून पोलिसांना कळवलं. प्रभारी निरीक्षक राजीव कुमार यांनी सांगितलं, की प्रकरणाचा तपास सुरु आहे. यूपी 112 पोलीस कॉल सेंटरवरुन रेकॉर्डिंग चेक करणार. कॉल करणारी मुलगी आहे की युवक?.