Extramarital Affair : नवऱ्याच्या शरीरात प्रॉब्लेम झाला, बायकोने दुसरा पर्याय शोधला, पण….
Extramarital Affair : आबिद जत्रेमध्ये आकाश पाळणा लावायच काम करायचा. काही काळापूर्वी पाळणा लावताना आबिदसोबत एक दुर्घटना घडली. सोमवारी रात्री शबानाने नवऱ्याला दारु पाजली. शबाना आधी आबिदच्या छातीवर बसली.

पती-पत्नीच नातं हे विश्वासाच असतं. पण काहीवेळा अशा घटना घडतात की, या नात्यावरचा विश्वास उडतो. असच एक प्रकरण समोर आलय. आबिद जत्रेमध्ये आकाश पाळणा लावायच काम करायचा. काही काळापूर्वी पाळणा लावताना आबिदसोबत एक दुर्घटना घडली. पाळणा फिट करताना अचानक तो खाली पडला. त्यामुळे त्याचं मणक्याच हाड मोडलं. आबिदवर उपचार सुरु झाले. आबिद आता पत्नी शबानासाठी एक ओझं बनला. ती कमवून कुटुंबाचा भार संभाळत होती. आबिदच्या उपचारांचा खर्च सुद्धा उचलत होती.
याच दरम्यान शबानाची ओळख इन्स्टाग्रामवर रेहान नावाच्या एका ऑटो ड्रायवरसोबत झाली. दोघांनी लवकरच परस्परांचे फोन नंबर एक्सचेंज केले. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघे रोज भेटू लागले. त्यांच्यात अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. शबानाला आता रेहानसोबत आयुष्य काढलं पाहिजे असं वाटू लागलं. पण आबिद दोघांच्या नात्यात अडथळा ठरत होता. शबानाने ही गोष्ट रेहानला सांगितली. त्यानंतर दोघांनी मिळून एक प्लान बनवला.
रेहानच्या डोक्यात विकासचा विचार आला
उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील हे धक्कादायक प्रकरण आहे. आपल्या दोघांना एकत्र यायच असेल, तर आबिदला संपवाव लागेल असं रेहान शबानाला म्हणाला. पण आपण दोघे हे काम करु शकत नाही. यासाठी आपल्याला तिसऱ्या माणसाची मदत लागेल. शबाना रेहानला म्हणाली की, तू तुझ्या एखाद्या विश्वासू माणसाशी या संदर्भात बोलं. त्यावेळी रेहानच्या डोक्यात विकासचा विचार आला. त्याला नवीन रिक्षा खरेदी करायची होती.
नवऱ्याला दारु पाजली
रेहान या संदर्भात विकासशी बोलला. त्यावेळी त्याने पैशांची मागणी केली. मी तुझी साथ देईन, पण मला पैसे पाहिजेत. त्यावेळी शबानाने दोघांना प्रत्येकी 20 हजार रुपये दिले. प्लाननुसार सोमवारी रात्री शबानाने नवऱ्याला दारु पाजली. आबिदला या प्लानिंगची काही कल्पना नव्हती. तो झोपल्यानंतर शबनानने रेहान आणि विकासला घरी बोलावलं.
कशी केली हत्या?
शबाना आधी आबिदच्या छातीवर बसली. रेहानने आबिदचे दोन्ही हात पकडले. विकासने त्याचा गळा आवळला. लाचार आबिद स्वत:ला वाचवण्यासाठी काही करु शकला नाही. त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर शबानाने रेहान आणि विकासला पाठवून दिलं. दुसऱ्यादिवशी सकाळी तिने रडण्याच नाटकं केलं. तिचा आरडाओरडा ऐकून लोक घरी आले. जास्त दारु पिल्यामुळे आबिदचा मृत्यू झालाय असं लोकांना वाटलं. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर हत्या झाल्याची शंका आली. शबानाची कसून चौकशी केल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली.
