AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नीचे तीन-तीन बॉयफ्रेंड…जावयाने सासऱ्याकडे तक्रार करताच असं उत्तर मिळालं की,डोकचं फिरलं, मग..

लग्नाला 11 वर्ष झालेली. पत्नीचे तीन-तीन बॉयफ्रेंड होते. तिचे तिघांसोबत अनैतिक संबंध होते. जावयाने या बद्दल सासऱ्यांकडे तक्रार केली. त्यावर सासऱ्यांनी जे उत्तर दिलं ते ऐकून जावयाचं डोकचं फिरलं. त्याने थेट असं पाऊल उचललंकी, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पत्नीचे तीन-तीन बॉयफ्रेंड...जावयाने सासऱ्याकडे तक्रार करताच असं उत्तर मिळालं की,डोकचं फिरलं, मग..
extramarital affair
| Updated on: Oct 23, 2025 | 9:48 AM
Share

सासरे बुवा, तुमच्या मुलीला समजावा, ही अजूनही तिच्या जुन्या प्रियकरांसोबत बोलते… एक जावई पत्नी विरोधात अशी तक्रार घेऊन आपल्या सासऱ्याकडे गेला. त्यावर सासऱ्याने मुलीचीच बाजू घेतली. त्यामुळे चिडलेल्या जावयाने टोकाचं, खतरनाक पाऊल उचललं. यामुळे सगळ्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जावयाने सुपारी देऊन आपल्या सासऱ्याची हत्या घडवून आणली. इतक्याने त्याचं समाधान झालं नाही. त्याला पत्नीची सुद्धा हत्या करायची होती. पण त्याआधीच पोलिसांनी त्याला अटक केली.

हे प्रकरण मुरारीलाल चेस्ट हॉस्पिटलच आहे. अनीता देवी नावाची महिला रुग्णालयात दाखल होती. पती राजकुमार तिची काळजी घेत होता. काही दिवसांपूर्वी राजकुमारची हत्या झाली. नंतर समजलं की, जावई मोहित तोमरने राजकुमारची हत्या घडवून आणली. त्यासाठी ऋषभ नावाच्या व्यक्तीला 6 लाखाची सुपारी दिली होती. हत्येचं खरं कारण आता समोर आलं आहे.

मोहितच्या डोक्यात काय खतरनाक चाललेलं?

मोहितने पोलीस चौकशीत सांगितलं की, “माझ्या पत्नीचे लग्नानंतर तीन मुलांसोबत अनैतिक संबंध होते. त्यावरुन आमच्या दोघांमध्ये वाद होता. मी माझ्या लग्नावर खुश नव्हतो. मी माझ्या सासऱ्यांकडे पत्नीची तक्रार केली, तर त्यांनी उलट पत्नीची बाजू घेतली. सोबतच मला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे मला राग आला. मग, मी सासऱ्याच्या हत्येची सुपारी दिली. पत्नी नम्रताला सुद्धा कारखाली चिरडून मला मारायचं होतं. मेहुण्याची सुद्धा हत्या करायची होती. पण त्याआधीच मी पकडला गेलो”

किती वर्षांपूर्वी झालेलं लग्न?

सध्या आरोपी अटकेत आहे असं पोलिसांनी सांगितलं. मोहितने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याच्याविरोधात पुढील कारवाई सुरु आहे. मोहितने सांगितलं की, 11 वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालेलं. पत्नी तिच्या प्रियकरांसोबत बोलायची. त्यामुळे घरात क्लेश व्हायचा.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...