AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Extramarital Affair : मेहुणीसोबत एक रात्र घालवायची होती, म्हणून नवरा, बायकोला तांत्रिकाकडे घेऊन गेला, त्यानंतर…

Extramarital Affair : नात्यावरचा विश्वास उडेल अशी एक घटना घडली आहे. एका पतीची आपल्या मेहुणीवरच वाईट नजर होती. तिच्यासोबत त्याला एक रात्र घालवायची होती. एकदिवस तो पत्नीला तांत्रिकाकडे घेऊन गेला. त्यानंतर जे घडलं ते खूप भयानक आहे.

Extramarital Affair : मेहुणीसोबत एक रात्र घालवायची होती, म्हणून नवरा, बायकोला तांत्रिकाकडे घेऊन गेला, त्यानंतर...
Crime News
| Updated on: May 08, 2025 | 12:58 PM
Share

पती, पत्नी आणि वो चे अनेक किस्से तुम्ही आतापर्यंत ऐकले असतील. कधी-कधी अनैतिक संबंध ठेवणं खूप महाग पडतं. एका व्यक्तीला त्याच्या चुलत मेहुणीसोबत अनैतिक संबंध ठेवायचे होते. बायकोला जेव्हा या बद्दल समजलं, त्यानंतर घरात रोज भांडणं सुरु झाली. पत्नीने पतीच्या वाईट हेतूला विरोध सुरु केला. उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील हे प्रकरण आहे. मोहनलालगंज भागात संजय पत्नी सविता सोबत राहत होता. संजयला त्याच्या चुलत मेहुणीसोबत संबंध ठेवायचे होते. म्हणून संजयने टोकाच पाऊल उचललं.

पोलिसांसमोर आरोपी संजयने सर्व सत्य सांगून टाकलं. “साहेब, मला माझ्या चुलत मेहुणीसोबत एक रात्र घालवायची होती. तिच्यासोबत अनैतिक संबंध ठेवायचे होते. पण सविताला याबद्दल समजल्यानंतर तिने घरात क्लेश, माझ्याशी भांडण सुरु केलं” असं संजय म्हणाला. “मी विचार केला की, सवितालाच मार्गातून हटवलं तर?. मग, मला माझ्या मेहुणीसोबत संबंध ठेवता येतील” असं संजय म्हणाला. प्लाननुसार, सोमवारी औषध देण्याच्या बहाण्याने सविताला घराच्या बाहेर बोलावलं. काहीतरी बहाणाकरुन तो तिला गोसाईंगंज येथे एका तांत्रिकाकडे घेऊन आला. तिथून परतताने संजयने पूरनपुर गावाजवळ सविताच्या डोक्यात दगड टाकला. जखमी होऊन सविता जमिनीवर कोसळली. त्यावेळी त्याने साडीने गळा आवळून तिची हत्या केली.

एकच खळबळ उडाली

सोमवारी संध्याकाळी पूरनपुर गावाजवळ सविताचा मृतदेह मिळाल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांना चौकशीत समजलं की, हत्या सविताचा नवरा संजयने केली आहे. सविताचे वडील राम नरेश यांनी या प्रकरणात नवरा संजय, दीर अजय आणि सासू-सासऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला.

रक्ताने माखलेला दगड

हत्या केल्यानंतर त्याने सविताचा मृतदेह किसान पथच्या किनाऱ्यापासून 20 फूट खाली फेकला. पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन गेले. त्यावेळी हत्येसाठी वापरलेला रक्ताने माखलेला दगड सापडला.

तांत्रिकाकडे का नेलेलं?

आरोपी पती संजयने सांगितलं की, तो पत्नी सविताला तांत्रिकाकडे घेऊन गेला होता. यामागे काय कारण होत? त्याचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितलं की, तांत्रिकाबद्दल माहिती गोळा केली जात आहे. हत्येत त्याचा सहभाग आढळला, तर त्याच्याविरुद्ध सुद्धा कारवाई केली जाईल. संजयच्या आई-वडिलांची सुद्धा चौकशी सुरु आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.