‘तुझे 55 तुकडे करुन ड्रममध्ये भरीन..’, आराधनाच्या धमकीने नवरा हादरला, अखेर मनावर दगड ठेवून तो निर्णय घेतला
दिवसभर नवरा दुकानात असायचा. पत्नी घरी मोबाइलवर गेम खेळत बसायची. शीलूच वर्ष 2022 मध्ये आराधनासोबत लग्न झालेलं. हद्द तर, तेव्हा झाली जेव्हा आराधनाने पतीला 55 तुकडे करुन ड्रममध्ये भरण्याची धमकी दिली.

उत्तर प्रदेश महोबा येथे एका हादरवून टाकणार प्रकरण समोर आलय. एका महिलेला PUBG मोबाइल गेम खेळण्याची सवय लागली. यामुळे तिने केवळ पतीच नाही, तर मुलांचा जीवही धोक्यात टाकला. प्रेमाच्या नादात घर-कुटुंब सोडलं. कोतवाली क्षेत्र भटीपुर मोहल्ल्यातील प्रकरण आहे. 30 वर्षीय शीलू रैकवार कुटुंबासोबत राहतात. मिठाई बनवण्याचा त्यांचा पेशा आहे त्यांचं मिठाईच दुकान आहे. शीलूच वर्ष 2022 मध्ये बांदा जिल्ह्यातील मटौंध गावच्या आराधनासोबत लग्न झालं. सुरुवातीला सर्व काही ठिक सुरु होतं. पण नंतर आराधनला पबजी खेळण्याची सवय लागली.
दिवसभर नवरा दुकानात असायचा. पत्नी घरी मोबाइलवर गेम खेळत बसायची. त्याचवेळी आराधनाची लुधियाना पंजाबमधील शिवम नावाच्या व्यक्तीसोबत मैत्री झाली. त्यानंतर दोघांमध्ये अफेअर सुरु झालं. पती शीलूनुसार आराधना त्याच्यापासून अंतर राखून राहू लागली. घरात भांडणं वाढली.
900 किलोमीटरवरुन आला
हद्द तर, तेव्हा झाली जेव्हा आराधनाने पतीला 55 तुकडे करुन ड्रममध्ये भरण्याची धमकी दिली. पतीने प्रेमात अडथळा निर्माण केला, तर संपवून टाकेन अशी तिने भूमिका घेतली. पत्नीच्या धमकीला घाबरलेल्या शीलूने आपलं नातं वाचवण्याचा प्रयत्न केला. पण एकदिवस अचानक आराधनाचा प्रियकर शिवम 900 किलोमीटरच अंतर कापून लुधियानाहून महोबा येथे पोहोचला. त्यावरुन घरात जोरदार राडा झाला.
अखेर निर्णय घ्यावा लागला
नाईलाजाने शीलूने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी शिवम विरुद्ध शांतीभंगाची केस लावली. पण आराधनाने पती आणि आपल्या निष्पाप मुलाला सोडून प्रियकर शिवम सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी शीलूने आपले आणि मुलाचे प्राण वाचवण्यासाठी पत्नीला प्रियकरासोबत जावू दिलं. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. शीलू आपल्या मुलासोबत राहतोय.
