लग्न मौलानाबरोबर हनीमून दीरासोबत…दोन महिन्यांनी पत्नी घरी येताच नवऱ्याने….
दाढीवाले आवडत नाहीत, असं पत्नीच म्हणणं होतं. नवऱ्याची दाढी तिला टोचायची. तिला हे लग्न मान्य नव्हतं. निकाहानंतर पत्नी मौलवी असलेल्या पतीवर दाढी कापण्यासाठी दबाव टाकत होती.

एका महिलेला तिच्या नवऱ्याच्या दाढीवर आक्षेप होता. लग्नानंतर तिने नवऱ्याला दाढी कापायला सांगितली. पण मौलाना असलेल्या पतीने तिचं ऐकलं नाही. त्यावेळी पत्नी दीरासोबत पळून गेली. आता दोन महिन्यानंतर ती परत आली, तेव्हा नवऱ्याने तिला ट्रिपल तलाक दिला. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील हे प्रकरण आहे. महिला दोन महिन्यांपूर्वी दीरासोबत पळून गेली होती. मौलाना असलेल्या पतीने ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. बुधवारी महिला दीरासह नाटकी अंदाजात घरी परतली. त्यानंतर हंगामा सुरु झाला. लिसाडी गेटच्या उज्ज्वल गार्डन येथे राहणाऱ्या मौलानाचा सात महिन्यापूर्वी इंचौली येथे राहणाऱ्या युवतीसोबत लग्न झालं होतं. निकाहानंतर पत्नी मौलवी असलेल्या पतीवर दाढी कापण्यासाठी दबाव टाकत होती.
दाढीवाले आवडत नाहीत, असं पत्नीच म्हणणं होतं. नवऱ्याची दाढी तिला टोचायची. तिला हे लग्न मान्य नव्हतं. आपला निकाह जबरदस्तीने लावण्यात आला, असं तिने सांगितलं. मौलानाने दाढी कापायला नकार दिला. पत्नीने तिच्या नातेवाईकांकडे तक्रार केली. त्यानंतर ती दीरासोबत फरार झाली.
2.50 लाख रुपयाची मागणी
मौलानाने पोलीस ठाण्यात जाऊन पत्नी आणि भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. दोघांच लोकेशन पंजाब लुधियानामध्ये सापडलं. पोलिसांनी महिलेवर मेरठला येण्यासाठी दबाव टाकला. बुधवारी संध्याकाळी महिला दीरासह घरी आली. तिचे नातेवाईकही उज्ज्वल गार्डन येथे आले. यावेळी दोन्ही पक्षांमध्ये जोरदार हंगामा झाला. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी आले. मौलाना त्याची पत्नी आणि भावाला पोलीस ठाण्यात आणलं. मौलानाने घटस्फोटाची धमकी दिली. त्यावेळी महिलेने 2.50 लाख रुपयाची मागणी केली. मौलानाने तिला सांगितलं, माफी मागितली तर घरी घेऊन जाईन.
नवरा नपुंसक असल्याचा आरोप
महिला ऐकली नाही. सोबत राहण्याचा प्रस्ताव धुडकावला. मौलानाने प्रवेशद्वारावरच पत्नीला ट्रिपल तलाक दिला. महिलेने पोलिसांसमोर पतीवर मारहाण, त्रास देण्याचा आणि अश्लील व्हिडिओ बनवून धमकावण्याचा आरोप केला. नवरा नपुंसक असल्याचा आरोप केला. याविषयी नातेवाईकांना सांगितलं होतं. पण त्यांनी समेट घडवून आणला. म्हणूनच मी दीरासोबत निघून गेल्याच तिने सांगितलं.
