Devar Bhabhi Affair : ट्रिपल तलाकला कारण दाढी की, मर्दानगी? अर्शीने मौलाना नवऱ्याबद्दल काय सांगितलं?
Devar Bhabhi Affair : निकाहच्यावेळी मेहर म्हणून ती 5 लाख रुपये घेऊन आलेली. मला अडीच लाख रुपये परत हवेत. पैसे मिळाले तर साबिरसह स्वतंत्र राहीलं, पैसे मिळाले नाहीत, तर घरात पतीसमोर दीराची पत्नी बनून राहील असं तिने सांगितलं.

मौलाना पतीची दाढी पसंत नसल्यामुळे दीरासोबत पळून गेलेल्या पत्नीचा ट्रिपल तलाक झाला आहे. अर्शीला नवरा शाकीर नाही, तर दीर साबिरसोबत रहायचं आहे. तिने सांगितलं की, मी दीरासोबत कोर्ट मॅरेज केलय. बराच गोंधळ झाल्यानंतर पती शाकीरने अर्शीला घटस्फोट दिला. “माझी दाढी तिला पसंत नाही, तिची मर्जी. मी मौलाना आहे आणि मला पत्नीपेक्षा माझी दाढी प्रिय आहे” असं शाकीरने तीन तलाक देताना सांगितलं. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील हे प्रकरण आहे. लिसाडी गेट पोलीस ठाण्यात दोघे परस्परसहमतीने वेगळे झाले. अर्शीने मेहरचे 2.50 लाख रुपये परत मागितले. मौलान असलेल्या शाकीरने घर विकून पैसे देणार असल्याच सांगितलं. यावर दोघांची सहमती झाली.
घटस्फोटानंतर महिला प्रियकरासोबत म्हणजे दीरासोबत माहेरी निघून गेली. उज्ज्वल गार्डन येथे राहणाऱ्या मौलानाचा सात महिन्यापूर्वी इंचौली येथे राहणाऱ्या युवतीसोबत लग्न झालं होतं. निकाहानंतर पत्नी मौलवी असलेल्या पतीवर दाढी कापण्यासाठी दबाव टाकत होती. पण नवराऐकत नव्हता, म्हणून ती दीरासोबत पसार झाली.
पती शारीरिक दृष्ट्या कमजोर
30 एप्रिलला अर्शी दीर साबिरसह घरी परतली. घरी आल्यावर तिने गोंधळ घातला. मौलाना असलेल्या नवऱ्याकडून तिने घटस्फोट मागितला. शाकीरचा आरोप आहे की, दाढी मान्य नाही म्हणून अर्शीने त्याला सोडलं. तेच अर्शीचा आरोप आहे की, मौलाना पती शारीरिक दृष्ट्या कमजोर आहे. त्याच्या मर्दानगीवर संशय आहे. त्यामुळे ती दीराच्या प्रेमात पडली व त्याच्यासोबत पळून गेली. शाकीरने पोलिसांना घटनास्थळी बोलवून घेतलं. तिने मौलान बनलेल्या पतीसोबत संसार करायला नकार दिला. एक महिन्यापूर्वी दीर साबिरसोबत कोर्ट मॅरेज केल्याच तिने सांगितलं. आता तिला त्याच्यासोबतच रहायचं आहे. साबिरने सुद्धा अर्शीसोबत रहाण्याची इच्छा व्यक्त केली.
पैसे मिळाले नाहीत, तर घरात पतीसमोर दीराची पत्नी बनून राहील
शाकीर आणि अर्शीने वेगळं रहाण्याचा निर्णय घेतलाय. शाकीरने पत्नीच्या इच्छेनुसार तिला ट्रिपल तलाक दिला. पोलीस ठाण्यात सर्वांसमोर ट्रिपल तलाक झाला. अर्शीने सांगितलं की, निकाहच्यावेळी मेहर म्हणून ती 5 लाख रुपये घेऊन आलेली. मला अडीच लाख रुपये परत हवेत. पैसे मिळाले तर साबिरसह स्वतंत्र राहीलं, पैसे मिळाले नाहीत, तर घरात पतीसमोर दीराची पत्नी बनून राहील असं तिने सांगितलं.
