9 ठार, 34 जखमी, काही जण वाहूनही गेले? मंदिरात जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला

घटस्थापनेच्या दिवशीच देवीच्या भक्तांवर काळाचा घाला, ट्रॅक्टर ट्रॉलीचा भीषण अपघात, मोठी जीवितहानी

9 ठार, 34 जखमी, काही जण वाहूनही गेले? मंदिरात जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला
उत्तर प्रदेशात भीषण अपघात
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Sep 26, 2022 | 2:36 PM

उत्तर प्रदेशात एक भीषण अपघात (Up Accident News) झाला. मंदिरात जाणाऱ्या भाविकांची ट्रॅक्टर ट्रॉली (Tractor Trolley) तलावात उलटली. त्यामुळे 9 जण ठार झाले आहेत. तर 34 जण जखमी झालेत. यापैकी काही जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. सध्या बचावकार्य केलं जात असून तलावातून मृतदेह (Dead Bodies) बाहेर काढण्यात आले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. राज्य आपत्ती व्यवस्थापनाची टीम आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. त्यांच्याकडून तातडीने बचावकार्य करण्यात आलंय. सोमवारी सकाळी ही दुर्घटना घडली.

ट्रॅक्टर ट्रॉलीतील लोकांना सीतापूर येथील देवीच्या मंदिरात जायचं होतं. मुलाचं मुंडण करण्यासाठी सगळेजण देवळात जायला निघाले होते. मंदिरात जाण्यासाठी निघालेल्यांवर वाटेतच काळानं घाला घातला.

ट्रॅक्टर तलावात पलटी आणि ट्रॅक्टर ट्रॉलीतील लोक त्याखाली दबले गेले. हा अपघात इतका भीषण होता की 9 जणांचा ट्रॅक्टर ट्रॉलीच्या खाली दबून दुर्दैवी अंत झाला. तर 34 जण तलावाच्या पाण्यात बुडाले. त्यांना स्थानिक लोकांनी वाचवण्यासाठी तातडीने प्रयत्न केले. स्थानिकांच्या मदतीने एसडीआरएफच्या मदतीने तलावात पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलं.

अजूनही काही जण तलावात वाहून गेले असण्याची भीती व्यक्त केली जातेय. काही जण गंभीररीत्या जखमी झालेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गंभीर जखमी रुग्णांची मृत्यूशी झुंज सुरु आहे. त्यामुळे या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय.

महत्त्वाचं म्हणजे ट्रॅक्टर तलावात कोसळतोय, हे दिसताच काही जण लगेचच मदतीसाठी धावले. तातडीने लोकांनी तलावात उड्या टाकल्या आणि अपघातामुळे तलावात पडून बुडत असलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे त्यांचा जीव वाचवण्यात वेळीच यश आलं. अन्यथा या अपघातातील जीवितहानीचा आकडा अधिक वाढला असता, अशी भीती पोलिसांनी व्यक्त केलीय.