‘हॉटेलमध्ये एकत्र रात्र घालवली, त्यानंतर तिने…’, पतीकडून पोलिसात DSP असलेल्या पत्नीचा कारनामा उघड

तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर पती रोहितने पोलीस दलात डीएसपी असलेल्या पत्नीबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याच्यावर लावण्यात आलेल्या सर्व आरोपांना उत्तर दिलं आहे. त्या रात्री काय घडलेलं? ते सुद्धा रोहितने सांगितलं.

हॉटेलमध्ये एकत्र रात्र घालवली, त्यानंतर तिने..., पतीकडून पोलिसात DSP असलेल्या पत्नीचा कारनामा उघड
Rohit-Shreshtha
Image Credit source: TV9 Hindi
| Updated on: Apr 09, 2025 | 12:22 PM

उत्तर प्रदेशच्या शामलीमध्ये तैनात असलेल्या डेप्युटी SP श्रेष्ठा ठाकूरच प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. श्रेष्ठा ठाकूरचा पूर्व पती रोहित कुमार सिंहने मीडियासमोर मौन सोडलं आहे. पूर्व पत्नी श्रेष्ठा ठाकूरने लावलेल्या आरोपांवर रोहितने आपलं म्हणणं मीडियासमोर मांडलं आहे. सोबतच त्याने पोलिसात DSP असलेली पत्नी श्रेष्ठा ठाकूरवर गंभीर आरोप केले आहेत. बिहारच्या आरा शहरात रोहित कुमार सिंहने पत्रकार परिषद घेतली.

रोहितने सांगितलं की, 2017 साली एका मित्राच्या माध्यमातून फेसबुकवर श्रेष्ठासोबत बोलणं सुरु झालं. श्रेष्ठानेच रोहितला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर रोहित आणि श्रेष्ठामध्ये बोलणं सुरु झालं. दोघांनी जवळपास दोन महिने चॅटिंग केली. जवळीक वाढू लागल्यानंतर रोहितने आपला नंबर श्रेष्ठाला दिला. दोघांमध्ये सहमती झाल्यानंतर त्यांनी लखनऊ येथे भेटायचं ठरवलं. ऑगस्ट महिन्यात रोहित आणि श्रेष्ठा लखनऊच्या एका हॉटेलमध्ये भेटले. रोहितच्या म्हणण्यानुसार, दोघांनी हॉटेलच्या एका रुममध्ये एकत्र रात्र घालवली.

लग्नाला दोन्ही कुटुंबांची परवानगी

रोहितने सांगितलं की, श्रेष्ठा ठाकूरसोबत त्याची ही पहिली भेट होती. सकाळ होताच पिस्तुलाचा धाक दाखवून श्रेष्ठाने रोहितवर लग्नासाठी दबाव टाकला. 9 ऑगस्ट 2017 रोजी रोहित आणि श्रेष्ठा ठाकूरने लखनऊच्या हजरतगंज मंदिरात आधी लग्न केलं. त्यानंतर दहा महिन्यांनी 16 जुलै 2018 रोजी बिहार पाटणा येथे श्रेष्ठा आणि रोहितने सर्वांसमोर पुन्हा लग्न केलं. या लग्नाला दोन्ही कुटुंबांची परवानगी होती.

या सर्व गोष्टी निराधार

रोहितने सांगितलं की, त्यांचा सहा वर्षांचा मुलगा आहे. त्याचं नाव राज कुलश्रेष्ठ आहे. पण श्रेष्ठाने त्याचं नाव श्रेयांश ठेवलय. मुलगा श्रेष्ठाकडेच असतो. श्रेष्ठाने आपल्या पोलीस दलातील नोकरीचा फायदा उचलत डिसेंबर 2021 मध्ये घटस्फोटासाठी गाजियाबाद कोर्टात अर्ज दिला. त्यानंतर 2024 मध्ये तिने माझ्याविरोधात एफआयआर नोंदवला. त्यामुळे मला तुरुंगात जावं लागलं. माझ्यावर फसवणुकीचा, खोटं बोलून लग्न करण्याचा आरोप करण्यात आला. पण या सर्व गोष्टी निराधार आहेत.

केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली जातेय

रोहित आरोप करताना म्हणाला की, “दोघांनी समाजासमोर लग्न करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी त्या लोकांनी माझ्याबद्दल सांगायला सुरुवात केली की, मी असिस्टेंट इनकम टॅक्स कमिश्नर आहे. आम्ही पाटण्याला आलो, त्यावेळी सर्व खर्च मीच केला. त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यांनी काय केलं हे मला माहित नाही. तिची आई बोलते की, मला अडीज कोटी रुपये हुंडा दिला” माझ्यावर पोलिसांकरवी दबाव टाकून माझं सर्व काम ठप्प करुन टाकलय. आताही केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली जात आहे असा आरोप रोहित सिंहने केला.