सासूचा जावयावर मुलीच्या मर्डरचा आरोप, पण सत्य समजल्यानंतर सासूलाच लाज वाटली, शरमेने मान झुकली, कारण…

एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. सासूने जावयासह सासरकडच्या मंडळींवर मुलीच्या हत्येचा एफआयआर नोंदवला. पण सत्य समजल्यानंतर सासूची मान शरमेने खाली झुकली.

सासूचा जावयावर मुलीच्या मर्डरचा आरोप, पण सत्य समजल्यानंतर सासूलाच लाज वाटली, शरमेने मान झुकली, कारण...
Crime News
Updated on: Nov 08, 2025 | 2:58 PM

एक महिलेने जावयावर आणि सासरकडच्या मंडळींवर गंभीर आरोप केले. इतकं की थेट FIR नोंदवला. माझ्या मुलीला याच लोकांनी मारुन टाकलय. तिचा मृतदेह गायब केलाय असे गंभीर आरोप केले. पण मुलीचं सत्य समोर आल्यानंतर तिच्या आईलाच लाज वाटली. मान शरमेने खाली झुकली. सासरच्या मंडळींनाही आरोप खोटे निघाल्यामुळे दिलासा मिळाला. उत्तर प्रदेशच्या गाजीपूरमधील हे प्रकरण आहे. 3 ऑक्टोंबरला राजवंती देवी यांनी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवला. माझ्या मुलीला रुचीला सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी छळलं आहे. नंतर हत्या करुन तिचा मृतदेह गायब केला,असं गंभीर आरोप सासरच्यांवर लावले. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला.

डिटेलमध्ये तपास केल्यानंतर पोलिसांना संशय आला. आईने मुलीच्या हत्येचा आरोप केला होता. पण मुलगी जिवंत होती. फक्त इतकच नाही, तर मुलगी मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये दुसऱ्या कोणाशी तरी विवाह करुन तिथे राहत होती. शुक्रवारी सकाळी 7 वाजता बरेहता पोलीस विवाहितेपर्यंत पोहोचले. तिची चौकशी केली.

मर्जीविरुद्ध लग्न लावून दिलं होतं

विवाहितेने सांगितलं की, तिच्या कुटुंबियांनी तिचं लग्न जबरदस्तीने मर्जीविरुद्ध लावून दिलं होतं. शाळेपासून तिचं एका मुलावर प्रेम होतं. त्याच्यासोबत तिला लग्न करायचं होतं. जबरदस्तीने लग्न केलं म्हणून ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. यामध्ये मुलीच्या आईने जावयासह त्याच्या कुटुंबावर धक्कादायक आरोप केले. त्यांची नाहक बदनामी केली.

काय-काय आरोप केलेले?

हथौडा येथे राहणाऱ्या राजेंद्रच 6 जून 2023 रोजी रुची सोबत लग्न झालं. 3 ऑक्टोंबरला मुलीच्या आईने तक्रार देताना सांगितलं की, हुंडा म्हणून 50 हजार रुपये आणि दागिने दिले होते. हुंड्यामध्ये बाइक दिली नाही म्हणून तिचा छळ सुरु होता. सासरची मंडळी तिला मारहाण करण्यासह जेवायला देत नाही, असे आरोप मुलीच्या आईने केलेले. सासरची मंडळी आमच्या घरी येऊन आम्हाला मानसिक आणि शारीरिक त्रास द्यायचे असा आरोपही विवाहितेच्या आईने केलेला. रुचीच्या वडिलांचं निधन झालं, त्यावेळी सुद्धा तिला अंत्यदर्शनासाठी येऊ दिलं नाही असे आरोप त्यांनी तक्रारीत केले होते.