AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wardha : 9 महिने पोटात वाढवलेला जीव, जन्मानंतर तासाभरातच नकोसा झाला! वर्ध्यातील संतापजनक घटना

Wardha infant Found : पहोटेचे 2 वाजले होते. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी नवजात बालकाला ताब्यात घेत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

Wardha : 9 महिने पोटात वाढवलेला जीव, जन्मानंतर तासाभरातच नकोसा झाला! वर्ध्यातील संतापजनक घटना
संतापजनक घटनाImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jun 09, 2022 | 3:04 PM
Share

वर्धा : ‘माता न तू वैरणी…’ याचा प्रत्यय देणारी संतापजनक घटना कारंजा तालुक्यातील बोंदरठाणा गावात (Wardha News) उघडकीस आली आहे. चक्क आईनेच नुकत्याच तासभरापूर्वी जन्मलेल्या पोटच्या गोळ्याला उकिरड्यावर (Wardha infant found on road) फेकलं आणि पोबारा केला. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना गुरुवारी पहाटे 2 वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी (Wardha Police) देवदुताच्या रुपात येत या नवजात बाळाला मायेचा हात दिलाय. पोलिसांनी आई बनून नवजात बालकाला ताब्यात घेत नवं आयुष्य दिलंय.ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून पोलिसांकडून माता-पित्यांचा शोध सुरु आहे. कुणी या बाळाला वाऱ्यावर सोडलं? निष्पाप मुक्या जीवाचा जीव का धोक्यात घातला? 9 महिने जो जीव पोटात वाढला, तो जन्म होतात महिलेला नकोसा का झाला? या प्रश्नांची उत्तर शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय.

मुलगा का नकोसा झाला?

‘बेटी म्हणजे धनाची पेटी’ यासारख्या अनेक म्हणी समाजात प्रचलीत आहेत. सरकारदकडूनही स्त्री-भ्रूण हत्येविरोधी आणि मुलींसाठी विविध योजनांची तरतूद केली जाते. असं असलं आजही समाजात मुलगी ही नकोशीच असल्याचा अमानुष घटना समोर येता.. मात्र, आता चक्क आपल्या तान्ह्या बाळाला आईने उकिरड्यावर फेकून दिल्याने मुलीप्रमाणेच मुलगा ही नकोसा का झाला, अशा प्रश्न उपस्थित केला जातोय. पोटच्या बाळाला फेकून देताना निर्दयी मातेला खरंच काही वाटलं नसेल का? विशेष म्हणजे आईच्या गर्भातून बाहेर येताच या बाळाचा संघर्ष सुरु झालेला आहे, असे म्हटलं तर वावगे ठरु नये.

घटना उघडकीस कशी आली?

बोंदरठाणा येथील रहिवासी दयाराम गजाम यांचे घर गावाच्या थोड्या दूर अंतरावर आहे. त्यांची पत्नी पहाटेच पाणी भरण्यासाठी उठली असताना घराच्या मागील परिसरातून नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज त्यांच्या कानी पडला. त्यांनी कुटुंबातील सदस्यांना सोबत घेत पाहणी केली असता त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. अवघ्या एक तासापूर्वी जन्मलेले बाळ त्यांच्या नजरेस पडले. त्यांनी तत्काळ याची माहिती आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकेला दिली.

पहोटेचे 2 वाजले होते. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी नवजात बालकाला ताब्यात घेत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी निर्दयी माता-पित्यांविरुद्ध कारंजा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. सध्या पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

बाळाचं शरीर मातीनं माखलं, नाळही ओलीच…

गावाबाहेर असलेल्या उकिरड्यावर निर्दयी मातेने फेकून दिल्याने खळबळ उडाली. अर्भकाचे संपूर्ण शरीर मातीने भरलेले होते. नाळ ओली होती. अंगावर एकही कपडा नसल्याने बाळाचे संपूर्ण शरीर थंड पडले होते. पोलिसांनी तत्काळ अर्भकाला ताब्यात घेत ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ पाठवले. बाळ जन्मल्यानंतर त्याला आईच्या दुधाची गरज असते. पण, जन्मदात्रीच निर्दयी निघाल्याने बालकाला दूध मिळाले नसल्याने त्याची प्रकृती बिघडली.

त्याला पावडरचे दूध पाजण्यात आले. पण, बाळ दूध पित नसल्याने नवजात बाळाला वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. सध्या या बाळावर उपचार सुरु आहेत.

Follow Us
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप