Wardha Crime : भावाबहिणीच्या नात्याला काळीमा! 6 महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर कळलं, सख्खा भाऊच कारणीभूत

Wardha Crime New : सख्ख्या भावानेच बहिनीचे शोषण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आल्यानं संताप व्यक्त केला जातोय.

Wardha Crime : भावाबहिणीच्या नात्याला काळीमा! 6 महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर कळलं, सख्खा भाऊच कारणीभूत
संतापजनक घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 1:26 PM

वर्धा : वर्धा (Wardha Crime News) जिल्ह्यात हादरवणारी घटना समोर आली आहे. भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी अशी ही घटना आहे. सख्ख्या भावानेच आपल्या लहान बहिणीवर अत्याचार (Sister raped by brother) केला. या पीडिता गरोदर राहिली. त्यानंतर हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणातील आरोपीही अल्पवयीन आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर मानलं जातंय. सख्ख्या भावाने बहिणीसोबत हैवानीकृत्य केल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. आई-वडील कामानिमित्त बाहेर गेलेले असताना भावाने आपल्या बहिणीसोबत गैरकृत्य केलं. पीडित मुलगी सहा महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर या भयंकर प्रकाराचा उलगडा झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Wardha Rape News) अल्पवयीन आरोपीला अटक केली असून पुढील तपास केला जातो आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची पोलीस कसून चौकशी करत आहेत. वर्धा शहरातूनच भावा बहिणीच्या नात्याल कलंक लावणारी ही घटना उघडकीस आली आहे.

विकृतीचा कळस

गेल्या काही दिवसांपासून समाजात वेगवेगळ्या प्रकारच्या विकृत घटना घडताना पाहायला मिळाल्यात. मोबाइल आणि वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा परिणाम युवकांच्या मनावर मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. अशातच वर्ध्यातून काळीज हेलावून टाकणारी धक्कादायक घटना घडलीय. वर्धा शहरात सख्ख्या भावानेच बहिणीचे शोषण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आल्यानं संताप व्यक्त केला जातोय.

पोटाल दुखलं म्हणून कळलं

पीडित मुलीचे पोट दुखत असल्याने सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात तिचे पालक तिला घेऊन गेले. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलेली हकीकत ऐकून पालकांना धक्काच बसला. पीडिता 6 महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आल्याने तिच्या आई वडिलांना मोठा धक्काच बसला. आई-मुलगा, बहिण-भाऊ, बाप-लेक या नात्यांना काळीमा फासणाऱ्या विचित्र घटना गेल्या काही दिवसांत सातत्यानं समोर आल्या आहेत. त्यात वर्ध्यातील या घटनेनं भर टाकलीये.

हे सुद्धा वाचा

लज्जास्पद

सख्या भावाने बहिणीवर अत्याचार करण्याची लाजीरवाणी घटना घडली. 15 वर्षीय पीडिता घरी होती. तिचे आई वडिल बाहेर कामानिमित्त गेले होते. याची संधी साधून नराधम 17 वर्षीय भावाने बहिनीचं शोषण केले. पीडितेची प्रकृती बिघडल्याने तिला घरच्यांनी सेवाग्राम येथील रुग्णालयात तिला नेलं. त्यावेळी ती गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली. यानंतर घरच्यांनी पोलिसांत याबाबतची तक्रार दिली. वर्धा शहर पोलीस ठाण्यातील पोस्को सेलने या घटनेचे गांभीर्य ओळखून पीडितेच्या भावाला ताब्यात घेतल्याची माहिती दिली.

पीडिता सहा महिन्याची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब पुढे आल्यावर रुग्णालयातील डॉक्टरांनी थेट पोलिसांना याची माहिती दिली होती. पोलिसांनी पीडितेची विचारपूस केली असता पीडितेने सुरुवातील काहीही सांगण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. पीडिता माहिती देण्यास टाळाटाळ करीत होती. त्यामुळे हे प्रकरण सखी वन स्टॉप सेंटरकडे सोपवण्यात आले. सेंटरच्या केंद्र प्रशासक यांनी पीडित मुलीचे समुपदेशन केले. तिला धीर देत विचारपूस केली असता पीडितेने घडलेला सर्व प्रकार पाणावलेल्या डोळ्यांनी कथित केला. पीडितेची साक्ष नोंदविल्यानंतर शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

सख्ख्या बहिणीचे शोषण केल्याच्या धक्कादायक प्रकरणात शहर पोलिसांनी उघडकीस आणला. त्यानंतर ही विकृत केलेल्या 17 वर्षीय भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचीही साक्ष नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली असून पुढील कारवाई केली जातेय.

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.