घरकुलात लपवला 15 किलो गांजा, वाशिम पोलिसांकडून महिलेला बेड्या

| Updated on: Jun 28, 2021 | 7:22 PM

वाशिम शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळ विरलहूजी नगरमधील घरकुलातून अवैध रित्या गांजा साठवूनक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

घरकुलात लपवला 15 किलो गांजा, वाशिम पोलिसांकडून महिलेला बेड्या
सांकेतिक फोटो
Follow us on

वाशिम : वाशिम शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळ विरलहूजी नगरमधील घरकुलात अवैध रित्या गांजा साठवूनक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांच्या या कारवाईत एकूण 15 किलो गांजा जप्त करण्यात आला असून एका महिलेला अटक करण्यात आले आहे. (Washim police seized five kg Cannabis from Gharkul house one women arrested)

गांजा पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला

मिळालेल्या माहितीनुसार वाशिम शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळ विरलहूजी नगरमधील एका घरकुलात अवैधरित्या गांजाची साठवणूक केली जात होती. पोलिसांना या प्रकाराची माहिती आपल्या सूत्रांच्या माध्यमातून समजली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलिसांनी कारवाई करण्याचे ठरवले. तसेच त्यानुसार सापळा रचला.

जप्त केलेल्या गांजाची किंमत 5 लाख रुपये

पोलिसांच्या या कारवाईत मनकरना मोहन जाधव या महिलेच्या घरातून तब्बल 15 किलो जांगा मिळाला. हा सर्व गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत ही 5 लाख 25 हजार रुपये आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईनंतर महिला आरोपीला अटक करण्यात आले आहे. तसेच या महिला आरोपीविरुद्ध वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांची दमदार कामगिरी

दरम्यान, ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार ध्रुवास बावनकर व त्यांच्या पथकाने या कारवाईला प्रत्यक्ष रुप दिले.

इतर बातम्या :

गणेश नाईकांच्या खंद्या समर्थकावर कोयता हल्ला, हातावर वार झेलल्याने संदीप म्हात्रे बचावले

एक्स बॉयफ्रेण्डशी बोलल्याचा राग, अल्पवयीन मुलीला प्रियकराने विहिरीत ढकलून ठार मारलं

Heennaa Panchaal | इगतपुरी रेव्ह पार्टी, ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री हीना पांचाळला अटक

(Washim police seized five kg Cannabis from Gharkul house one women arrested)